Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय रवींद्र फाटक गुवाहाटीत दाखल

उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय रवींद्र फाटक गुवाहाटीत दाखल


 Maharashtra Political Crisis :  मंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde)  मनधरणी करणारे आमदार रविंद्र फाटकच (Ravindra Phatak)  आता शिंदेंच्या गटात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले फाटक विधान परिषदेचे आमदार आहेत. विशेष फाटक हे मंगळवारी मिलिंद नार्वेकर यांच्यासमवेत शिंदेंची मनधरणी करण्यासाठी सूरतला गेले होते. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेना आणि अपक्ष मिळून 42 आमदार सामिल झाल्याचं स्पष्ट झालंय. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये शिंदे समर्थकांचं फोटोसेशन झालं. त्याचा व्हीडिओ एबीपी माझाला मिळालाय.  समर्थक आमदारांच्या या व्हीडिओतून शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन केलंय. या बैठकीत विधिमंडळ नेतेपदी म्हणून एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आली. त्यामुळं एकनाथ शिंदे आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या सर्व बंडखोर आमदारांचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये शिंदेंनी भाजप पाठीशी असल्याचं स्पष्ट म्हंटलंय.  भाजप काहीही कमी पडू देणार नाही असं शिंदे आमदारांना सांगत आहेत.  एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी सूरत येथे पाठवलं होतं. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्यानं रविंद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांना रिकाम्या हाती परत यावं लागलं होतं हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं होतं.  मिलिंद नार्वेकर आणि आमदार रविंद्र फाटक हे दोन्ही एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जात असल्यानं या दोघांना एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीसाठी पाठवलं गेलं होतं. आता मात्र ज्यांना मनधरणी करायला पाठवलं त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याचं चित्र पाहायला मिळाल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचं समोर आलं आहे. 

संबंधित बातम्या :

 

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#उदधव #ठकरच #नकटवरतय #रवदर #फटक #गवहटत #दखल

RELATED ARTICLES

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग

मुंबई, 02 जून : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण हँड सॅनिटायझर वापरतो. सॅनिटायझरमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत होते. कोरोनामुळे अलिकडे सर्वांना सॅनिटायझरचे...

Most Popular

Ketaki Chital:माझ्यावर हल्ला करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक होते-केतकी चितळे

मुंबई, 01 जुलै: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ( Ketaki Chitale) अटक करण्यात...

दिल्लीहून उड्डाण घेताच SpiceJet विमानाच्या केबिनमध्ये आग, पाहा VIDEO

मुंबई, 2 जुलै : दिल्लीहून उड्डाण घेतलेल्या स्पाईस जेट विमानाच्या (SpiceJet Plane) केबिनमध्ये चारी बाजूनं अचानक धूर येऊ लागला. हा धूर येत होता...

Todays Headline 2nd July : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

गर्भपात क्लिनिकला भेट देणाऱ्या व्यक्तीची ‘लोकेशन हिस्ट्री’ गुगल हटवणार!

Right To Abortion : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने (US Supreme Court) गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारा 50 वर्षे जुना निर्णय...

पावसाळ्यात साखरेला ओलाव्यापासून वाचवण्यासाठी वापरा या टीप्स

मुंबई, 02 जुलै : पावसाळा (Rainy Season) खूप आनंद घेऊन येणारा ऋतू असतो. अनेकांना हवाहवासा वाटणारा हा पावसाळा काही गोष्टींमुळे त्रासदायक देखील ठरतो. पावसाळ्यात स्वयंपाकघरात ठेवलेले...