Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या आमदार रमेश लटके यांच्यावर अंत्यसंस्कार; मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबियांचं सांत्वन

आमदार रमेश लटके यांच्यावर अंत्यसंस्कार; मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबियांचं सांत्वन


मुंबई : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्यावर आज (13 मे) मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह रमेश लटके यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. आज सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्र्यांनी रमेश लटके यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते.

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके बुधवारी (11 मे) संध्याकाळी दुबईत हृदयविकाराने निधन झालं. ते दुबईला आपल्या कुटुंबासह फिरायला गेले होते. परंतु तिथेच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यात 21 एप्रिल रोजी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. ते मूळचे ​कोल्हापुरातील शाहूवाडीचे होते. 

निधनानंतर रमेश लटके यांचं पार्थिव दुबईहून मुंबईत आणण्यात आलं. त्यानंतर आमदार भवन इथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांनी आमदार रमेश लटके यांना श्रद्धांजलीही वाहिली. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांचीही उपस्थिती होती. एक कडवट शिवसैनिक गमावल्याच्या भावना यावेळी उपस्थित शिवसेना नेत्यांनी व्यक्त केली.

Ramesh Latke Death : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

Ramesh Latke : गटप्रमुख ते आमदार! दांडगा जनसंपर्क; रमेश लटकेंचा अफलातून राजकीय प्रवास

रमेश लटके यांच्या निधनाने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दांडगा जनसंपर्क असलेल्या आमदाराच्या निधनाने मतदारसंघात देखील शोककळा पसरली आहे. 52 वर्षात त्यांचा राजकीय प्रवास मात्र भन्नाट होता. शिवसेनेचा अंधेरी भागातला एक विश्वासू चेहरा अशी त्यांची ओळख होती. एक नजर टाकूया रमेश लटके यांच्या राजकीय कारकिर्दीवर

सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष ते आमदार
– रमेश लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 
– गटप्रमुख ते आमदार असा त्यांचा अफलातून राजकीय प्रवास होता. 
– या प्रवासादरम्यान त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक ही आणि अशी विविध पदं यशस्वीरित्या भूषवली. 
– रमेश लटके यांनी 1997 ते 2012 अशा सलग 3 वेळा नगरसवेक पद भूषवलं. 
– त्यानंतर 2014 मध्ये लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

तीन वेळा नगरसेवक, सलग दोन वेळा आमदार
– 1997 साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून लटके हे निवडून आले. 
– त्यानंतर 2002 आणि 2009 च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत ते महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. 
– तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. 
– त्यानंतर 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#आमदर #रमश #लटक #यचयवर #अतयससकर #मखयमतरयकडन #कटबयच #सतवन

RELATED ARTICLES

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Most Popular

MNS Teaser : पु्यातील सभेचा नवा टीजर, राज ठाकरे भात्यातील कोणता बाण बाहेर काढणार? ABP Majha

<p>पु्यातील सभेचा नवा टीजर, राज ठाकरे भात्यातील कोणता बाण बाहेर काढणार?</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम असेल तर चुकून पण खाऊ नका या गोष्टी; त्रास जास्तच वाढेल

नवी दिल्ली, 21 मे : बद्धकोष्ठता ही पोटाची एक सर्वसामान्य समस्या आहे, जी जगभरातील सुमारे 27 टक्के लोकांना त्रास देत आहे. साधारणपणे, बद्धकोष्ठतेचा...

Flipkart Sale: अवघ्या ६,९९९ रुपयांमध्ये घरी येईल मॉडर्न फीचर्ससह पॅक्ड Smart TV, ‘ही’ कंपनी देतेय खास ऑफर, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Smart Tv Offers: जर तुम्हाला नवीन Smart TV वर अपग्रेड करायचे असेल तर, तुमच्यासाठी एक भन्नाट संधी लवकरच उपलब्ध होणार आहे....

IPL 2022 : गावसकर यांच्या वक्तव्यानं नवा वाद, कॉमेंट्री पॅनलमधून हटवण्याची मागणी

मुंबई, 21 मे : टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांचे नाव क्रिकेट विश्वात आदरानं घेतलं जातं. गावसकर निवृत्त झाले तेव्हा...

iPhone Offers: आतापर्यंतची बेस्ट डील ! १,००० रुपयांत घरी न्या iPhone SE, सोबत, 12 Mini, 13 Mini वर सुद्धा जबरदस्त डिस्काउंट

नवी दिल्ली: Best iPhone Deal: तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन प्रेमी असाल, आणि जर Apple iPhones तुम्हाला विशेष आवडत असतील तर, ते खरेदी करण्याची एक...

गावस्करांकडून ‘गलती से मिस्टेक’, कॉमेंट्री करताना हे काय बोलून गेले सुनील गावस्कर

खेळाडूवर पत्नीबद्दल अयोग्य कमेंट केल्याबद्दल गावसकर यांच्यावर टीका करण्यात येतेय. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...