Saturday, July 2, 2022
Home क्रीडा इंग्लंडचा मास्टरस्ट्रोक; भारताविरुद्ध निर्णायक कसोटीपूर्वी घेतला मोठा निर्णय

इंग्लंडचा मास्टरस्ट्रोक; भारताविरुद्ध निर्णायक कसोटीपूर्वी घेतला मोठा निर्णय


मुंबई : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून तिसरी आणि शेवटची कसोटी हेडिंग्ले येथे खेळली जाणार आहे. नवीन कर्णधार बेन स्टोक्सच्या नेतृत्वात यजमान इंग्लंडने मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. इंग्लंडचा संघ गुरुवारपासून न्यूझीलंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. पण बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांचे संपूर्ण लक्ष भारताविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यावर आहे असे दिसत आहे. बर्मिंगहॅम कसोटी डोळ्यासमोर ठेवून इंग्लंड संघ व्यवस्थापनाने किवी संघाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी निर्णय घेतला आहे.

जेम्स अँडरसनला लीड्समधील हेडिंग्ले येथे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. ऑली रॉबिन्सनसह अँडरसन हा मालिकेतील पहिल्या चार सामन्यांमध्ये सर्वात मारक गोलंदाज ठरला होता. त्याने अवघ्या २४ च्या सरासरीने १५ विकेट घेतल्या आणि भारतीय फलंदाजांना पूर्णपणे गुडघे टेकण्यास भाग पाडले. त्यामुळे, शक्यतो स्टोक्स आणि मॅक्युलम यांनी अँडरसनला भारताच्या सामन्यासाठी पूर्णपणे फ्रेश ठेवण्यासाठी निर्णय घेतला आहे.

वाचा – असे काय झाले की, टीम इंडियाचे ४ जण भारताविरुद्ध खेळणार; जाणून घ्या

अँडरसनला विश्रांती का?
इंग्लंडविरुद्धच्या अंतिम कसोटी सामन्यापूर्वी बेन स्टोक्सने प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितले, “जिमीसाठी हे दुर्दैवी आहे, पण भारताविरुद्धही आमची मोठी कसोटी आहे. प्रामाणिकपणे किती गंभीर (दुखापत) आहे याची मला खात्री नाही. त्याला फक्त घोटा सुजला आहे.”

वाचा – IND vs ENG: टीम इंडियाची रणनीति ठरली; इंग्लंडविरुद्ध ‘सर’ द्रविडने रचला चक्रव्यूह

बर्मिंगहॅम येथे १ जुलैपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात अँडरसन महत्त्वाची भूमिका बजावेल असे अपेक्षित आहे. लीड्स येथे न्यूझीलंड विरुद्धची तिसरी कसोटीनंतर भारताविरुद्ध सामन्यापूर्वी फक्त ३ दिवस फ्री मिळतील, हेच प्राथमिक कारण आहे की इंग्लंड संघ व्यवस्थापनाने सर्व महत्त्वपूर्ण कसोटीपूर्वी अँडरसनला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.

वाचा – विराटला कोरोना बीसीसीआयने लपवला का? इंग्लंडमध्ये मॅचपूर्वी टीम इंडिया बॅकफूटवर

भारताविरुद्ध अँडरसनचा रेकॉर्ड
सार्वकालिक महान वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा जेम्स अँडरसन आगामी स्पर्धेत इंग्लंडसाठी एक मोठे अस्त्र असेल. भारताविरुद्धच्या १३ सामन्यांमध्ये अँडरसनने ४० धावांत ४ बाद अशी सर्वोत्तम कामगिरी करत एकूण ३४ विकेट्स घेतल्या आहेत.

जेमी ओव्हरटनचे इंग्लंडकडून पदार्पण
अँडरसनच्या जागी जेमी ओव्हरटन गुरुवारी हेडिंग्ले येथे न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत पदार्पण करेल. इंग्लंडचा कर्णधार स्टोक्सने गेल्या आठवड्यात ट्रेंट ब्रिज येथे पाच गडी राखून विजय मिळवून मालिकेत शिक्कामोर्तब करणाऱ्या संघात एकाकी बदलाची पुष्टी केली आणि आता बर्मिंगहॅममधील लढतीसाठी सज्ज असेल.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#इगलडच #मसटरसटरक #भरतवरदध #नरणयक #कसटपरव #घतल #मठ #नरणय

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

Indian Army Agniveer Recruitment 2022 : अग्निवीरांच्या भरतीसाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी सुरु

Indian Army Agniveer Recruitment 2022 : भारतीय लष्करामध्ये आजपासून अग्निपथ योजनेद्वारे अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक...

Smartphone Tips: फोनवर स्क्रॅच पडले आहेत? ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने मिनिटात हटवा

नवी दिल्ली : remove scratches from your phone: नवीन स्मार्टफोन घेतल्यावर त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. फोनसाठी स्क्रीनगार्ड, कव्हर देखील...

दे दणादण… रिषभ पंतने तुफानी फलंदाजी करत केली इंग्लंडची धुलाई, भारताचा धावांचा डोंगर

रिषभ पंत हा कसोटीच्या पहिल्या दिवसाचा हिरो ठरला. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली या अनुभवी फलंदाजांसह शुभमन गिल, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी अपयशी ठरले....

National Doctors’ Day : डॉक्टरांच्या जीवनाची ‘ही’ 4 चक्रे माहित आहेत का? तुमच्या विचारांच्या पलीकडील जग..!

भारत 1 जुलै हा 'नॅशनल डॉक्टर्स डे' (national doctors day) किंवा राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा करतो आणि दरवर्षी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)...

जेलमध्ये नेताना केतकी बरोबर घडलं असं काही भयानक, ऐका तिच्याच तोंडून

मुंबई 1 जुलै: अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale arrest) च्या अटकेनंतर बरंच नाट्य घडलं होतं. या अभिनेत्रीला एका आक्षेपार्ह पोस्टमुळे तब्ब्ल 41 दिवस...