Thursday, July 7, 2022
Home टेक-गॅजेट इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी लाईफ कशी वाढवावी? फॉलो करा 'या' टिप्स

इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी लाईफ कशी वाढवावी? फॉलो करा ‘या’ टिप्स


मुंबई, 22 जून : इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (Electric Vehicle) वापरल्या जाणार्‍या लिथियम-आयन बॅटरी (Lithium-ion batteries) हा त्यातील सर्वात महाग भाग आहे. साधारणपणे ही बॅटरी 5-7 वर्षे सहज टिकते. बहुतेक कंपन्या बॅटरी पॅकवर जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत वॉरंटी देतात. यानंतर ते बदलणे आवश्यक आहे, कारण इलेक्ट्रिक वाहनाची रेंज आणि पॉवर ही बॅटरीच्या क्षमतेवर अवलंबून असते. जर तुमच्याकडेही इलेक्ट्रिक कार, स्कूटर किंवा बाईक असेल आणि तुम्हाला त्याची बॅटरी जास्त काळ सुरक्षित ठेवायची असेल तर तुम्हाला यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला EVमध्ये चांगली रेंज मिळेल आणि बॅटरीही सुरक्षित राहील.

वाहन नेहमी थंड ठिकाणी पार्क करा

इलेक्ट्रिक वाहन पार्किंग करताना उच्च तापमानाचा संपर्क टाळावा. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये स्वयंचलित तापमान नियंत्रण प्रणाली असते, जी सामान्य तापमान कमी ठेवण्याचे काम करते. इग्निशन चालू असताना आणि वाहन बॅटरी वापरत असतानाच ही यंत्रणा काम करू शकते. जर तापमान जास्त असेल आणि तापमान यंत्रणा काम करत नसेल अशा ठिकाणी वाहन पार्क केली असेल तर आग लागण्याचा धोका वाढतो.

जलद चार्जिंग वापरणे टाळा

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये जलद चार्जिंग टेक्नोलॉजी खूप महत्त्वाचे आहे. जलद चार्जिंग EV बॅटरी त्याच्या मानक चार्जिंग वेळेपेक्षा खूप वेगाने चार्ज करते. ही प्रणाली EV मालकांसाठी सोयीस्कर आहे, परंतु बॅटरीच्या आयुष्यासाठी ते चांगले नाही. एका वर्षासाठी स्टँडर्ड चार्जिंग वापरल्याने एका वर्षाच्या जलद चार्जिंगपेक्षा 10 टक्के जास्त बॅटरी लाइफ मिळेल.

खिशाला लागणार कात्री? घरगुती गॅसपासून मालमत्तेपर्यंत येत्या 10 दिवसात बदलणार ‘हे’ 5 नियम

बॅटरी सतत वापरत राहा

इलेक्ट्रिक वाहने बराच वेळ पार्क केल्यामुळे बॅटरीचे नुकसान होऊ शकते. EV बॅटरीच्या दीर्घ आयुष्यासाठी बॅटरी चार्ज ठेवणे नेहमीच महत्त्वाचे असते. हे मोबाईल फोनच्या बॅटरीसारखे आहे. नेहमी 25 ते 75 टक्के बॅटरी चार्ज ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुम्ही चार दिवसांपेक्षा जास्त काळ बॅटरी वापरत नसल्यास MCB बंद करा.

वारंवार चार्जिंग टाळा

इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी पूर्ण चार्ज ठेवणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु यासाठी बॅटरी पुन्हा पुन्हा चार्ज करावी लागते. बॅटरीच्या वारंवार चार्जिंगमुळे तिची बॅटरी लाईफ खराब होऊ शकते. जरी पूर्ण चार्ज केलेली बॅटरी अधिक रेंज देते, तरीही ती बॅटरीच्या आयुष्यासाठी चांगली नसते.

पॅनकार्डच्या मदतीने TDS Status चेक करा; पगारातून कापलेले पैसे रिफंड मिळण्यास होईल मदत

राइड केल्यानंतर लगेच बॅटरी चार्ज करू नका

वाहनातून घरी परतल्यानंतर लगेच बॅटरी चार्ज करणे टाळा. EV चालू असताना बॅटरी वापरली जात असताना, ती जास्त गरम होते. राइड केल्यानंतर लगेच चार्ज केल्याने बॅटरी थंड होत नाही. त्यामुळे, बॅटरी चार्ज करण्यापूर्वी ती थंड होण्यासाठी किमान 30 मिनिटे द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#इलकटरक #वहनच #बटर #लईफ #कश #वढवव #फल #कर #य #टपस

RELATED ARTICLES

Aadhar Cardलाही असते एक्सपायरी डेट! असं करता येतं रिन्यू

मुंबई, 6 जुलै: आधार कार्ड हे अत्यावश्यक कागदपत्रं म्हणून वापरलं जाणारं ओळखपत्र बनलं आहे. आधारकार्ड आता जवळपास सर्व शासकीय योजनांसाठी गरजेचं असतं. थोडक्यात...

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Raigad Rains :  रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ABP Majha

<p>&nbsp;रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ,&nbsp; कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळीवरून , पुढील ३ दिवस रायगड जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'</p> अस्वीकरण:...

Most Popular

गृहनिर्माण सोसायट्यांना सरकारचा मोठा दिलासा; सोसायट्यांच्या निवडणूक खर्चात कपात 

Mumbai Housing Society Election  : भाजपा- शिवसेना युतीचे सरकार येताच गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा दिलासा देण्यात आला असून सोसायटीच्या...

लालू यादव यांची प्रकृती ढासळली; तातडीने दिल्लीला हलणावर, मुलीची भावुक पोस्ट

पाटणा, 6 जुलै : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची गेल्या काही दिवसांपासून ढासळत आहे. त्यांना...

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Live Update : मुंबईतील पवईमध्ये मॉलला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

सोनेरी साडी, शाही दागिने ऐश्वर्या रायच्या लूक पुढे ‘अप्सरा’ ही फिक्या, सोशल मीडियावर नुसती आग

Ponniyin Selvan Aishwarya Rai Bachchan Look: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन 'पोन्नियन सेल्वन' या सिनेमातील नविन लूक नुकताच सर्वांसमोर आला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या...

माळीणची पुनरावृत्ती नको! भूस्खलनाच्या भीतीने मुळशीतील 14 कुटुंबांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर

<p><strong>Pune News: &nbsp;</strong>पुणे (Pune) जिल्हा प्रशासनाने मुळशी तालुक्यातील गुटके गावातील 14 कुटुंबांना दरड कोसळण्यापासून बचावाचा उपाय म्हणून खोऱ्यातील मोकळ्या जमिनीवर बांधलेल्या तात्पुरत्या निवासी...