Saturday, August 20, 2022
Home क्रीडा इंग्लंडचा पराभव निश्चित; बर्मिंघम फक्त एकदा असे घडले, भारताला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी

इंग्लंडचा पराभव निश्चित; बर्मिंघम फक्त एकदा असे घडले, भारताला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी


बर्मिंघम: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीला सुरूवात होण्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला होता. कर्णधार रोहित शर्माला करोना झाल्याने तो संघाबाहेर झाला आणि जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपद देण्यात आले. अजिंक्य रहाणे खराब फॉर्ममुळे आधीपासून संघाबाहेर आहे. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांचा धावा करण्याचा संघर्ष सुरू आहे. भारताविरुद्धची पाचवी कसोटी खेळण्याआधी इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धची ३ सामन्यांची मालिका जिंकली होती.

अशा परिस्थितीत असे वाटत होते की इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न यावेळी देखील पूर्ण होणार नाही. पण टीम इंडियाने पाचव्या कसोटीत आतापर्यंत कमाल करून दाखवली आहे. भारताने इंग्लंडचा पहिला डाव फक्त २८४ धावात गुंडाळण्यात यश मिळवले. आता दुसऱ्या डावात भारताने ३ बाद १२५ धावा केल्या आहेत. पहिल्या डावातील ४१६ धावामुळे भारताकडे आता २५७ धावांची आघाडी झाली आहे. यामुळेच भारताने विजयासाठीची सर्व तयारी केल्याचे दिसते.

वाचा- कसोटीत नवा वर्ल्ड रेकॉर्ड: कर्णधार बुमराहकडून स्टुअर्ट ब्रॉडची बेदम धुलाई

बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर आतापर्यंत फक्त एकदाच २५० प्लस धावसंख्येचा यशस्वी पाठलाग झाला आहे. अशी कामगिरी करणारा एकमेव संघ म्हणजे दक्षिण आफ्रिका होय. त्यांनी १४ वर्षापूर्वी २००८मध्ये असे केले होते. तेव्हा द.आफ्रिकेने चौथ्या डावात २८३ धावा केल्या होत्या आणि सामना ५ विकेटनी जिंकला होता.

यामुळेच बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला कसोटी जिंकण्याची सुवर्ण संधी आली आहे. याआधी भारताने २००७ साली कसोटी मालिकेत इंग्लंडचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला होता. तेव्हा राहुल द्रविड कर्णधार होते.

वाचा- जडेजाची ‘तलवार’ इंग्लंडमध्ये चालली; शतकासह…

पहिल्या डावात १४६ धावांची खेळी करणाऱ्या पंतकडून दुसऱ्या डावात देखील मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. दुसऱ्या डावात भारताची सुरूवात खराब झाली. सलामीवीर शुभमन गिल ४ धाावंवर बाद झाला. हनुमा विहारी ११ तर विराट देखील २० धावांवर माघारी परतला.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#इगलडच #परभव #नशचत #बरमघम #फकत #एकद #अस #घडल #भरतल #इतहस #घडवणयच #सवरणसध

RELATED ARTICLES

मुंबईत 111, तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी; काल दिवसभरात 88 गोविंदांवर उपचार करुन डिस्चार्ज

Dahi Handi Festival 2022 : यंदा तब्बल दोन वर्षांनंतर राज्यसभारत दहीहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात...

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

Most Popular

‘आज ‘मुरलीधराचा’ सण आणि…’ सुबोधला मिळाले खास आशीर्वाद

मुंबई, 19 ऑगस्ट : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या कायम चर्चेत आहे. त्याचा 'बस बाई बस' या कार्यक्रमाची सध्या प्रचंड चर्चा आहे....

भुतियाचा भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली : भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बायच्युंग भुतियाने सध्या चर्चेत असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीत थेट अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज...

भारत-झिम्बाब्वे एकदिवसीय मालिका : राहुल सलामीला उतरणार?; झिम्बाब्वेविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिकेत भारताची नवी रणनीती

पीटीआय, हरारे : झिम्बाब्वेविरुद्ध शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार केएल राहुलला फलंदाजीची संधी मिळेल अशी आशा आहे. याचप्रमाणे उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांत...

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...

रोनाल्डो डॉर्टमंडकडे?

वृत्तसंस्था, लंडन : नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जर्मनीतील बोरुसिया डॉर्टमंड क्लबशी करारबद्ध होणार असल्याची शुक्रवारी फुटबॉलजगतात जोरदार चर्चा झाली. अर्थात, या संदर्भात अजून...

क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?

प्रशांत केणी नामांकित क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या साथीने शालेय जीवनात क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या विनोद कांबळीची कारकीर्द २०००मध्ये संपुष्टात आली. बेशिस्त, वाद अशा अनेक प्रसंगांमुळे...