Saturday, July 2, 2022
Home करमणूक इंद्रा आहे जयश्रीचा दत्तक मुलगा? मालिकेत होणार नव्या पात्राची एंट्री!

इंद्रा आहे जयश्रीचा दत्तक मुलगा? मालिकेत होणार नव्या पात्राची एंट्री!


मुंबई, 24 जून: मन उडू उडू झालं ( Man Udu Udu Jhal) मालिकेत सध्या इंद्रा दीपूच्या ( Indra-Deepu) प्रेमाची परीक्षा सुरू आहे. इंद्रा करत असलेलं काम सगळ्यांसमोर आल्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. दीपू आणि इंद्राचं लग्न देखील देशपांडे सरांनी मोडलं. तर दुसरीकडे जयश्रीला देखील इंद्राच्या गुंड असल्याचं सत्य समोर आल्यानंतर प्रचंड त्रास झाला आहे. यासगळ्यात मात्र दीपूनं घरच्यांच्या विरोधात जाऊन इंद्राची साथ देण्याचं वचन त्याला दिलं आहे. इंद्राला त्याच्या वागण्याचा खूप त्रास झाल्यानं तो साळगावकरांच्या घरी देखील गेलेला नाही. स्वत: आधी कायम इतरांचा विचार करणाऱ्या इंद्रावर आज घराबाहेर राहण्याची वेळ आली. त्याचा हा संघर्ष आजचाच नाही तर लहानपणापासूनचा आहे. इंद्राच्या बालपणीचा प्रवास आपल्याला मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे.

इंद्राच्या बालपणीचा संपूर्ण प्रवास येत्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका वेबसाईटनं मोठ्या आणि छोट्या इंद्राचा फोटो शेअर  केला आहे. ज्यात छोटा इंद्रा शाळेचा गणवेशात दिसत आहे. डॅशिंग,बिनधास्त पण तितकाच प्रेमळ इंद्रा बालपणी कसा होता हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे. इंद्राचं बालपण नक्की कसं होतं असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

आपण पाहिलं तर  इंद्राच्या वडिलांचं छत्र बालपणीच हरवलं. त्यामुळे जयश्रीनं तिन्ही मुलांना एकटीनं सांभाळलं.

हेही वाचा – Aai Kuthe Kay Karte: संजनामुळे होणार अनघाचा अपघात! अनिरुद्ध सुनावणार खडे बोल

वडिलांचं छत्र हरवल्यानं इंद्रा फार लवकर मोठा झाला आणि त्यानं संपूर्ण घराची जबाबदारी स्वीकारली. पण इंद्राच्या वडिलांचा मृत्यू कसा झाला हे आता या मालिकेच्या या विशेष भागातून प्रेक्षकांना कळणार आहे. छोट्या इंद्राच्या एंट्रीनंतर चाहत्यांनी बरेच अंदाज वर्तवले आहेत. इंद्रा हा जयश्रीचा दत्तक घेतलेला मुलगा आहे, असं म्हटलं जात आहे. इंद्राच्या आयुष्यात बालपणी नक्की काय झालं? याचं उत्तर मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना मिळणार आहे.

मन उडू उडू झालं मालिकेत मागील 2 महिन्यांपासून वेगवेगळे ट्विस्ट आणले जात आहेत. मात्र तरीही मालिका टिआरपीच्या शर्यतीत मागे पडत आहे. या आठवड्यात तर मालिका टिआरपीच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#इदर #आह #जयशरच #दततक #मलग #मलकत #हणर #नवय #पतरच #एटर

RELATED ARTICLES

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’, केसरकरांचे चिमटे

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज...

Most Popular

स्वयंपाकीने दिली माही- जयला जीवे मारण्याची धमकी, दोन वर्षांच्या ताराला म्हणाला खंजीर खुपसेन

मुंबई- टीव्हीचं स्टार कपल जय भानुशाली आणि माही विज यांच्याशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. दोघांनी गुरुवारी (३० जून) पोलिसांत तक्रार दाखल...

ओप्पो कंपनीकडून गुड न्यूज, भारतातील या ३ स्मार्टफोनच्या किंमतीत ६ हजारांपर्यंत कपात

नवी दिल्लीः OPPO F19 Pro+, A76 आणि A54 स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीकडून कपात करण्यात आली असून १ जुलै पासून भारतात या स्मार्टफोनला आता...

पंतप्रधान मोदींची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा

Modi Putin Phone Call : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ( Vladimir Putin...

इथं ठाकरेंचं, इस्त्राइलमध्ये बेनेट सरकार पडले, साडेतीन वर्षात पाचव्यांदा निवडणुकीची रणधुमाळी

इस्त्राइलमध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांना मतदान करण्याऐवजी पक्षाला मतदान केलं जातं. त्यामुळं आघाडीची सरकार सत्तेवर येतात. आता साडेतीन वर्षात पाचव्यांदा निवडणूक होणार आहे. बेंजामिन...

फडणवीस खरंच नाराज? किरीट सोमय्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्याचं कारण

मुंबई 01 जुलै : 8 ते 10 दिवसांच्या हालचालींनंतर अखेर राज्याच्या राजकारणात गुरुवारी मोठी घडामोड घडली. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर गुरुवारी एकनाथ...

हे काय? पोटात बाळ नव्हे तर…; प्रेग्नंट महिलेचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले

लंडन, 01 जुलै : मळमळणं, उलटी, चक्कर येणं, मासिक पाळी चुकणं अशी सुरुवातीचा लक्षणं दिसल्यानंतर प्रेग्नन्सीचं पुढील लक्षण म्हणजे पोटाचा वाढणारा आकार. जसजसा...