दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील इमोशनल उत्तर दिलं आहे. शिंदे सध्या त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. त्यांनी यावेळी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचा दाखला देत उत्तर दिलं आहे. काँग्रेससोबत जायचं नाही, हे बाळासाहेबच बोलले होते. त्यावर मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत. समविचारी पक्षांसोबत राहायचं ही बाळासाहेबांचे हे मुख्य विचार आहेत, अशी भावनिक साद शिंदे यांनी घातली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांशी चर्चा करत असून या चर्चेनंतरच ते मुख्यमंत्र्यांना उत्तर देणार आहेत.
EXCLUSIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हद्वारे करण्यात आलेल्या आवाहनानंतर एकनाथ शिंदे यांचा आमदारांसोबत चर्चा करतानाचा पहिला VIDEO आला समोर #EknahShinde #UddhavThackeray #ShivSena #MaharashtraPolitics pic.twitter.com/Y1cbBh7Nwu
— News18Lokmat (@News18lokmat) June 22, 2022
विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी भावनिक साद घातल्यानंतरही एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेपासून मागे हटायला तयार नाहीत. त्यांनी ट्विटरवर चार मुद्दे टाकत सरकार बरखास्त करण्याबाबतची आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. “गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला, आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे”, अशी आक्रमक भूमिका शिंदेंनी घेतली आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहलंय. या पत्रामध्ये 34 आमदारांच्या सह्या आहेत. शिवसेनेच्या 55 पैकी 34 आमदारांच्या या पत्रावर सह्या असल्यानं बहुसंख्य आमदार हे शिंदे यांच्यासोबत आहेत, त्यामुळे ठाकरे सरकार आता अल्पमतामध्ये आलं आहे. विधानसभेतील बहुमतदासाठी आवश्यक असलेली 145 आमदारांची मॅजिक फिगर महाविकास आघाडी सरकारकडं नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
Published by:Chetan Patil
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#आमदरचय #बठकच #Exclusive #VIDEO #ठकरचय #सवदनतर #गवहटत #कय #झल