Saturday, July 2, 2022
Home भारत उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार, कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा भाजपचा आरोप

उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार, कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा भाजपचा आरोप


CM Uddhav Thackrey : राज्यातील राजकीय घडामोडीला सध्या वेग आलाय. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये राजकीय भूकंप झालाय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 358 पेक्षा जास्त आमदार आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संबोधन केले. उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थान सोडण्यापूर्वी अनेक कार्यकर्त्यांना भेट दिली. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. बुधवारी सकाळी राज्यातील राजकीय घडामोडी वेगवान होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले होते. हाच धागा पकडून भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह  यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचा भंग करत लोकांची भेट घेतली अशी तक्रार तेजिंदर पाल सिंह यांनी दिली आहे. ऑनलाइन पद्धतीने मलबार हिल पोलिस ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तेजिंदर पाल सिंह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. 

तक्रारीत काय म्हटलेय?
तेजिंदर पाल सिंह यांनी उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याची ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमाचं उल्लंघन केलेय आहे. बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांमध्ये उद्धव ठाकरे यांना कोरोना झाल्याचे वृत्त झळकले होते. याला काँग्रेस नेते कमलनाथ यांनी दुजोरा दिला होता. कोरोना नियमांनुसार, कोरोना रुग्णाला कुणालाही भेटता येत नाही. विलगीरणात राहावे लागते. पण मुख्यमंत्री सर्वांना भेटत असल्याचे बातम्यांमध्ये दिसले. उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियम मोडले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी विनंती करतो. 

मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण?
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त सकाळी आले होते.  मंत्रिमंडळ बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते कमलनाथ यांनी दिली. तसेच, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. एबीपी माझाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक क्विक अँटिजन टेस्ट करण्यात आली. याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली, पण आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे संभ्रम आहे. त्यामुळे काही काळानं पुन्हा एकदा आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. त्यानंतरच मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत की, नाही याबाबत चित्र स्पष्ट होईल. 

शरद पवारांनाही भेटले मुख्यमंत्री-
राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित होते. ही बैठक एक तासाहून अधिक काळ सुरु होती, पण त्यामध्ये काय चर्चा झाली हे अद्याप समजलं नाही. यानंतर काँग्रेसचे नाना पटोले हेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे. दरम्यान, मातोश्रीवर शिवसैनिक जमा होत होत असून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#उदधव #ठकरवरधत #पलसत #तकरर #करन #नयमच #उललघन #कलयच #भजपच #आरप

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Most Popular

रस्त्याने चालताना सावधान! वाऱ्यामुळे तरुणासोबड घडला असा प्रकार, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, जेथे आपण एकदा का गेलो की, मग त्यामध्ये तासन तास रमतो. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

या पावसाळ्यात घराच्या भिंतींचे नुकसान टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स

मुंबई, 01 जुलै : पावसाळ्यात (Rainy Season) सर्वात मोठी समस्या (Monsoon Problems) असते ती म्हणजे घरामध्ये पाणी येण्याची, घराच्या भिंती ओल्या होण्याची. जास्त आर्द्रता...

जान्हवीनंतर नेहाचा मंगळसूत्र चर्चेत! तुम्ही पाहिली का हटके डिझाईन?

मुंबई, 1 जुलै-   कलाकार आणि चाहते यांचं एक अनोखं नातं आहे. त्यामुळेच चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकारांच्या प्रत्येक गोष्टींची भुरळ पडत असते. मालिका...

कन्हैया लाल हत्याकांडानंतर राजस्थान सरकारचा मोठा निर्णय, 32 IPS अधिकार्‍यांची बदल्या

Rajasthan IPS Transfer : उदयपूरमधील कन्हैया लाल हत्याकांडानंतर राजस्थानमधील वातावरण तापलं आहे. या घटनेनंतर राजस्थान सरकारनं मोठा निर्णय...

चाय से ज्यादा बिल गरम! २० रुपयांच्या चहावर ५० रुपये सेवा शुल्क; ‘शताब्दी’मधलं बिल व्हायरल

दिल्ली: दिल्लीहून भोपाळला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसमधील चहाचं बिल सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. शताब्दी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानं चहाचं बिल सोशल मीडियावर...

तुमचं मुलं तुमच्याशी खोटं बोलतं? या सवयीमागची ही ४ कारणं धक्कादायक, उपाय म्हणून कराल एक गोष्ट

प्रत्येक पालक आपल्या मुलांना चांगलेच संस्कार देत असतात. मुलांनी चांगल वागावं, ही एवढीच यामागे त्यांची अपेक्षा असते. पण अनेकदा मुलांना खोटं बोलण्याची सवय...