Friday, May 20, 2022
Home क्रीडा इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट:बाद फेरी पक्की करण्याचे लखनऊचे उद्दिष्ट ;आज बलाढय़ राजस्थानशी...

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट:बाद फेरी पक्की करण्याचे लखनऊचे उद्दिष्ट ;आज बलाढय़ राजस्थानशी सामना | Indian Premier League Cricket Lucknow goal secure knockout stage Baladhay face Rajasthan amy 95मुंबई : यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सचे रविवारी राजस्थान रॉयल्सला हरवून बाद फेरीतील स्थान पक्के करण्याचे उद्दिष्ट आहे.
लखनऊने सलग चार विजयांनंतर याआधीच्या लढतीत गुजरातकडून पराभव पत्करला. त्यामुळे केएल राहुलच्या नेतृत्वाखालील हा संघ १६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. याचप्रमाणे १४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावरील राजस्थाननेही याआधीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सकडून हार पत्करली आहे.
सलामीवीर राहुल (४५९ धावा) व क्विंटन डीकॉक (३५५ धावा) हे लखनऊच्या फलंदाजीचे प्रमुख सामथ्र्य आहे. याशिवाय दीपक हुडानेही ३४७ धावा केल्या आहेत. लखनऊकडे सक्षम गोलंदाजीची फळी नसली तरी आवेश खान (१६ बळी), जेसन होल्डर (१३ बळी) व मोहसिन खान (१० बळी) आपली जबाबदारी चोख बजावत आहेत.
राजस्थानची फलंदाजी इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरवर अवलंबून आहे. १२ सामन्यांत तीन शतके आणि तीन अर्धशतकांसह सर्वाधिक ६२५ धावा त्याच्या खात्यावर आहेत. संजू सॅमसन (३२७ धावा), देवदत्त पडिक्कल (२९५ धावा) व शिमरॉन हेटमायर (२९१ धावा) यांच्या सातत्यपूर्ण फलंदाजीला राजस्थानच्या कामगिरीचे श्रेय जाते. गोलंदाजीतही यजुर्वेद्र चहल (२३ बळी) ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत संयुक्त आघाडीवर आहे. प्रसिध कृष्णा (१३ बळी), ट्रेंट बोल्ट (१० बळी) आणि रविचंद्रन अश्विन (९ बळी) अशी तगडी कुमक त्यांच्याकडे आहे.
’ वेळ : सायं. ७.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदूी, सिलेक्ट १ (एचडी वाहिन्यांसह)

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#इडयन #परमयर #लग #करकटबद #फर #पकक #करणयच #लखनऊच #उददषट #आज #बलढय़ #रजसथनश #समन #Indian #Premier #League #Cricket #Lucknow #goal #secure #knockout #stage #Baladhay #face #Rajasthan #amy

RELATED ARTICLES

ड्रेसिंग रूममधील आदळ आपट Mathew Wade ला महागात, मिळाली चुकीची शिक्षा

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) गुरूवारचा दिवस निराशाजनक ठरला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं गुजरातचा 8...

Earbuds Launch: भन्नाट ! या इयरबड्समध्ये करता येणार कॉल रेकॉर्डिंगसह ७ भाषांमध्ये भाषांतर, बड्स देतील ५० तास साथ

नवी दिल्ली: iFLYBUDS Pro: चिनी अॅक्सेसरीज निर्माता iFlyTek ने त्यांचे iFLYBUDS Pro ट्रू वायरलेस इयरबड्स लाँच केले आहेत. डिव्हाइस कॉल रेकॉर्डिंग आणि भाषांतरासह...

अबब! जेठालालचा लुक करून मुलीच्या चेहऱ्याचं नेमकं काय झालं बघा!

मुंबई 19 मे: सब टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आजही घराघरात आवर्जून पाहिला जातो. यातील...

Most Popular

बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, आता साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करतोय ज्युनियर एनटीआर!

Jr. NTR Birthday : साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार ज्युनियर एनटी रामाराव अर्थात ज्युनियर एनटीआर (Jr. NTR ) आज (20...

…. तेरा बाप आया! विराटच्या खेळीनं फॅन्स खूश, सोशल मीडियावर जोरदार सेलिब्रेशन

मुंबई, 20 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) साठी 'करो वा मरो' असलेल्या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) फॉर्म गवसला आहे....

‘मन शांती हे सर्वोत्तम..’ मधुराणीच्या पोस्टपेक्षा गालावरच्या खळीची चर्चा जास्त!

मुंबई, 19 मे- आई कुठे काय करते( Aai kuthe kay karte ) मालिका सततच्या टवीस्टमुळे नेहमी चर्चे असते. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित...

तलावाचा वापर न करता मत्सपालन करा तेही वर्षाला पाचपट फायद्यासह, जाणून घ्या पद्धत

मुरादाबाद, 19 मे : उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला परिसरात एका शेतकऱ्यांने मत्सपालनातून (Fish farming) विक्रमी उत्पादन घेतले आहे. माझोला या...

‘माझ्या कृत्याचा पश्चाताप नाही’, वडिलांनीच मुलगा-सूनेचा संसार संपवला

वडिलांनी असं का केलं? आधी सुखी संसाराचा आशीर्वाद दिला मग मुलाचाच संसार उद्ध्वस्त केला....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Live Updates: मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित

ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ  1 जूनला मध्य प्रदेशात जाणार,  पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ मध्य प्रदेशात जाणार;  चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर, प्रवीण घुगेंसह पदाधिकाऱ्यांचा...