Friday, August 12, 2022
Home भारत उदयपूर हत्या प्रकरण : हिंदू टेलरच्या हत्येनंतर गेहलोत सरकारने उचललं मोठं पाऊल

उदयपूर हत्या प्रकरण : हिंदू टेलरच्या हत्येनंतर गेहलोत सरकारने उचललं मोठं पाऊल


जयपूर 02 जुलै : प्रेषित पैगंबरांच्या कथित अपमानाच्या निषेधार्थ उदयपूरमधील एका हिंदू टेलरची गळा कापून हत्या करण्यात आली (Udaipur Tailor Murder Case). याप्रकरणी राजस्थान सरकार आता डॅमेज कंट्रोलच्या स्थितीत आहे. कारवाई करत सरकारने शुक्रवारी उदयपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक कुमार मीना यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केलं. याआधी गुरुवारी रात्री उशिरा उदयपूर रेंजचे आयजी आणि एसएसपी यांची बदली करण्यात आली.
राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव (पोलीस) जगवीर सिंग यांनी उदयपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक कुमार मीणा यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. मात्र, निलंबनाचं कारण आदेशात नमूद केलेलं नाही. टेलर कन्हैयालाल साहू यांच्या हत्येप्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं समजतं. या प्रकरणी पोलीस ठाण्याचे एसएचओ आणि एएसआय यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आलं आहे. कन्हैया लाल साहू यांची मंगळवारी रात्री त्यांच्या दुकानात घुसलेल्या दोन जिहादींनी चाकूने गळा चिरून हत्या केली.

पुराव्यासाठी कोर्टात आणलेल्या बॉम्बचा ब्लास्ट, परिसर हादरलं; अनेक पोलीस गंभीर जखमी

राजस्थान सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीच्या तपासात मृत कन्हैया लाल साहूच्या दुकानापासून सुमारे 500 मीटर अंतरावर एक पांढऱ्या रंगाची अॅक्टिव्हा सापडली. या अ‍ॅक्टिव्हा गाडीचा क्रमांक RJ-27-BS-1226 असल्याचं सांगण्यात येत आहे. ही अॅक्टिव्हा गौस मोहम्मदच्या नावाने नोंदणीकृत आहे. या अ‍ॅक्टिव्हावर बसून या गौस मोहम्मद रियाज अत्तारी हा हत्या करण्यासाठी आला असल्याचं समजतं.

दुसरीकडे, हिंदू टेलरचा गळा कापल्याच्या विरोधात देशभरात संताप आणि या प्रकरणाचा निषेध सुरू आहे. या हत्याकांडाच्या विरोधात आज राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. आज किशनगड, अलवर, करौली, अजमेर आणि हिंडन शहरातील बाजारपेठा बंद राहतील. भाजपच्या आवाहनावरून या शहरातील व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा देत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

महिलेने 3 निष्पाप मुलींसह उचलले भयानक पाऊल, कुटुंबीयांना माहिती मिळताच बसला धक्का

एनआयएने तपासादरम्यान मोहसीन आणि आसिफ नावाच्या आणखी दोन आरोपींना कन्हैया लाल साहू हत्येप्रकरणी अटक केली आहे. त्यांना आज जयपूर येथील एनआयए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एनआयएच्या आवाहानानंतर आता उदयपूरच्या कोर्टाने सर्व पत्रं जयपूरच्या एनआयए कोर्टात हस्तांतरित केली आहेत. आता या हत्या प्रकरणातील सर्व सुनावणी जयपूरच्या कोर्टातच होणार आहे.

Published by:Kiran Pharate

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#उदयपर #हतय #परकरण #हद #टलरचय #हतयनतर #गहलत #सरकरन #उचलल #मठ #पऊल

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

मुंबईकरांनो सावधान! शहरात एका दिवसात 79% कोरोनाचे रुग्ण वाढले

 आरोग्य विभागाच्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट  

Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. या पावसामुळं काही...

Girish Mahajan at Jalgaon : मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन यांचं जळगावात जंगी स्वागत

Girish Mahajan at Jalgaon : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) आज प्रथमच जळगावमध्ये...

Food For Kidney: किडनी निकामी होण्यापासून टाळायचे असेल तर, या पदार्थांना द्या प्राधान्य

मुंबई : Best Kidney Cleanse Remedies: मूत्रपिंड (Kidney) हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो फिल्टर म्हणून काम करतो आणि शरीरातील...

Memes: रिषभ पंत १७ नंबरची जर्सी का घालतो? उर्वशी रौतेलाशी आहे खास कनेक्शन

पोस्टमध्ये काय म्हणाला रिषभ पंत?उर्वशीच्या या प्रकरणावर ऋषभ पंतने नाव न घेता खिल्ली उडवली. त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, “हे मजेदार आहे...

2023 मध्ये बेबी पावडर उत्पादनावर बंदी आणणार, जॉनसन अँड जॉनसन कंपनीचा मोठा निर्णय, ‘हे’ आहे कारण

Johnson and Johnson Baby Talc : जॉनसन अँड जॉनसन (Johnson and Johnson) कंपनीने बेबी पावडर उत्पादन बंद करण्याचा मोठा...