Thursday, May 26, 2022
Home मुख्य बातम्या उत्तर भारतात थंडीची लाट कायम, महाराष्ट्रातही पारा घसरला, परभणीत दाट धुक्याची चादर

उत्तर भारतात थंडीची लाट कायम, महाराष्ट्रातही पारा घसरला, परभणीत दाट धुक्याची चादर


IMD Weather News : सध्या देशात कडाक्याची थंडी पडली आहे. विशेषत उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक असल्याचे दिसत आहे. काश्मीरपासून पंजाबपर्यंत, राष्ट्रीय राजधानी दिल्लीपासून उत्तर प्रदेश, उत्तराखंडपर्यंत, पूर्व भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम आहे. दिल्लीत आजही असेच वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दिल्लीत विविध ठिकाणी तापमान 8 अंशाच्या खाली नोंदवण्यात आले आहे. पुढील चार दिवस दिल्लीत दाट ते मध्यम धुके राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच महाराष्ट्रातही थंडीचा कडाका कायम आहे. अनेक ठिकाणी दाट धुके पडत आहे.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कोरड्या हवामानामुळे पारा कमालीचा घसरला आहे. महाबळेश्वर येथे तर जोराची गोठवणारी थंडी पडली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईतही चांगली थंडी जाणवू लागली आहे. गेल्या 10 वर्षात मुंबईकरांना यंदाच्या जानेवारीत पहिल्यांदाच या थंडीचा अनुभव घेतला. यंदाच्या हंगामातील 10 जानेवारी हा सर्वाधिक थंड दिवस ठरला. कोरडे हवामान आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईचा पारा घसरला. 10 जानेवारीनंतर तीन दिवस मुंबईत गारठा जाणवला. त्यानंतर मात्र, मुंबईच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. असे असले तरीही राज्यभरात मात्र अद्यापही थंडीचा चांगलाच कडाका आहे.

मागच्या आठवडाभरापासून परभणी जिल्ह्यातील वातावरणात देखील चांगलाच बदल झाला आहे. पहिल्यांदा थंडी त्यात जोरदार अवकाळी पाऊस पडला आणि आज पहाटेपासूनच सर्वत्र धुक्याची चादर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.अख्खे परभणी शहर हे दाट धुक्यात हरवले आहे. इमारती,रस्ते,या धुक्याने दिसेनासे झाले असून रब्बी पिकांना या बदलत्या वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारची पहाट परभणीकरांसाठी दाट धुके घेऊन आल्याने सकाळी मॉर्निंग वॉक ला ही जाणाऱ्यांची संख्या कमी दिसून आली.

दरम्यान, काश्मीरमध्ये 21 डिसेंबर ते 31 जानेवारी हा काळ चिल्लई कलान म्हणून ओळखला जातो. हे 40 दिवस हिवाळ्यातील सर्वात थंड काळ असतो. त्यामुळेच काश्मीरमध्ये सध्या कडाक्याची थंडी असून खोऱ्यातील तापमानाचा पारा घसरला आहे. या हंगामात सामान्य तापमानापेक्षा रात्रीचे तापमान अनेक अंशांनी खाली गेले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये पारा शून्य ते 4.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#उततर #भरतत #थडच #लट #कयम #महरषटरतह #पर #घसरल #परभणत #दट #धकयच #चदर

RELATED ARTICLES

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Most Popular

IPL 2022 : RCB होणार चॅम्पियन! ‘लकी चार्म’ करणार विराटचं स्वप्न करणार पूर्ण

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 चा चॅम्पियन कोण? याचा निर्णय आता फक्त 2 मॅचनंतर होणार आहे. आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये (IPL 2022)...

Cardiac arrest : ‘या’ 5 चुकांमुळे बाथरूममध्येच येतो हार्ट अटॅक, दोन नंबरची चूक लाखो लोक करतात..!

बाथरूममध्ये हृदयविकाराचा झटका (Heart attack) किंवा कार्डियाक अरेस्टची (Cardiac arrest) अनेक प्रकरणे तुम्ही ऐकली असतील. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीचेच उदाहरण घ्या. रिपोर्ट्सनुसार, बाथरूममध्ये...

PHOTO : उफ्फ तेरी अदा… ब्लॅक अँड गोल्डन ड्रेस, दीपिकाच्या लूकवर चाहते फिदा!

इंडियन प्रीमियर लीग, 2022 | क्वालिफायर 2 | नरेंद्र मोदी स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद - 27...

LSG vs RCB: विराटला बाद केल्यानंतर आवेश खाननं केलेली ‘ती’ कृती चर्चेत; Viral Video वरुन दोन गट, पाहा नेमकं घडलं काय | IPL 2022...

आयपीएलच्या २०२२ च्या पर्वामधील पहिल्या एलिमिनेटर सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने लखनऊ सुपर जायंट्सवर १४ धावांनी विजय मिळवला. रजत पटिदारच्या (५४ चेंडूंत नाबाद ११२)...

डॉग वॉकसाठी अख्ख स्टेडिअम केलं रिकामं, IAS अधिकाऱ्याच्या कृतीनं खेळाडू संतापले

दिल्लीतील एका IAS अधिकाऱ्याला निव्वळ आपल्या कुत्र्याला फिरवता यावे यासाठी संपुर्ण स्टेडिअम रिकाम कराव लागत असल्याची घटना समोर आली आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा...

कुत्रा बनण्याची हौस पूर्ण करण्यासाठी खर्च केले 11 लाख, फोटो पाहून व्हाल शॉक

नवी दिल्ली 26 मे : जगातील प्रत्येक माणसाचे विचार आणि आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. तर काही लोक मात्र वेगळं काहीतरी करण्यासाठी आपल्या शरीरासोबतही भयंकर...