Saturday, May 21, 2022
Home क्रीडा आधी निवृत्त झाल्याचे केले जाहीर, नंतर घेतली माघार? अंबाती रायडूच्या ट्विटमुळे संभ्रम

आधी निवृत्त झाल्याचे केले जाहीर, नंतर घेतली माघार? अंबाती रायडूच्या ट्विटमुळे संभ्रमचेन्नई सुपर किंग्जचा मधल्या फळीतील दिग्गज फलंदाज अंबाती रायडूने निवृत्त झाल्याचे जाहीर केले. आयपीएलचे सध्याचे म्हणजे १५ वे पर्व त्याचे शेवटचे असेल असे त्याने म्हटले आहे. ट्विट करत त्याने याबाबत माहिती दिली. मात्र लगेच त्याने हे ट्विट डिलीट केले. निवृत्ती जाहीर करुन पुन्हा ट्विट डिलीट केल्यामुळे आता त्याच्या निर्णयाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> काय पण नशीब! विराट कोहली कसा बाद झाला बघाल, तर तुम्ही पण हेच म्हणाल

ट्विट करत निवृत्त होत असल्याचे केले जाहीर

अंबाती रायडूने ट्विटच्या माध्यमातून आयपीएलचे हे माझे शेवटचे पर्व असल्याचे म्हटले आहे. “मला हे सांगण्यास आनंद होत आहे की, आयपीएचे हे पर्व माझे शेवटचे असणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांसाठी जपळपास १३ वर्षासाठी खेळलो. हा १३ वर्षांचा काळ माझ्यासाठी खूप चांगला होता. माझ्या या प्रवासाबद्दल मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही फ्रेंचायझींचे आभार,” असे रायडूने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा >>> क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडूचा विराटला मोलाचा सल्ला; म्हणाला “तू काय केलं होतं हे विसर, तुझं वय…”

पुन्हा ट्विट केल डिलीट

आयपीएलमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर करताच क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू इरफान पठाण तसे इतरांनी रायडूला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्याच्या त्याच्या निर्णयाचेही अनेकांनी स्वागत केले. मात्र रायडूने काही वेळानंतर हे ट्विट डिलीट केले. त्यानंतर मात्र आता अनेक चर्चांना तोंड फुटले आहे. रायडूचे आयपीएल २०२२ हे शेवटचे पर्व असणार? की आगामी हंगामातही तो सीएसकेकडून खेळताना दिसेल, असा प्रश्न विचारला जातोय.

हेही वाचा >>>“CSK जा जा जा…” मुंबई विरुद्ध चेन्नईच्या मॅच दरम्यानचा वानखेडे स्टेडियमवरचा भन्नाट Video Viral

अंबाती रायडूने आयपीएलमध्ये २०१० साली पदार्पण केले. सुरुवातीला तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला. २०१० ते २०१७ सालापर्यंत त्याने मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर चेन्नईने त्याला २०१८ साली मेगा ऑक्सनमध्ये ६.७५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. तेव्हापासून तो चेन्नई संघात खेळताना दिसतोय. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १८७ सामने खेळले असून ४१८७ धावा केल्या आहेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#आध #नवतत #झलयच #कल #जहर #नतर #घतल #मघर #अबत #रयडचय #टवटमळ #सभरम

RELATED ARTICLES

IPL 2022 : दोन कारणांमुळे दिल्ली कॅपिटल्स अडचणीत, आता चूक झाली तर खेळ समाप्त

मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील साखळी फेरीचे सामने रविवारी संपणार आहेत. शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians...

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Most Popular

बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम असेल तर चुकून पण खाऊ नका या गोष्टी; त्रास जास्तच वाढेल

नवी दिल्ली, 21 मे : बद्धकोष्ठता ही पोटाची एक सर्वसामान्य समस्या आहे, जी जगभरातील सुमारे 27 टक्के लोकांना त्रास देत आहे. साधारणपणे, बद्धकोष्ठतेचा...

Flipkart Sale: अवघ्या ६,९९९ रुपयांमध्ये घरी येईल मॉडर्न फीचर्ससह पॅक्ड Smart TV, ‘ही’ कंपनी देतेय खास ऑफर, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Smart Tv Offers: जर तुम्हाला नवीन Smart TV वर अपग्रेड करायचे असेल तर, तुमच्यासाठी एक भन्नाट संधी लवकरच उपलब्ध होणार आहे....

पुढील वर्षीही ‘आयपीएल’ खेळणार!; चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची स्पष्टोक्ती | Will play IPL next year too Chennai Super Kings captain Mahendra Singh...

पीटीआय, मुंबई : पुढील वर्षीही इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये खेळणार असल्याची स्पष्टोक्ती शुक्रवारी महेंद्रसिंह धोनीने दिली. चेन्नई शहराशी नाते सांगणाऱ्या या संघासाठी...

Mumbai Water Reduction : मुंबईतील ‘या’ भागांत चार दिवस पाणी कपात

Mumbai Water Reduction : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबईत 24 मे ते 27 मे दरम्यान, सकाळी 11 ते दुपारी...

Flood News : अरे बापरे! 2251 गावे पुराच्या पाण्याखाली, 7.12 लाख लोक प्रभावित

गुवाहाटी : Asaam Flood : आसाममध्ये धोधो पाऊस कोसळला. यामुळे मोठा पूर आला आणि हजारो घरे पुराच्या पाण्यााखाली गेलीत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन...

BMC Election 2022 : आपनं कंबर कसली; दिल्ली, पंजाबनंतर आता मुंबई जिंकण्यासाठी सज्ज

Mumbai Mahapalika Election 2022 : संपुर्ण देशाचं लक्ष लागलेलं शहर म्हणजे मुंबई (Mumbai) शहर. या मुंबई शहरात आगामी...