Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या आयटी कायद्यतील दुरूस्तीचे समाजावर भयानक परिणाम, हायकोर्टात दाखल याचिकांवर एकत्रित सुनावणी

आयटी कायद्यतील दुरूस्तीचे समाजावर भयानक परिणाम, हायकोर्टात दाखल याचिकांवर एकत्रित सुनावणी<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> केंद्र सरकारनं माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत आणलेल्या सुधारित डिजिटल मीडिया एथिक कोड नियमांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकारांवर आक्रमण होत आहे, ज्याचे परिणाम फार भयानक होतील असा दावा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे. केवळ सरकारवर होणारी टिका रोखण्यासाठीच ही सुधारणा केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकिल दरायस खंबाटा यांनी केला. तसेच केंद्र सरकार असे नियम आणून एकप्रकारे ऑनलाईन कंटेंटवर नियंत्रण आणू पहात आहे. मात्र त्यासाठी आधीपासून अस्तित्वात असलेली यंत्रणा पुरेशी असून ती सक्षम आहे, असंही ते पुढे म्हणाले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं उल्लंघन यामधून होत असल्याचा आरोप करत याप्रकरणी काही वृत्तसंस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे.</p>
<p style="text-align: justify;">केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यात नवीन नियमावली तयार केली आहे. मात्र यातील कलम 9, 14 आणि 16 यांना विरोध करत देशभरातील विविध हायकोर्टात याचिका दाखल झाल्या आहेत. यामध्ये नव्या कायद्यानं तपास यंत्रणांना जादा अधिकार दिले असून एकप्रकारे संबंधित माध्यमांवर थेट कारवाई करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र यामध्ये गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून धार्मिक किंवा मानहानीच्या आरोपातून मनमानी पध्दतीनं माध्यमांवर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे तपास अधिकाऱ्यांनाच न्यायव्यवस्थेसमान अधिकार देऊन काय बदनामीकारक आहे आणि काय नाही?, हे ठरवता येणार आहे. या नियमांना जेष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि ‘द लिफलेट डिजिटल’ या वृत्तसंस्थेमार्फत याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलं आहे. मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. याचिकादारांच्यावतीनं ज्येष्ठ कायदेतज्ञ दरायस खंबाटा यांनी बाजू मांडली. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 (समानतेचा हक्क), 19 अ (अभिव्यक्ती स्वातंत्र्य) आणि व्यवसाय करण्यातील स्वातंत्र्य 19 (1) (जी) या मुद्यांवर याचिका ही केलेली आहे. नव्या नियमांमुळे माध्यमांच्या मूलभूत अधिकारांवर बाधा येत आहे, असा युक्तिवाद खंबाटा यांनी हायकोर्टापुढे केला.</p>
<p style="text-align: justify;">मात्र, मुंबईसह अन्य उच्च न्यायालयांत याचसंदर्भात एकूण दहा याचिका दाखल झाल्या आहेत, कोर्टानं केंद्र सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दिलेत, मात्र कुठल्याही हायकोर्टानं या कायद्याला स्थगिती दिलेली नाही, अशी माहिती एएसजी अनिल सिंह यांनी हायकोर्टाला दिली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी व्हावी, अशी याचिका केंद्र सरकारनकडनं केलेली आहे. यावर आजच सुनावणी होणं अपेक्षित आहे, असं अनिल सिंह यांनी हायकोर्टाला सांगितलं. याची दखल घेत हायकोर्टानं सुनावणी तूर्तास आज दुपारपर्यंत तहकूब केली आहे.</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#आयट #कयदयतल #दरसतच #समजवर #भयनक #परणम #हयकरटत #दखल #यचकवर #एकतरत #सनवण

RELATED ARTICLES

देहविक्री करून सैन्याला आर्थिक मदत करताहेत या महिला; काय आहे नक्की प्रकरण? वाचा

खार्किव : Ukraine Women:अनेक वेळा महिलांना बळजबरीने देहविक्री करावी लागते. आपल्या सन्मानाला सौदा करणे इतके सोपे नाही. अनेक महिलांना या परिस्थितीला मजबूरीने सामोरे...

Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त

मुंबई, 4 जुलै: शरीराला तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी आणि चरबी कमी (Fat Lose) करण्यासाठी व्यायाम (Exercise) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आपणा सर्वांना...

200 मीटर खोल दरीत कोसळली बस; शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

Kullu Bus Accident : हिमाचलल प्रदेशच्या (Himachal Pradesh) कुल्लूमध्ये (Kullu) भीषण अपघात झाला आहे. कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेनं...

Most Popular

Femina Miss India Winner: ‘या’ सौंदर्यवतीच्या नावे ‘मिस इंडिया’चा किताब; जाणून घ्या तिचं नाव, गाव

Femina Miss India Winner: सौंदर्यस्पर्धांमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या Femina Miss India च्या अंतिम फेरीमध्ये कर्नाटकच्या सिनी शेट्टी (Sini Shettyy) हिला विजेतेपद मिळालं. सिनीला...

‘भगतसिंग यांच्या फाशीवेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला, तसा राज्यपालांना…’

मुंबई 04 जुलै : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या बंडानंतर ठाकरे सरकार (Thackeray...

आज पंजाबमध्ये मान सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार, ‘या’ नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी

Punjab Cabinet : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या मान सरकारल आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळं आज पंजाबमध्ये...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

मुंबईसह कोकणात पावसाची हजेरी, इतर भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

Maharashtra Mumbai Rains LIVE : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं...

Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त

मुंबई, 4 जुलै: शरीराला तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी आणि चरबी कमी (Fat Lose) करण्यासाठी व्यायाम (Exercise) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आपणा सर्वांना...