Thursday, July 7, 2022
Home भारत उद्धव ठाकरे- शरद पवार भेट, एक तासाहून अधिक वेळ खलबतं, 'मातोश्री'वर शक्तीप्रदर्शन...

उद्धव ठाकरे- शरद पवार भेट, एक तासाहून अधिक वेळ खलबतं, ‘मातोश्री’वर शक्तीप्रदर्शन सुरू


मुंबई: राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित होते. ही बैठक एक तासाहून अधिक काळ सुरु होती, पण त्यामध्ये काय चर्चा झाली हे अद्याप समजलं नाही. दरम्यान, मातोश्रीवर शिवसैनिक जमा होत होत असून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीची एक बैठक झाली. त्यामध्ये शरद पवार यांनी प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर काँग्रेसचे नाना पटोले हेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे. 

तोंडावर येऊन सांगा, मी राजीनामा द्यायला तयार आहे असं उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना संदेश दिला आहे. त्यानंतर आता मातोश्रीसमोर शिवसैनिकांची गर्दी होत असून त्या ठिकाणी सेनेच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. 

काय म्हणाले मुख्यमंत्री?
उद्धव ठाकरे म्हणाले की, “मला आज दु:ख झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले म्हणाले असते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको, तर समजून घेतलं असतं. हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं….सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर येऊन सांगावं…. तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको असं तोंडावर सांगावं. मी आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो… जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं. ही लाचारी नाही, मजबुरी नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत… तोपर्यंत मी कोणतेही आव्हान स्वीकारेन.”

पक्षप्रमुख म्हणून मी राजीनामा द्यायला तयार
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “ज्या शिवसैनिकांना वाटतंय की मी पक्षप्रमुख म्हणून नालायक आहे… त्यानी मला थेट सांगावं. हेही पद सोडेन. मी मुख्यमंत्रीपदी असल्याने जर कुणाला अडचण असेल तर मी मुख्यमंत्रीपद सोडणार…. माझ्यानंतर जर कुणी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंद आहे.”अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#उदधव #ठकर #शरद #पवर #भट #एक #तसहन #अधक #वळ #खलबत #मतशरवर #शकतपरदरशन #सर

RELATED ARTICLES

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Most Popular

Jio Plans: रिचार्ज करा आणि ३३६ दिवसांसाठी टेन्शन फ्री राहा , Jio चा सर्वात वार्षिक प्लान, पाहा डेटा-कॉलिंग बेनिफिट्स

नवी दिल्ली: Reliance Jio Annual Plans:टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या यूजर्सना वेळोवेळी अनेक फायदे ऑफर करत असते . किफायतशीर किमतीत चांगले प्लान उपलब्ध...

शिंदे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस, मुख्यमंत्री मुलाचे ऑफिस पाहण्यास बाबा आले

मुंबई, ०७ जुलै: रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपदापर्यंत असा प्रवास करणारे एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आज सर्वात मोठा दिवस आहे....

ब्रिटिश सरकारमधील बंड चिघळले, 48 तासांमध्ये 39 मंत्र्यांचे राजीनामे

मुंबई, 7 जुलै : ब्रिटनमधील बोरीस जॉन्सन (Boris Johnson) सरकार मोठ्या संकटात सापडले आहे. गेल्या 48 तासांमध्ये 5 कॅबिनेट मंत्र्यांसह 39 मंत्र्यांनी राजीनामे...

लोकं नको म्हणत असताना दुचाकी चालकाचं भलतं धाडस! पुरातील धक्कादायक Video व्हायरल

मध्य प्रदेशमधील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला असून अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, देवासमधील एका दुचाकीस्वाराचा धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत...

पावसाळ्यात खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी काही टिप्स

मुंबई, 6 जुलै : पावसाळ्यात वातावरण गार आणि ओलसर असते. पावसाळ्याची (Rainy Season) मजा तर सर्वजण घेतात. मात्र पावसाळ्यात घरातील अन्न (Food Storage...

केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे अ‍ॅव्होकाडो तेल

मुंबई, 6 जुलै : अ‍ॅव्होकाडो (Avocado) फळ हे आपले शारीरिक आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र हे फळ केवळ आरोग्यासाठीच (Avocado Health Benefits)...