Monday, July 4, 2022
Home करमणूक 'आमदार गुजरातमध्ये विकायला जातात, कारण तिथूनच बोली लावणारे येतात', कॉमेडियनच्या ट्वीटची चर्चा

‘आमदार गुजरातमध्ये विकायला जातात, कारण तिथूनच बोली लावणारे येतात’, कॉमेडियनच्या ट्वीटची चर्चा


मुंबई- महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाने पक्ष हादरला आहे. एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याचमुळे भविष्यात महाविकास आघाडीचं सरकार राहणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कॉमेडियन कुणाल कामरा यानेही ट्वीट करून महाराष्ट्र सरकारमध्ये खळबळ उडाली आहे.

राजकीय वातावरण तापलं असताना सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

कुणालने लिहिले की, ‘आमदार गुजरातमध्ये विकायला जातात. कारण तिथूनच बोली लावणारे येतात.’ कॉमेडियनच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी ताशेरे ओढले आहेत. विष्णू शर्मा नावाच्या युझजरने लिहिले की, ‘विरोधी पक्षांचे आमदार असेच का असतात या विषयावरही कधी तरी बोला कमरा’

दुसरीकडे, शैली मालीवालने कुणालला त्याच्या जुन्या ट्वीटची आठवण करून दिली. ज्यामध्ये कामराने लिहिले होते की, ‘पहिलं महाराष्ट्रात सरकार बनवा तर, मग मी स्वत:ला तुरुंगात बंद करेन.’ हे शेअर करत शैलीने लिहिले, ‘कामरा जी, तयार रहा.’

याशिवाय चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही या बातमीबाबत शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, ‘संजय राऊत – आमच्या ४० आमदारांचे अपहरण झाले आहे. देवेंद्र फडणवीस- त्यांचं अपहरण झालं नाही तर ते आता ‘भगवा’ झाले आहेत.’ मेहक सिंग नावाच्या युजरने लिहिले की, ‘धूर्त अशोक पंडित भगवा नहीं ये बिकवा हैं।’ यावर पूजन जोशी नावाच्या युजरने बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतचा उल्लेख करत उत्तर दिले.

पूजाने लिहिले, ‘आज कंगना सर्वात आनंदी असेल. म्हणाली होती ‘आज माझे घर तुटले, उद्या तुझा गर्व तुटेल.’ रोहित सिंग राजदान याने लिहिले की, ‘शिवसेनेपेक्षा भित्रे आणि फरारी कोणीच असू शकत नाही. ते खरे आणि निर्भय असते तर ते सुरत, गुवाहाटी येथे लपले नसते. भाजपने या आमदारांना जेवढी सुरक्षा दिली आहे, त्याहून थोडी कमी जरी काश्मिरी पंडितांच्या कार्यालयाला आणि कुटुंबाला दिली असती तर कदाचित एवढी जीवीतहानी झाली नसती.’ आर. वर्मा यांनी लिहिले, ‘ठाकरे ७ वाजता खुर्ची सोडतील आणि राजीनामा देतील.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारमधील या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली होती. तसेच महाराष्ट्र विधानसभा बरखास्त होऊ शकते, असे संकेत त्यांनी सोशल मीडियावर दिले होते.

लग्नानंतर ६ महिन्यांनी हनिमूनला गेलेला राजकुमार राव मध्येच परतला, असं काय घडलंअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#आमदर #गजरतमधय #वकयल #जतत #करण #तथनच #बल #लवणर #यतत #कमडयनचय #टवटच #चरच

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...