Friday, August 12, 2022
Home भारत 'उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ', केसरकरांचे...

‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’, केसरकरांचे चिमटे


ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी

पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर केसरकर यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. पण यावेळी त्यांनी ठाकरेंना टोला लगावला. “उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते आहे. आम्ही त्यांच्यावर काही बोलणार नाही. योग्य वेळ आली तेव्हा उत्तर देऊ. आम्ही शिवसेनेत (Shiv Sena) आहोत. आमचे मुख्यमंत्री शिवसैनिक आहेत. शाखाप्रमुख आज मुख्यमंत्री झाला आहे”, असं दीपक केसरकर म्हणाले.

‘आमदारांचा गोव्यातील जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी केली जातेय’

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवी मुख्यमंत्री असतील असं म्हणत मोठा राजकीय बॉम्ब फोडला. भाजपच्या हायकमांडने याबाबतचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली. दरम्यान, एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री होणार याबाबतची माहिती गोव्यातील ताज हॉटेलमध्ये थांबलेल्या शिंदे गटाच्या आमदारांनादेखील नव्हती. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली तेव्हा त्यांनादेखील आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रचंड जल्लोष केला. त्यांच्या जल्लोषाचा व्हिडीओ देखील समोर आला होता. पण या व्हिडीओवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. आमदारांच्या जल्लोषाचे व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी केली जातेय, असं दीपक केसरकर म्हणाले.

(ठाकरे सरकारने उचलबांगडी केलेल्या अश्विनी भिडे पुन्हा मोठ्या जबाबदारीवर परतणार? फडणवीसांचा नेमका प्लॅन काय?)

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर गोव्यात आमदारांनी जल्लोष केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल करून बदनामी केली जात आहे. ती आमदारांचा तणाव कमी झाल्याने नैसर्गिक प्रतिक्रिया होती, असं दीपक केसरकर म्हणाले. तसेच आता इथून पुढे कसे वागायचे हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.

“सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हाव, अशी आमची इच्छा होती. पण होतील असं वाटत नव्हतं. शिंदेंनी मुख्यमंत्री होणं हा आमच्यासाठी सुखद धक्का होता. बाळासाहेब ठाकरेंची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पूर्ण केली. देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मोठं मन दाखवलं”, असं दीपक केसरकर म्हणाले.

“जलयुक्त शिवारचे पुनर्जीवन फडणवीस यांनी केले. ओबीसी आरक्षणाबाबत सुद्धा ते प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांमुळे ग्रामीण आणि शहर जोडलेली. तुमच्या पैकी प्रत्येक जण मुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य आहे”, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. एकनाथ शिंदेंना बुद्धिमान देवेंद्र फडणवीस यांची साथ आहे. काम करणाऱ्या माणसाला बुद्धिमान माणसाची साथ मिळत आहे, असंदेखील केसरकर यावेळी म्हणाले.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

महाराष्ट्र

महाराष्ट्र

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#उदधव #ठकर #ह #फर #मठ #नत #यगय #वळ #आलयवर #उततर #दऊ #कसरकरच #चमट

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

Most Popular

Health Tips: डोळे अधिक सक्षम आणि दृष्टी वाढवण्यासाठी आहारात या 3 गोष्टींचा समावेश करा, चष्म्याचे नो टेन्शन !

Health Tips: डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग आहे. आपण फक्त आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. पण आजच्या काम करण्याचा सवईमुळे आणि...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

अल्लू अर्जुननं नाकारली कोट्यवधींची ऑफर; पाहा ठरतोय चर्चेचा विषय

अल्लू  अर्जुन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

पावसाळ्यात ओली गादी वाळवणे झालेय कठीण? या सोप्या टिप्स वापरून सुकवा गादी

बेडवरची गादी ओली झाली तर ती सुकवणे पावसाळ्यात सुकवणे अवघड काम असते. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने...

१६ जीबी रॅमसह येणाऱ्या OnePlus च्या ५जी फोनवर ५ हजार रुपयांची सूट, ऑफर एकदा पाहाच

नवी दिल्ली :OnePlus ने काही दिवसांपूर्वीच OnePlus 10T 5G या स्मार्टफोनला भारतात लाँच केले आहे. वनप्लसचा हा फोन ८ जीबी + १२८ जीबी...

Sudden Weight Loss: काही न करता वजन कमी होतंय? तपासून घ्या नाहीतर…

असे अनेक लोक आहेत जे भरपूर खाऊनही वजन वाढवू शकत नाहीत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...