तर गेली अनेक दिवस मागे पडलेली सुख म्हणजे नक्की काय असतं ( Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिका यावेळी दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. मालिकेला 6.6 रेटींग मिळालं आहे. जय आणि गौरीच्या आयुष्यात आलेला ट्विस्ट प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. मालिकेनं आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला मागे टाकलं आहे. आई कुठे काय करते ही मालिका 6.4 रेटींगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर चौथ्या क्रमांकावर फुलाला सुंगध मातीचा ( Phulala Sugandh Maticha) ही मालिका आहे. कीर्ती आणि शुभम यांची नवी गोष्ट 6.1 रेटींगसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर ठिपक्यांची रांगोळी ( Thipkyanchi Rangoli) ही मलिकाही पहिल्या पाचात आली असून मालिकेला 6.0 इतके टीआरपी रेटिंग मिळाले आहेत.
हेही वाचा – ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर राजकीय तडका! आठवलेंचा अजित दादांना सूचक सल्ला
यावेळी देखील यश नेहाची मालिका मागे पडली असून मालिका सातव्या क्रमांकावर आहे. लग्नाचा इतका मोठा महाएपिसोड दाखवूनही मालिका 5.6 रेटींगसह सातव्या क्रमांकावर आली आहे. त्याचप्रमाणे5.5 रेटींगसह माझी तुझी रेशीमगाठ ( Majhi Tujhi Reshimgath) हीच मालिका आठव्या क्रमांकावर आहे तर नवव्या क्रमांकावर पुन्हा एकदा सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आहे. तर यावेळी स्वाभिमान ( Swabhiman) ही मालिका या आठवड्यात चक्क दहाव्या क्रमांवर गेली आहे. शांतनू पल्लवीच्या लग्नानंतर मालिकेत आलेला ट्विस्ट प्रेक्षकांच्या काही पसंतीस उतरलेला दिसत नाही.
मागील एक महिन्यांपासून रंग माझा वेगळा ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर आई कुठे काय करते दुसऱ्या क्रमांकावर. दोन्ही मलिकांमध्ये दर आठवड्याला टाकेकी टक्कर पाहायला मिळत होती. मात्र आठवड्यात TRPच्या रेटींगची सगळी गणिती बदलली आहेत. मन उडू उडू झालं ही मालिका गेली अनेक दिवस दहाव्या क्रमांकावर होती या आठवड्यात मात्र मालिका TRP रेटींगमधून बाहेर गेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#इदर #दप #TRPचय #शरयततन #बहर #य #आठवडयत #दपसह #मरल #य #मलकन #बज