Saturday, August 13, 2022
Home टेक-गॅजेट 'आवडीचं काम करून पैसे कमवा'; Twitter देतंय हजारो रुपये जिंकण्याची संधी

‘आवडीचं काम करून पैसे कमवा’; Twitter देतंय हजारो रुपये जिंकण्याची संधी


नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने (Twitter) आपला प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित करण्यासाठी बग बाउंटी कॉन्टेस्टची सुरुवात केली आहे. या कॉन्टेस्टमध्ये 3500 डॉलर म्हणजे जवळपास 2,60,327 रुपयांचं बक्षिस दिलं जाईल. या कॉन्टेस्टचा मुख्य उद्देश सिक्योरिटी रिसर्चर्सद्वारा ट्विटरच्या अल्गोरिदममध्ये असणाऱ्या त्रुटींची माहिती काढणं असा आहे. ट्विटरवर एक चूक शोधून हजारो रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.

ट्विटरवर कोणत्याही प्रकारच्या त्रुटीची ओळख करण्यासाठी कंपनीने आपलं अल्गोरिदम पब्लिक केलं आहे. या ओपन अल्गोरिदममुळे संभाव्य तोटे ओळखण्यास मदत होणार आहे. यासाठी संबंधित कम्युनिटीला एकत्र करुन, त्यांना प्रोत्साहित करुन संभाव्य त्रुटींमध्ये बदल करण्यासाठी अल्गोरिदम पब्लिक करण्यात आलं आहेत.

रिसर्च आणि हॅकर कम्युनिटीद्वारे जनतेच्या सुरक्षेसाठी त्रुटींची ओळख करुन, त्या कमी करण्यासाठी मदत होणार आहे. ट्विटरवर येणाऱ्या समस्या कमी करणं हाच या कॉन्टेस्टचा प्रमुख उद्देश आहे. ट्विटर युजर्स ट्विटरवर एखादी त्रुटी आढळल्या, ती समोर आणू शकतात. यातील बग बाउंटी कॉन्टेस्टच्या विजेत्यांची नावं 8 ऑगस्ट रोजी ट्विटरद्वारा आयोजित एका वर्कशॉपमध्ये जारी केली जाणार आहेत. विजेत्यांना HackerOne कडून कॅश प्राइज दिलं जाईल. यात पहिल्या विजेत्याला 3,500 डॉलर, दुसऱ्या विजेत्याला 1,000 डॉलर, तिसऱ्या विजेत्याला 500 डॉलर, मोस्ट इनोव्हेटिव्ह विजेत्याला 1000 डॉलर दिले जाणार आहेत. ट्विटरच्या या कॉन्टेस्टमध्ये 6 ऑगस्टपर्यंत भाग घेता येऊ शकतो.

Microsoft मध्ये सांगितली मोठी त्रुटी, कंपनीने 20 वर्षीय तरुणीला दिले 22 लाख रुपये

बग बाउंटी प्रोग्राम मोठ्या कंपन्यांकडून ठेवलं जातं. याअतंर्गत मोठ्या कंपन्यांच्या वेबसाईट किंवा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर त्रुटी रिपोर्ट केल्यानंतर बक्षिस दिलं जातं. यात एखाद्या बग बदद्ल किंवा त्रुटीबदद्ल कंपनीला सांगावं लागतं आणि त्याचे डिटेल्स द्यावे लागतात. त्यानंतर कंपनी ठरवते की ती त्रुटी किती गंभीर आहे. एखाद्याने सांगितलेली त्रुटी किंवा बगची गंभीरता पाहून बक्षिसाची रक्कम ठरवली जाते.

भारतात यापूर्वीही फेसबुक आणि इतर कंपन्यांकडून लोकांना बक्षिस दिलं गेलं आहे. फेसबुकवर बग शोधून बक्षिस मिळवणाऱ्यांमध्ये भारतीय डेव्हलपर किंवा हॅकर्स सर्वात पुढे आहेत.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#आवडच #कम #करन #पस #कमव #Twitter #दतय #हजर #रपय #जकणयच #सध

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

बहिणीचा शेवटचा फोन, मुलीचा व्हिडिओ कॉल… राजौरीतील 4 शहीद जवानांची कहाणी

Rajouri Terror Attack: 21 वर्षीय रायफलमन निशांत मलिकने बुधवारी व्हिडिओ कॉलवर हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील हांसी शहरात आपल्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्याच्या बहिणीने गुरुवारी...

Ranveer Singh Special Report : कुठे आहे रणवीर सिंग? मुंबई पोलिसांकडून शोध ABP Majha

<p>न्यूड फोटोशूट करणाऱ्या अभिनेता रणवीर सिंह याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे... याचं कारण न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंहच्या घरी चेंबूर पोलिसांनी नोटीस दिली.. रणवीर...

ट्विट करत व्यक्त केला संताप

Ekda Kai zal Movie: संगीतकार सलील कुलकर्णी आणि अभिनेता सुमीत राघवन यांची मुख्य भूमिका असलेला 'एकदा काय झालं'...

तुमचं लग्न दीर्घकाळ टिकेल की नाही? असं तपासा तुमच्या नात्याचं आयुष्य

मुंबई, 12 ऑगस्ट : हल्ली आपली नाती खूप संवेदनशील झाली आहेत. नाती जितक्या लवकर जुळतात तितक्याच लवकर ती तुटतातही. लोक एकमेकांना समजून न घेता...

रोज किती पावलं चाललात तर तुम्ही फिट राहू शकता? त्यामागचं गणित माहितीये?

चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी चालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

सज्ज व्हा! लिजेंड्स पुन्हा मैदानात, पुन्हा चौकार षटकारांची आतिषबाजी

LCL 2022: लीजेंड्स क्रिकेट लीगचा (legends cricekt league 2022) दुसरा हंगाम यंदा भारतात खेळवला जाणार आहे. 16 सप्टेंबरला एका विशेष सामन्याने स्पर्धेची शानदार...