Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास


पुणे : आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.  त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  बालाजी तांबे यांनी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी मोठं कार्य केलं. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केले आहे. बालाजी तांबे यांनी मेकॅनिकल इंजिनीअरचीही डिग्री घेतली होती. 

लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांची सेवा केली. अनेक आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांनी उपचार केले. विविध आयुर्वेदिक औषधांची संशोधन करुन त्यांनी निर्मितीही केली. त्यांच्या देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही रुग्ण उपचारासाठी येत असत. 

माझा कट्टा : मेकॅनिकल इंजिनीअर ते आयुर्वेदाचार्य… डॉ. बालाजी तांबे यांचा प्रवास

काही दिवसांपूर्वीच बालाजी तांबे हे एबीपी माझाच्या प्रसिद्ध अशा माझा कट्टा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी अनेक किस्से एबीपी माझाच्या प्रेक्षकांसोबत शेअर केले होते. मोठ्या कष्टाने त्यांनी ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ निर्मिती केली होती. जागा खरेदी करण्यासाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवले होते. दागिने गहाण ठेऊन जागा विकत घेतली मात्र तेथे पूर्ण बांधकाम करण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे सुरुवातीला येणाऱ्या रुग्णांसाठी एमटीडीसीचे बंगले भाड्याने त्यांनी घेतले होते. त्यानंतर हळूहळू मिळणाऱ्या पैशातून आश्रमाची उभारणी केली, अशी माहिती डॉ. बालाजी तांबे यांनी दिली होती. 

आयुर्वेद, योग शिक्षणातून पिढी घडवणारा आरोग्यपूजक, मुख्यमंत्र्यांची डॉ. बालाजी तांबे यांना श्रद्धांजली

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. त्यांची दर्जेदार औषध निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देश, विदेशातही प्रसार केला. आहार, विहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हा संदेश त्यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवला. अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#आयरवदचरय #बलज #तब #यच #नधन #वयचय #वय #वरष #घतल #अखरच #शवस

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Most Popular

एकनाथ शिंदेंना खरंच मोठा झटका? व्हायरल पत्रामुळे संभ्रम वाढला

मुंबई, 1 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर...

नीरजचा आणखी एक धमाका, फक्त १६ दिवसात मोडला स्वत:चा विक्रम आणि जिंकले पदक

स्टॉकहोम (स्वीडन): टोकियो ऑलिंम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा(Neeraj Chopra )ने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. स्टॉकहोम डायमंड लीग(Stockholm Diamond League)मध्ये नीरजने ८९.९४ मीटर...

भारतासाठी डावे ठरले उजवे… रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी रचला इंग्लंडमध्ये मोठा विक्रम

रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा या दोघांनी भारताच्या डावाला आधार दिला आणि त्यानंतर चांगला आकार देण्याचेही काम त्यांनी चोखपणे बजावले. कारण भारताचे पाच...

मासे खाणाऱ्यांना ‘हे’ आजार कधीही होत नाहीत, याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घ्या

मुंबई : वेज आणि नॉनवेज असं दोन प्रकारचं अन्न खाणारे लोक असतात, हे तर आपल्याला माहित आहे. त्यात बरेचसे असे नॉनवेज खाणारे लोक...

WhatsApp कॉलिंग दरम्यान डेटा लवकर संपतो? सेटिंगमध्ये करा ‘हा’ छोटासा बदल

नवी दिल्ली :WhatsApp call: इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp यूजर्सची संख्या मोठी आहे. आता WhatsApp चा वापर केवळ चॅटिंग, फोटो-व्हिडिओ पाठवण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही....

रणबीरच्या शमशेरा चित्रपटात ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार महत्त्वाची भूमिका

मुंबई, 1 जुलै : अभिनेता रणबीर कपूरच्या 'शमशेरा' या (Shamshera look) आगामी चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. अभिनेता  रणबीर कपूर (Ranbir Kapoor),...