Thursday, May 26, 2022
Home भारत ''आम्ही कोणाच्या रिमोट कंट्रोलनं...'', Navneet Rana पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये

”आम्ही कोणाच्या रिमोट कंट्रोलनं…”, Navneet Rana पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये


नवी दिल्ली, 14 मे: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Amravati MP Navneet Rana) यांनी दिल्लीतील कॅनॉट प्लेस (Connaught Place) येथील हनुमान मंदिरात (Hanuman Temple) हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठण केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती आणि महाराष्ट्राचे आमदार रवी राणाही (Maharashtra MLA Ravi Rana) उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी आरती केली आहे.

राणा दाम्पत्याने यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राणा दाम्पत्य कोणाच्याही रिमोट कंट्रोलने चालणाऱ्यांपैकी नाही. भाजपच्या ही नाही. ते पुढे म्हणाले की, आज आपण महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून मुक्त करण्यासाठी हनुमान चालीसाचे पठण करत आहोत. मी तुरुंगात असताना दररोज 101 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायची. कोणत्याही निर्दोषाने तुरुंगात जावे असे मला वाटत नाही.

नवनीत राणांचं उद्धव ठाकरेंना पुन्हा आव्हान

खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं, आजच्या शिवसेनेच्या सभेचा टिझर पाहिला. त्यात उद्धव ठाकरे म्हणतात तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडण्याचं काम मी करतो. जर इतकी ताकद आहे तर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांचे दात आधी तोडून दाखवा तर तुम्हाला मानेल. असं म्हणत नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. दिल्लीतील कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना नवनीत राणा यांनी हे विधान केलं आहे.

नवनीत राणा यांनी पुढे म्हटलं, उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्रावर संकट आलेलं आहे. हे संकट दूर करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे. ज्या-ज्या ठिकाणी हनुमान चालीसा मला बोलता येईल त्या ठिकाणी मी बोलणार. मला बंद करण्यासाठी 14 दिवस कमी पडतील. दिल्लीतील हे एक प्राचीन मंदिर आहे आणि त्यामुळे आम्ही येथे महाआरती करत आहोत.

23 एप्रिलला झाली होती अटक

राणा दाम्पत्याने गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. शिवसैनिकांच्या निदर्शनानंतर मुंबई पोलिसांनी पती-पत्नीविरुद्ध देशद्रोह आणि इतर आरोपांखाली एफआयआर नोंदवून 23 एप्रिल रोजी त्यांना अटक केली. मात्र, नंतर मुंबईतील विशेष न्यायालयाने अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांना 4 मे रोजी जामीन मंजूर केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#आमह #कणचय #रमट #कटरलन #Navneet #Rana #पनह #एकद #लईमलईटमधय

RELATED ARTICLES

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Most Popular

IPL 2022 मध्ये दोन भावांच्या दोन कहाण्या, एक हिरो तर दुसरा झिरो!

मुंबई, 25 मे : आयपीएल 2022 आता (IPL 2022) शेवटच्या टप्प्यावर आली आहे. स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळत असलेल्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ...

शिवसेनेचा खरा शत्रू भाजप नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी; रायगड युवासेना अध्यक्षांचं वक्तव्य

<p><strong>रायगड :</strong> राज्यात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. त्यातही शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार टीका आणि आरोप-प्रत्यारोपांच्या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण

लंडन, 26 मे : कोरोना काळात बऱ्याच लोकांनी वर्क फ्रॉम होम (Work from home side effect) केलं. काही ऑफिसेस आता सुरळीत झाले असले तर...

दीपूला सानिकाने धक्का दिल्याचं सत्य येणार इंद्रासमोर? काय घडणार येत्या भागात?

मुंबई, 26 मे:  'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu zhal)  मालिकेला सध्या भावनिक वळण आलं आहे. लाडक्या दीपूचा अपघात झाल्यानं सगळ्यांना मोठा...

पांढरे केस तोडल्याने आणखी वाढतात?, काय आहे यामागील सत्य

अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, पांढरे केस तोडल्याने आणखी वाढू लागतात, पण यात काही तथ्य आहे का? अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...