मुंबईतील बिकेसी मैदानावर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray bkc sabha ) यांची विराट सभा पार पडली. या सभेत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
‘तिथे औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवलं. यांच्या ए टीम बी टीम पाठवल्या जात आहे. कुणाच्या हातात भों असा सणसणीत टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.गा द्यायचा, कुणाच्या हातात हनुमान चालीसा देणार आणि हे मजा बघत बसणार आहे. आम्ही मग काय टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेण्यासाठी बसलो आहोत का, या तिनपाटांना झेड प्लस सुरक्षा देतात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला.
(14 वर्षीय अल्पवयीन मुलीला उचलून नेऊन सामूहिक बलात्कार, जळगाव हादरलं)
‘तुम्ही ढकललं म्हणून काँग्रेस सोबत गेलो. पण हिंदुत्व नाही सोडलं. हिंदुत्वापुढे आम्हाला सत्ता महत्वाची नाही. तुम्ही पहाटे शपथ घेतली आम्ही उघड गेलो. NDA मध्ये एकही खासदार नसलेले अनेक पक्ष होते. नितीशकुमार म्हणतो की भोंगा बकवास आहे आणि त्यालाही NDA मध्ये घेतलं. काश्मीर मध्ये मुफ्ती महंमद बरोबर सरकार स्थापन केलं, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.
(‘शरद पवार यांच्याबद्दल द्वेषाने गरळ ओकणाऱ्यांचा…. ‘ अमोल कोल्हे केतकीवर भडकले)
‘हे सरकार आता पडेल मग पडेल. याचा विचार करत आहे. पिकलेले आंबे पडले आहे पण सरकार काही पडले नाही. मग शिवसेना यांच्यासोबत जाणार, शरद पवार यांच्यासोबत जाणार, काँग्रेस सोडून जाणार असं तडाखे यांनी बांधले, पण काहीच होत नाही. मग ईडी मागे लावं, सीबीआय मागे लावं, तरी फुटतं नाही. एक सांगतो, तुम्ही जर येड्या वाकड्या वाटेनं आणि खोटे गुन्हे दाखल करून आमच्या माणसाच्या मागे लावणार असाल तर तुम्हाला सोडणार नाही. हा महाराष्ट्र जो पेटेल, पळता भुई थोडी करून सोडणार नाही. हा महाराष्ट्र मेल्या आईचा दूध प्यायलेला नाही. आमच्या मागे लागेल तर सोडणार नाही .कायद्याचा दूरउपयोग करू नका, आम्हीही करत नाही. जर लढायचे असेल तर समोरून या. सरकार कोण करेल, ही जनता ठरवले, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.
तुमच्या शहरातून (मुंबई)
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#आहच #त #सभजनगर #उदधव #ठकरन #नमतरच #वषय #कढल #नकल