Saturday, May 21, 2022
Home क्रीडा 'आम्ही नाराज आहोत...' वानखेडे स्टेडिअममधील घोळावर CSK ची मोठी प्रतिक्रिया

‘आम्ही नाराज आहोत…’ वानखेडे स्टेडिअममधील घोळावर CSK ची मोठी प्रतिक्रिया


मुंबई, 13 मे : चेन्नई सुपर किंग्सला मुंबई इंडियन्स विरूद्धच्या मॅचमध्ये (CSK vs MI) DRS नसल्याचा फटका बसला. सीएसकेच्या इनिंगमधील पहिल्या दोन ओव्हरमध्ये डीआरएसची सोय उपलब्ध नव्हतीा. त्यामुळे सीएसकेला संधी असूनही मैदानातील अंपायरच्या विरोधात थर्ड अंपायरकडं दाद मागता आली नाही. हा सर्व दुर्दैवी प्रकार होता, अशी प्रतिक्रिया सीएसकेचे कोच स्टिफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी दिली आहे.
काय घडला प्रकार?
वानखेडे स्टेडिअमवर गुरूवारी झालेल्या मॅचच्या सुरूवातीला लाईट गेले होते. रोहित शर्मा आणि एमएस धोनी टॉससाठी मैदानात आले तेव्हाच वानखेडे स्टेडियमवरचे लाईट गेले, त्यामुळे टॉसही उशिरा झाला.फक्त टॉसवेळीच नाही तर मॅच सुरू झाल्यानंतरही वीजेच्या समस्येचा फटका बसला. लाईट नसल्यामुळे सुरूवातीला डीआरएसचा (DRS) वापरही करता आला नाही. टॉस जिंकून पहिले बॉलिंग करणाऱ्या मुंबईने पहिल्या 2 ओव्हरमध्येच सीएसकेला 3 धक्के दिले. डॅनियल सॅम्सने पहिल्या ओव्हरमध्ये डेवॉन कॉनवे आणि मोईन अलीला तर बुमराहने दुसऱ्या ओव्हरमध्ये रॉबिन उथप्पाला आऊट केलं.
डेवॉन कॉनवे (Devon Conway) आणि रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) यांना अंपायरने एलबीडब्ल्यू आऊट दिलं, या दोघांनाही डीआरएस घ्यायचा होता, पण लाईट नसल्यामुळे त्यांना ही सुविधा वापरता आली नाही. रिप्लेमध्ये डेवॉन कॉनवेला टाकलेला बॉल लेग स्टम्पच्या बाहेर जात असल्याचं दिसत होतं, पण मैदानातल्या अंपायरने आऊट दिल्यामुळे कॉनवेला पॅव्हेलियनमध्ये जावं लागलं.
IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सला निर्णायक टप्प्यात धक्का, मॅच विनर टीममधून आऊट
काय म्हणाला फ्लेमिंग?
सीएसकेचा हेड कोच स्टिफन फ्लेमिंगनं मॅचनंतर याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे. ‘त्यावेळी घडलेला प्रकार दुर्दैवी होता. आम्ही या प्रकरामुळे थोडे नाराज आहोत, पण हा सर्व खेळाचा भाग आहे. त्यावेळी मैदानात घडलेल्या काही गोष्टी आमच्या बाजूनं गेल्या नाहीत. आम्ही त्या परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी करायला हवी होती.  ती चांगली सुरूवात नव्हती,’ या शब्दात फ्लेमिंगनं नाराजी व्यक्त केली आहे.
‘अनेक टीमप्रमाणे आम्हीही अद्याप खेळाडूंचा अंदाज घेत आहोत. या अनुभवातून पुढील सिझनमध्ये चांगली कामगिरी करू अशी आशा आहे. चांगला सिझन आणि खराब सिझन यामध्ये फार फरक नसतो. हा आमच्यासाठी खडतर सिझन होता. काही गोष्टींमध्ये आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे,’ असे फ्लेमिंगने सांगितले. मुंबई इंडियन्स विरूद्ध झालेल्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#आमह #नरज #आहत #वनखड #सटडअममधल #घळवर #CSK #च #मठ #परतकरय

RELATED ARTICLES

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

Most Popular

BMC Election 2022 : आपनं कंबर कसली; दिल्ली, पंजाबनंतर आता मुंबई जिंकण्यासाठी सज्ज

Mumbai Mahapalika Election 2022 : संपुर्ण देशाचं लक्ष लागलेलं शहर म्हणजे मुंबई (Mumbai) शहर. या मुंबई शहरात आगामी...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत...

पुण्यात CNG दरवाढ, सदाभाऊंची पुन्हा केतकीच्या पोस्टवर टिप्पणी TOP News

मुंबई, 21 मे : राज्यसभेसाठी शिवसेना नेते संजय राऊत यांना चौथ्यांदा संधी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या जागेसाठी संजय राऊत यांनी आपली भूमिका...

छातीत दुखण्याची ही आहेत 5 कारणं; वेळीच सावध व्हा !

Chest Pain Recognization : आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक कारणांमुळे शारीरिक समस्या उद्भवू लागतात. अचानक सांधे दुखू लागतात, मानेचा...

Infinix Smartphones: Note 12 लाँच करण्याच्या तयारीत Infinix , पाहा Flipkart वर कधी सुरु होणार सेल

नवी दिल्ली:Infinix Note 12 : Infinix कंपनीच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या Note 12 स्मार्टफोनच्या रिलीजच्या तारखेवरून अखेर पडदा उठला असून कंपनीने Note 12 आणि...