Saturday, August 13, 2022
Home टेक-गॅजेट आता Aadhaar लाही लावता येणार मास्क; जाणून घ्या याचे फायदे, कसं कराल...

आता Aadhaar लाही लावता येणार मास्क; जाणून घ्या याचे फायदे, कसं कराल डाउनलोड


नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : खासगी तसंच सरकारी अनेक कामांसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आता आधार कार्डसाठी UIDAI कडून नवं फीचर जारी करण्यात आलं आहे. या नव्या फीचरमुळे 12 अंकी आधार नंबर कव्हर केला जाऊ शकतो, जेणेकरुन तो अधिक सुरक्षित केला जाऊ शकेल. याला आधार मास्क (Aadhaar Masked) करणं असं म्हटलं आहे. ज्यावेळी तुमचा आधार नंबर इतर कोणाशी शेअर करायचा नसेल, त्यावेळी आधार मास्क करण्याची सुविधा वापरता येऊ शकते. UIDAI च्या वेबसाईटवरुन Masked e-Aadhaar कार्ड सहजपणे डाउनलोड करता येऊ शकतं.

आधार कार्ड Masked केल्यानंतर Aadhaar नंबरमधील पहिले 8 अंक लपवले जातात. लपवलेल्या 8 अंकाच्या जागी ती संख्या XXXX-XXXX अशी दिसेल. या Masked Aadhaar मध्ये शेवटचे केवळ चार अंकच दिसतील. अशाप्रकारे UIDAI द्वारे जारी करण्यात आलेली ही Masked Aadhaar ची सुविधा जवळपास सर्व ठिकाणी वैध मानली जाणार आहे. जिथे महत्त्वाचं कागदपत्र म्हणून आयडेंटिटी प्रुफ Aadhaar Card दाखवण्याची गरज असते, त्या सर्व ठिकाणी हे Masked Aadhaar Card वैध मानलं जाणार आहे. उज्ज्वला योजना, LPG सबसिडी या सरकारी योजनांसाठी हे Masked Aadhaar वापरता येणार नाही.

इंग्रजीच नाही,तर आता तुमच्या भाषेतही बनवता येणार Aadhaar Card,जाणून घ्या प्रोसेस

कसं डाउनलोड कराल Masked Aadhaar?

– सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर https://uidai.gov.in/ वर जावं लागेल.

– त्यानंतर My Aadhaar पर्यायावर क्लिक करावं लागेल.

– इथे Download Aadhaar सिलेक्ट करावं लागेल.

– e-Aadhaar डाउनलोड करण्यासाठी Aadhaar Number, Enrolment ID आणि Virtual ID असे तीन पर्याय दिसतील.

– इथे I Want a Masked Aadhaar असा पर्याय दिसेल, त्या चेक बॉक्सवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा. रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर Masked Aadhaar अॅक्सेस करता येईल.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#आत #Aadhaar #लह #लवत #यणर #मसक #जणन #घय #यच #फयद #कस #करल #डउनलड

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

Anjali Arora Leaked Video : लीक झालेल्या एमएमएस व्हिडिओवर अंजली अरोरा म्हणाली…

Anjali Arora Leaked Video : सोशल मीडिया इन्फ्लुएंझाजर ते टीव्ही असा प्रवास करणाऱ्या अंजली अरोरा (Anjali Arora) या...

मोठी ऑफर : 15 ऑगस्टदिनी या कंपनीचा कमी किमतीत सुपरफास्ट इंटरनेट प्लान

BSNL Broadband Plan Best Offer: आजच्या काळात, इंटरनेटशिवाय एक दिवसही घालवणे अशक्य आहे. तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही 99 रुपयांमध्ये 3000GB...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

PHOTO : बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्याची लेक, मनोरंजन विश्वात गाजवतेय नाव! वाचा सारा अली खानबद्दल.

PHOTO : बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्याची लेक, मनोरंजन विश्वात गाजवतेय नाव! वाचा सारा अली खानबद्दल... अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

‘तुम्ही माझी SEX टेप पाहिली का?’, असं का म्हणतायत Elon Musk?

एलॉन मस्कची सेक्स टेप...जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीने असं काय केलंय, वाचा संपूर्ण बातमी  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

शाळेत टॉयलेटला गेले विद्यार्थी, जीव वाचवण्यासाठी धडपड; नेमकं काय घडलं असं पाहा

लखनऊ, 12 ऑगस्ट : दुपारचे बारा वाजले होते...  शाळेत गेलेल्या दोन विद्यार्थ्यांना लघवीला झालं म्हणून ते टॉयलेटला गेलं. शाळेच्या टॉयलेटचा त्यांनी दरवाजा उघडला......