Friday, May 20, 2022
Home करमणूक ‘आमने सामने’चा शतकमहोत्सव | Centenary celebrations Aamne Samne entertainment drama Comedy Gadkari...

‘आमने सामने’चा शतकमहोत्सव | Centenary celebrations Aamne Samne entertainment drama Comedy Gadkari Rangaitan Thane amy 95मुंबई : खुसखुशीत मनोरंजनाची मेजवानी घेऊन आलेल्या ‘आमने सामने’ या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं हे धमाल विनोदी नाटक रविवार, १५ मे रोजी दुपारी ४.३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे येथे आपला शतकमहोत्सवी आनंद सोहळा साजरा करणार आहे. ‘आमने सामने’मध्ये लग्नसंस्थेवर मार्मिक भाष्य करण्यात आले आहे. या शतकमहोत्सवी प्रयोगाला ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेता-कवी जितेंद्र जोशी, आरजे दिलीप, दिग्दर्शक रवी जाधव, लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
झी नाटय़गौरव आणि म. टा. सन्मान सोहळ्यांत सर्वोत्कृष्ट नाटकासहित सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आणि साहाय्यक अभिनेत्री या पुरस्कारांवर या नाटकाने आपले नाव कोरले आहे. आगामी सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कारांमध्येसुद्धा सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, साहाय्यक अभिनेत्री, साहाय्यक अभिनेता, नेपथ्य आणि प्रकाशयोजना अशी आठ नामांकने या नाटकाने पटकावली आहेत. विशेष म्हणजे ‘आमने सामने’ची आगामी आंतरराष्ट्रीय संमेलनांतही निवड झाली असून, यानिमित्ताने नाटकाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. ऑगस्टमध्ये अमेरिकेतील न्यू जर्सी अटलांटिक सिटी येथे होणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनात तसेच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे २२, २३, २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनात या नाटकाची निवड झाली आहे.
मंगेश कदम, लीना भागवत, मधुरा देशपांडे, रोहन गुजर यांच्या अभिनयाने रंगलेल्या ‘आमने सामने’मध्ये मागच्या पिढीने काळानुसार नव्याचा स्वीकार करायला हवा, हा विचार रंजकरीत्या मांडलेला आहे. दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांनी या नाटकात लग्नासारखा महत्त्वाचा विषय हाताळत प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त केले आहे. सादरकर्ते अवनीश व अथर्व प्रकाशित या नाटकाची निर्मिती ‘नाटक मंडळी’ या नाटय़संस्थेने केली आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#आमन #समनच #शतकमहतसव #Centenary #celebrations #Aamne #Samne #entertainment #drama #Comedy #Gadkari #Rangaitan #Thane #amy

RELATED ARTICLES

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

Most Popular

Monkeypox Outbreaks : आफ्रिकेत ‘मंकीपॉक्स’चा उद्रेक! नवीन रोगामुळे शास्त्रज्ञांसमोर आव्हान

Monkeypox Outbreaks : गेल्या दोन वर्षांपासून, संपूर्ण जग आधीच कोरोना (Corona) महामारीने हैराण झाले आहे आणि लाखो लोकांना...

IPL 2022 : RCB च्या विजयाने आणखी दोन टीमचा द एण्ड, प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटाकडे येऊन ठेपली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) या...

…. तेरा बाप आया! विराटच्या खेळीनं फॅन्स खूश, सोशल मीडियावर जोरदार सेलिब्रेशन

मुंबई, 20 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) साठी 'करो वा मरो' असलेल्या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) फॉर्म गवसला आहे....

अजय-अतुलमुळे झाला होता ‘पुष्पा’फेम गायकाचा बॉलिवूड डेब्यू

मुंबई 19 मे- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा गायक सिड श्रीराम (Sid Sriram) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.  अत्यंत गोड आणि...

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...

बॉक्सर निखत झरीनचा ‘गोल्डन पंच’; जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

भारताच्या निखत जरीनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...