Friday, August 12, 2022
Home टेक-गॅजेट इंग्रजीच नाही, तर आता तुमच्या भाषेतही बनवता येणार Aadhaar Card, जाणून घ्या...

इंग्रजीच नाही, तर आता तुमच्या भाषेतही बनवता येणार Aadhaar Card, जाणून घ्या सोपी प्रोसेस


नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : आधार कार्ड (Aadhaar Card) प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाचं कागदपत्र आहे. प्रत्येक खासगी आणि सरकारी कामासाठी आधार कार्डची गरज लागते. अधिकतर आधार कार्डवर प्रिंटिंग इंग्रजी भाषेत असते. परंतु UIDAI ने आता आधार कार्ड प्रादेशिक भाषांमध्ये बनवण्याची सुविधा सुरू केली आहे.

आता युजर्स आधार कार्ड इंग्रजी, आसाम, उर्दू, पंजाबी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, हिंदी, बंगाली, उडिया, गुजराती या भाषांमध्ये कन्व्हर्ट करू शकतात. आधार कार्डमध्ये भाषा बदलण्यासाठी ऑनलाईन अर्जही करता येऊ शकतो.

आधार कार्डमध्ये भाषा बदलण्यासाठी ठराविक रक्कम भरावी लागेल. आधार कार्डमध्ये नव्या भाषेसाठी अपडेट रिक्वेस्ट सबमिट होईल त्यानंतर नवीन आधार कार्ड डाउनलोड करता येईल. आधार कार्डमध्ये भाषा अपडेट होण्यासाठी जवळपास 1 ते 3 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. आधार सेवा केंद्रातही आधार कार्डमधील भाषा बदलता येऊ शकते.

PUC कडे लक्ष न देणं पडेल भारी, RC सस्पेंडसह भरावा लागेल दंड; जाणून घ्या नवा नियम

ऑनलाईनद्वारे आधार कार्डमध्ये भाषा अपडेट करण्यासाठी –

– आधार कार्डमध्ये अपडेट करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in/ वर भाषेत बदल करता येऊ शकतात.

– इथे Check online demographics update status वर क्लिक करावं लागेल.

– त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक, कॅप्चा कोड टाकून ओटीपीवर क्लिक करावं लागेल.

– रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर 6 अंकी वन-टाईम पासवर्ड येईल. ओटीपी टाकून, लॉगइनवर क्लिक करावं लागेल.

– त्यानंतर ज्या भाषेत आधार कार्ड हवं असेल, त्या भाषेवर क्लिक करा. पुढील प्रोसेस फॉलो करत, अर्ज सबमिट करा.

– Preview करुन संपूर्ण माहिती तपासता येईल. मोबाईलवर पुन्हा OTP येईल, त्यानंतर पुढील प्रोसेस करावी लागेल.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#इगरजच #नह #तर #आत #तमचय #भषतह #बनवत #यणर #Aadhaar #Card #जणन #घय #सप #परसस

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

Most Popular

अभिनेत्री व्हायचं बालपणीचं ठरवलेलं, स्टारकिड असूनही स्वतःच्या बळावर मिळवले चित्रपट!

Sara Ali Khan Birthday : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आज (12 ऑगस्ट) तिचा 27वा...

केळ्याची साल खाल्याने होईल कॅन्सरपासून बचाव; अमेरिकी Nutritionist चा दावा

6 Banana Amazing Benefits : केळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. हे ऊर्जा वाढवणारे फळ आहे. केळं अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये देखील वापरले जाते....

कला विश्वात शोककळा, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायकाचं निधन

नवी दिल्ली : कला विश्वात सध्या मोठ्या घटना घडत आहेत. सगळ्यांना खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू...

तुम्ही धोका दिलात; BCCI च्या निर्णयावर चाहते भडकले, जाणून घ्या झालं

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. ३ सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ लवकरच झिम्बाब्वेला रवाना होणार...

पुढील देशांतर्गत हंगामात अर्जुन गोव्याकडून खेळणार?; मुंबईकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पुढील देशांतर्गत क्रिकेट हंगामात गोव्याकडून खेळण्याची दाट शक्यता आहे. २२ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज...

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये वाटले गेले तब्बल 1.5 लाख Condoms, पण का?

कॉमनवेल्थच्या आयोजकांनी 12 दिवसांत 1.5 लाख कंडोमचं वाटप केलं होतं. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...