शिरसाठ यांचा लेटरबॉम्ब
गेली अडीच वर्ष शिवसेना आमदार म्हणून वर्षा बंगल्याची दार आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. लोकांमधून न येणाऱ्या विधानपरिषदेत, राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच (बडवे, कारकून) आम्हाला डावलून राज्यसभा, विधानपरिषदेची रणनिती ठरवत होते, त्याचा निकाल काय लागला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून आम्हाला थेट वर्षा बंगल्यावर कधीही प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात. पण, आमच्यासाठी सहाव्या माळ्याचा प्रश्नही आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाहीत, असा ठपका या पत्रात शिरसाठ यांनी मुख्यमंत्र्यांवर ठेवला आहे.
ही आहे आमदारांची भावना… pic.twitter.com/U6FxBzp1QG
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
हिंदुत्व, अयोध्या राम मंदिर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला जाण्यापासून का रोखलं? तुम्ही स्वत: फोन करून अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे का सांगितले? असा सवालही शिरसाठ यांनी या पत्रात विचारला आहे.
भाजप करणार सरकार स्थापनेचा दावा; सोमवारी शपथविधी होणार?
साहेब, आम्हाला जेव्हा वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते, मतदारसंघातील कामं करत होते, निधी मिळवल्याची पत्र नाचवत होते. भूमिपूजन आणि उद्धघाटन करत होते, अशी व्यथा देखील शिरसाठ यांनी मांडली आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#आमचय #भवन #तमचयपरयत #पहचलयच #नहत #वच #शवसन #आमदरच #लटरबमब