Saturday, July 2, 2022
Home भारत आसाममधील शिवसेनेच्या आमदारांना बंगालला पाठवा, त्यांचा योग्य पाहुणचार करू: ममता बॅनर्जी

आसाममधील शिवसेनेच्या आमदारांना बंगालला पाठवा, त्यांचा योग्य पाहुणचार करू: ममता बॅनर्जी


कोलकाता: आसाममधील हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना पश्चिम बंगालला पाठवा, त्यांचा योग्य पाहुणचार करु असा टोला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला लगावला आहे. सत्तेचा गैरवापर करुन भाजपने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रातील उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलं. 

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “असैंविधानिक मार्गाने भाजपकडून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज भाजप सत्तेत आहे, त्यांच्याकडे अधिकार आणि पैसा आहे. भाजपकडून पैसा, सत्ता आणि माफियांचा वापर करुन पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. हे जे काही सुरू आहे ते चुकीचं आहे. पण एक दिवस तुम्हालाही सत्तेतून पायउतार व्हावं लागेल. त्यावेळी तुमचाही पक्ष कोणीतरी फोडेल. आसाममधल्या हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवून द्या,  त्यांचा योग्य पाहुणचार करू.”

आसाममध्ये पूरस्थिती असतानाही महाराष्ट्रातल्या आमदारांना तिकडे पाठवण्यात आलं. त्या ठिकाणच्या लोकांचा भाजप विचार करत नाही असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करून 42 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. यामागे भाजप असून या बंडखोर गटाला भाजपकडूनच आर्थिक रसद पुरवली जात असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. 

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांच्या सोबत गुवाहाटी येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहेत. आजच राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे आणि संजय राठोड गुवाहाटीला पोहोचले असून ते एकनाथ शिंदे गटात सामिल झाल्याचं स्पष्ट झालं आहे. 

 

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#आसममधल #शवसनचय #आमदरन #बगलल #पठव #तयच #यगय #पहणचर #कर #ममत #बनरज

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

कन्हैया लाल हत्याकांडानंतर राजस्थान सरकारचा मोठा निर्णय, 32 IPS अधिकार्‍यांची बदल्या

Rajasthan IPS Transfer : उदयपूरमधील कन्हैया लाल हत्याकांडानंतर राजस्थानमधील वातावरण तापलं आहे. या घटनेनंतर राजस्थान सरकारनं मोठा निर्णय...

इथं ठाकरेंचं, इस्त्राइलमध्ये बेनेट सरकार पडले, साडेतीन वर्षात पाचव्यांदा निवडणुकीची रणधुमाळी

इस्त्राइलमध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांना मतदान करण्याऐवजी पक्षाला मतदान केलं जातं. त्यामुळं आघाडीची सरकार सत्तेवर येतात. आता साडेतीन वर्षात पाचव्यांदा निवडणूक होणार आहे. बेंजामिन...

गर्लफ्रेंडसोबत खाजगी वेळ घालवणं सुपरस्टारला पडलं महागात, 10 वर्षाच्या मुलाकडून करोडोंचं नुकसान

मुंबई : जोडीदारासोबत वेळ घालवणं ही एका नात्यासाठी चांगली गोष्ट आहे. प्रत्येक नवरा-बायकोनं किंवा जोडीदारानं कामात कितीही व्यस्त असलं तरी एकमेकांसाठी वेळ नक्की...

आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प – दीपक केसरकर

पणजी, गोवा : CM Eknath Shinde News : महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केला आहेत. ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे कृषी दिनी मुख्यमंत्री...