मुंबई: शिवसेना विरोधात आता बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही असा इशाराच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला दिला आहे. खरी शिवसेना आणि शिवसैनिक आम्हीच असून कुणाला घाबरवायचा प्रयत्न करताय असा सवालही त्यांनी विचारला आहे. शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करा अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांना दिले आहे. कायदे आम्हीही जाणत असं सांगत एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यांचा दाखला दिला आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
कायदा आम्हीही जाणतो, तुमच्या असल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आणि शिवसैनिक आहोत. कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो. घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हिप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.
कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय?
तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो!
घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही.
यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.#RealShivsainik
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
पक्षाविरोधात बंड केलेल्या 12 आमदारांच्या विरोधात कारवाई करा, त्याचं सदस्यत्व रद्द करा अशा आशयाचे पत्र शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना देण्यात आलं आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी याबाबतची माहिती दिली असून पहिल्या टप्प्यात 12 नावं दिली, उरलेल्यांवर पण कारवाईची मागणी करु, असेही त्यांनी सांगितलं आहे.
सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस असलेल्या यादीतील नावं
1 ) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार
3) संदीपान भुमरे
4) प्रकाश सुर्वे
5) तानाजी सावंत
6) महेश शिंदे
7) अनिल बाबर
8) यामिनी जाधव
9) संजय शिरसाट
10) भरत गोगावले
11) बालाजी किणीकर
12) लता सोनावणे
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#आमह #तमचय #धमकयन #भक #घलत #नह #खर #शवसन #आमचच #एकनथ #शदच #इशर