Saturday, November 27, 2021
Home करमणूक इंटेरिअर डिझायनरनं छेडछाड केल्याचा अभिनेत्रीचा आरोप, ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

इंटेरिअर डिझायनरनं छेडछाड केल्याचा अभिनेत्रीचा आरोप, ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल


हायलाइट्स:

  • इंटेरिअर डिझायनरने छेडछाड केल्याचा अभिनेत्रीचा आरोप
  • ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
  • पोलिस करत आहेत तपास

मुंबई : इंटेरिअर डिझायनरने आपली छेडछाड केल्याचा आरोप एका अभिनेत्रीने केला आहे. याप्रकरणी अभिनेत्रीने मुंबईतील ओशिवरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिस आता त्या इंटेरिअरचा शोध घेत आहे. हे प्रकरण गेल्या महिन्यातील म्हणजे जुलै २०२१ मधील आहे. तक्रार दाखल केलेल्या अभिनेत्रीने प्रामुख्याने दाक्षिणात्य सिनेमांत काम केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३५ वर्षांच्या अभिनेत्रीने अंधेरीतील वीरा देसाई मार्गावर नवीन घर विकत घेतले. त्या घराच्या इंटेरिअरचे काम तिने सदर इंटेरिअर डिझायनरला दिले होते. अभिनेत्रीने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती जुलै महिन्यात घराचे काम बघायला गेली होती. घरात जे काम झाले होते ते तिला आवडले नाही. त्यानंतर या अभिनेत्रीने इंटिरीअर डिझायनरला हे काम थांबवण्यास सांगितले.

यावेळी त्या डिझायनरने अपशब्द वापरले आणि तिच्याच घरातून तिला बाहेर काढले. अभिनेत्रीने तिच्या तक्रारीमध्ये असेही म्हटले आहे की या डिझायनरने तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यामुळे त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात विलंब झाला. ओशिवरा पोलिसांनी अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनंतर सदर डिझायनरविरोधात कलम ३५४, ५०४, ५०९ अंतर्गंत तक्रार नोंदवून घेतली आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#इटरअर #डझयनरन #छडछड #कलयच #अभनतरच #आरप #ओशवर #पलस #ठणयत #तकरर #दखल

RELATED ARTICLES

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

Most Popular

यशस्वी-अरमानमुळे मुंबईचा पाचवा विजय

यशस्वी जैस्वाल (७६ चेंडूंत ७८ धावा) आणि कर्णधार अरमान जाफर (१०२ चेंडूंत ७९) यांच्यामुळे मुंबईने २५ वर्षांखालील राष्ट्रीयस्तरीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचवा...

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून ‘त्या’ फोटोचा पर्दाफाश

मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री...

… तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला

कानपूर, 27 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. टीम साऊदीनं (Tim Southee) 5...

गंभीर आजाराशी झुंजतायत अनिल कपूर? जर्मनीतून व्हिडीओ शेअर

अनिल कपूर यांच्या चाहत्यांना मोठा धक्का  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही....

स्वत:ची Car घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, वाहन कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : बहुतांश सर्वसामान्य लोकांची दोन स्वप्नं (Dreams) असतात. स्वतःच्या मालकीचं घर घेणं (Own House) आणि कार (car) घेणं. कार...