Saturday, August 20, 2022
Home करमणूक आषाढी एकादशीनिमित्त 'विठ्ठला तूच' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित!

आषाढी एकादशीनिमित्त ‘विठ्ठला तूच’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित!


मुंबई 6 जुलै: सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या अनेक कलाकार हे विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या विठूरायासाठी वारी करणाऱ्या भक्तांच्या आणि अगदी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणाऱ्या विठ्ठलाचा महिमा अपरंपार आहे असं विठ्ठलाला मानणाऱ्या अनेकांचं म्हणणं आहे. विठ्ठलाप्रमाणेच प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या विठ्ठल शिंदेचा खडतर प्रवास ‘विठ्ठला तूच’ (Viththala Tuch marathi movie) या नव्याकोऱ्या रोमँटिक कथेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विठ्ठला तूच असं जेव्हा विठुरायाला म्हणल जातं तसंच या चित्रपटातील नायकालाही या चित्रपटाच्या कथेने विठ्ठला तूच असं म्हणायला भाग पाडलं आहे.
या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं असून पोस्टर पाहताना त्यावरील व्यक्ती नेमकी कोण आहे हा प्रश्न नक्कीच पडला असेल, तर पोस्टरवरील व्यक्ती ही नवोदित अभिनेता योगेश जम्मा असून त्याचा ‘विठ्ठला तूच’ हा पहिलाच चित्रपट आहे.
हे ही वाचा- 48 वर्षीय अभिनेत्रीकडे 23 वर्षीय निर्मात्याने केली शरीरसुखाची मागणी, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
दिग्दर्शक प्रफुल्ल म्हस्के दिग्दर्शित ‘विठ्ठला तूच’ या चित्रपटाची कथा रोमँटिक असून चित्रपटात विठ्ठला म्हणजेच योगेशचा एकंदरीत प्रवास, आणि त्या दरम्यान जुळून आलेलं त्याच प्रेम आणि त्यानंतर जुळलेल्या प्रेमाचा प्रवास पाहायला मिळणार आहे. तसंच नुकतंच प्रदर्शित झालेलं चित्रपटाचं पोस्टर पाहता पोस्टरवर योगेशचा रावडी लूक पाहायला मिळत आहे. गावातल्या वातावरणात चित्रित झालेला हा चित्रपट गावरान प्रेमाचा तडका दाखवून प्रेक्षकांना भुरळ पाडेल यात शंकाच नाही, अशी प्रतिक्रिया समोर येत आहे.

त्यात योगेशचा रावडी लूक आणि त्याने मांडलेली प्रेमाची परिभाषा पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. या चित्रपटात योगेशसह आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा हर्षित अभिराज यांनी सांभाळली आहे. यातील दमदार गाणी प्रेक्षकांना पाहणं रंजक ठरेल यात शंका नाही.
रोमँटिक चित्रपटाची चलती थोडीशी कमी झालेली असताना पुन्हा एकदा ‘विठ्ठला तूच’ हा चित्रपट प्रेममय भावना मोठ्या पडद्यावर व्यक्त करण्यासाठी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास लवकरच सज्ज होत आहे. तसेच चित्रपटात आणखी कोणते कलाकार प्रेमाचे रंग दाखवणार हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.

Published by:Rasika Nanal

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#आषढ #एकदशनमतत #वठठल #तच #सनमच #पसटर #परदरशत

RELATED ARTICLES

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

Most Popular

‘आज ‘मुरलीधराचा’ सण आणि…’ सुबोधला मिळाले खास आशीर्वाद

मुंबई, 19 ऑगस्ट : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या कायम चर्चेत आहे. त्याचा 'बस बाई बस' या कार्यक्रमाची सध्या प्रचंड चर्चा आहे....

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष, प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा सविस्तर…

Dr. Narendra Dabholkar Murder Case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या...

भुतियाचा भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली : भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बायच्युंग भुतियाने सध्या चर्चेत असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीत थेट अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज...

रोनाल्डो डॉर्टमंडकडे?

वृत्तसंस्था, लंडन : नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जर्मनीतील बोरुसिया डॉर्टमंड क्लबशी करारबद्ध होणार असल्याची शुक्रवारी फुटबॉलजगतात जोरदार चर्चा झाली. अर्थात, या संदर्भात अजून...