Saturday, July 2, 2022
Home भारत उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदे गटाला थेट आव्हान... हीच वीट आता तुमच्या डोक्यात...

उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदे गटाला थेट आव्हान… हीच वीट आता तुमच्या डोक्यात हाणणार


मुंबई: आपण ज्यांना मोठं केलं त्यांची स्वप्नं मोठी झाली, आता ती आपण पुरी करु शकत नाही असं मुख्यंमत्री उद्धव ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या मुलाला खासदार केलं, मग माझ्या मुलाने काहीच करु नये का असा सवालही त्यांनी केला. या सर्वाचा आता वीट आला असून तीच वीट आपण यांच्या डोक्यात हाणणार असं सांगत उद्धव ठाकरे यांनी आता एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना थेट आव्हान दिलं आहे.

राक्षसी महत्त्वाकांक्षा नसावी
मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेना पदाधिकांऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी ते म्हणाले की, आपण यांना सर्व काही दिलं. मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातं असतं, पण पैशाचा विषय नको म्हणून ते खातं एकनाथ शिंदे यांना दिलं. पण आपण ज्यांना मोठं केलं त्यांची स्वप्न आता मोठी होत आहेत. ती आपण पुरी करु शकत नाही. महत्त्वाकांक्षा असावी, पण ज्यानं दिलं त्यालाच खावं अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा नसावी.

आपल्यासोबत कोणी नाही असं समजून नवी शिवसेना उभी करा
आधी यांच्यासाठी बाळासाहेब विठ्ठल होते, आणि आम्ही बडवे होतो. आता मी विठ्ठल आहे आणि आदित्य बडवा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, या सर्वामागे भाजपचा हात आहे. आतापर्यंत जे लोक भाजपसोबत गेले, ते सर्वजण संपले आहेत. मातोश्रीवर घाणेरडे आरोप केल्यानंतर मी शांत बसणार नाही. आपल्यासोबत कोणी नाही असं समजून नवी शिवसेना उभी करा. 

भाजपसोबत गेलेत ते संपलेत
कितीही आमदार घेऊन जा, शिवसेनेला काहीही होणार नाही असं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, काही आमदार म्हणाले होते की तिकीट कापलं तरी आम्ही शिवसेना सोडून जाणार नाही. बंड झाल्यानंतरही शिवसेना दोन वेळा सत्तेत आली. 

 

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#उदधव #ठकरच #एकनथ #शद #गटल #थट #आवहन #हच #वट #आत #तमचय #डकयत #हणणर

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

पाक तुरुंगात 682 भारतीय कैद, पाकिस्तानची कबुली

Indian Prisoner In Pakistan Jail: पाकिस्तानने शुक्रवारी सांगितले की, त्यांच्या तुरुंगात 682 भारतीय कैदी आहेत. भारत आणि पाकिस्तानने...

‘रॉकेटरी’ ते ‘शाब्बास मिथू’, जुलै महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

July Upcoming Movies: या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये बॉलिवूडचे अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाले आहेत....

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर ‘मेगाब्लॉक’

Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो (Mumbai) रविवारी (3 जुलै) घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर जरा थांबा. रविवारी...

Devendra Fadnavis: 2024 च्या निवडणुकांसाठी कामाला लागा- देवेंद्र फडणवीस ABP Majha

<p>2024 च्या निवडणुकांसाठी कामाला लागा- देवेंद्र फडणवीस</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

प्रत्येक महिन्याला रिचार्जचे टेन्शन विसरा, Airtel-Jio-Vi च्या या प्लान्समध्ये मिळतो ३६५ दिवस २ GB पर्यंत डेटा

नवी दिल्ली: Best Annual Plans: दूरसंचार ऑपरेटर Airtel, Jio आणि Vodafone-Idea असे अनेक प्लान्स प्रदान करतात. जे दररोज २ जीबी डेटासह येतात. यामध्ये...