Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या उच्चभ्रू सोसायटीच्या इमारतीवरून नवजात बालिकेला फेकलं; विरारमधील क्रूरतेचा कळस गाठणारी घटना

उच्चभ्रू सोसायटीच्या इमारतीवरून नवजात बालिकेला फेकलं; विरारमधील क्रूरतेचा कळस गाठणारी घटना


विरार, 04 ऑगस्ट: नवजात बालिकेला (Newborn Baby Girl) एका उच्चभ्रू सोसायटीच्या इमारतीवरून खाली फेकून (Threw from building) दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित सोसायटीत राहणाऱ्या अन्य काही रहिवाशांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी त्वरित बालिकेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण रुग्णालयात उपचार सुरू असतानाच, त्या निष्पाप चिमुकलीनं अखेरचा श्वास घेतला आहे. या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे. पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विरार (Virar) पश्चिमेच्या यशवंत नगर परिसरातील ट्युलिप सोसायटीत घडली आहे. विरार पश्चिम यशवंत नगर परिसर शिक्षित आणि उच्चभ्रू वस्तीचा परिसर आहे. पण याच सोसायटीत बालिकेला इमारतीवरून फेकून दिल्याची क्रूरतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ट्युलिप इमारतीच्या आतील मोकळ्या जागेत स्थानिक रहिवाशांना एक नवजात बाळ आढळून आलं होतं.
हेही वाचा-कॅब चालकाला मारहाण करणं ‘त्या’ महिलेला भोवलं; VIDEO समोर येताच पोलिसांची कारवाई
हे बाळ कुणीतरी इमारतीवरून फेकल्याचं प्रथमदर्शनी दिसत होतं. तसेच बाळा अनेक ठिकाणी दुखापत झाली होती. बाळाची प्रकृती गंभीर असल्याचं लक्षात येताच, स्थानिकांनी बाळाला कपड्यात गुंडाळून त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तसेच अर्नाळा पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अर्नाळा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत, घटनेचा पंचनामा केला.
हेही वाचा-17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात मुंबईतील TikTok स्टारवर गुन्हा
संबंधित नवजात बाळ नेमकं कोणी फेकलं आणि इमारतीच्या कितव्या मजल्यावरून फेकलं याबाबत कोणालाच काही माहीत नव्हतं. तसेच स्थानिकांनी कधीही या बाळाला ट्युलिप सोसायटीत पाहिलं नव्हतं. त्यामुळे हे बाळ नक्की कोणाचं आहे, हेही अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. संबंधित नवजात बालिकेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर, काही वेळात तिचा उपचारादरम्यानं मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास अर्नाळा पोलीस करत आहेत.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#उचचभर #ससयटचय #इमरतवरन #नवजत #बलकल #फकल #वररमधल #कररतच #कळस #गठणर #घटन

RELATED ARTICLES

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात

<p>Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

तो बिर्याणी खातो आणि…; टीम इंडियाच्या गोलंदाजाबद्दल हे काय बोलून गेला Rohit sharma

रोहित शर्मा आता आगामी आशिया कपसाठी सज्ज झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Most Popular

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

महिलांची ‘आयपीएल’ पुढील वर्षी मार्चमध्ये?

पीटीआय, नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महिलांच्या स्वतंत्र इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) मार्च २०२३पासून सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. ही लीग...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात प्रेक्षकांना मिळणार अष्टविनायकाची माहिती

मुंबई, 12 ऑगस्ट : स्टार प्रवाह सध्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी वाहिनी आहे. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांची मन जिंकत आहेत.  टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या...