Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या आता रोज या रस्त्याने यावंसं वाटतं, घाटकोपर उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

आता रोज या रस्त्याने यावंसं वाटतं, घाटकोपर उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया


मुंबई, 1 ऑगस्ट : मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरच्या (Ghatkopar mankhurd link road) उड्डाणुलाचं (Flyover) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackray) यांच्या हस्ते उद्घाटन झालं. पूर्वी मी या रस्त्याने येत नव्हतो. पण आता रोज रोज इकडं यावंसं वाटतं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. या पुलामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून (Traffic Jam) सुटका होणार असून नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. इंधन तर वाचेलच, मात्र प्रदुषणाची हानीदेखील कमी होईल, असा दावा प्रशासनाननं केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार राहुल शेवाळे, महापौर किशोरी पेडणेकर, मंत्री नवाब मलिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

केवळ नारळ वाढवत नाही

मी काही केवळ नारळ वाढवून आलो नाही, तर काम सुरु करून आलो आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मुंबई मॉडेलसाठी आपलं कौतुक केलं जातं, मात्र हे यश प्रशासनाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. वास्तविक, लोक ज्यांना काम करण्याची संधी देतात, त्यांना सरकार म्हणतात. मात्र संधी मिळूनही जे काम करत नाहीत, ते नालायक असतात, असं सांगताना आपण नालायक नसल्याचं त्यांनी सांगितलं. उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर पुलाखाली नवी वस्ती तयार होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.

हे वाचा  -खुर्ची सोडा, मग आम्ही बघू; नाना पटोलेंची राज्यपालांवर टीका

नव्या पुलाची वैशिष्ट्यं

  • घाटकोपर-मानखुर्द जोड रस्ता हा सायन पनवेल महामार्ग व पूर्व द्रुतगती मार्ग यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे.
  • या रस्त्यावर पूर्व द्रुतगती मार्ग, सांताक्रुझ चेंबूर जोडररस्ता तसेच पूर्व मुक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूकीची कोंडी सोडविण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेने या उड्डाणपूलाचे काम हाती घेऊन पूर्ण केलेले आहे.
  • हा उड्डाणपूल शिवाजी नगर, बैंगणवाडी, देवनार क्षेपणभूमी व मोहिते पाटील नगर हे पाच (५) महत्वाचे जंक्शन व देवनार नाला, चिल्ड्रेन एड नाला, पी.एम.जी.पी. नाला या तीन (३) मोठया नाल्यांवरुन विस्तारित होत आहे.
  • उड्डाणपूलाचे बांधकाम “खंडजोड” (सेगमेंट) तंत्रज्ञानाने व ” एक स्तंभ” पध्दतीने केलेले असल्याने पूलाखालील रस्त्यावर मार्गिकादेखील वाहतूकीसाठी वापरात आलेली आहे.
  • उड्डापुलासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रथमतःच अखंड पध्दतीने २४.२ मीटर लांबीचा सेगमेंट तयार करण्याचे तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे.
  • प्रकल्पाची एकूण किंमत ५८० कोटी
  • पूलाची एकूण लांबी = २.९९१ कि.मी.
  • पुलाची एकूण रुंदी= २४.२ मीटर
  • एकूण मार्गिका = ३+३ (उत्तर वाहिनी + दक्षिण वाहिनी)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#आत #रज #य #रसतयन #यवस #वटत #घटकपर #उडडणपलचय #उदघटननतर #मखयमतरयच #परतकरय

RELATED ARTICLES

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग

मुंबई, 02 जून : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण हँड सॅनिटायझर वापरतो. सॅनिटायझरमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत होते. कोरोनामुळे अलिकडे सर्वांना सॅनिटायझरचे...

भीषण भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video

मणिपूर 02 जुलै : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर...

जंगलाच्या रस्त्यावर गाडीतून उतरली महिला; दुसऱ्याचं क्षणी वाघाने जबड्यात पकडून…

जंगलातून प्रवास करणे अनेकदा भीतीदायक असू शकते. पण लोकांना वाटतं की, जंगलंही शहरी भागासारखीच असतात. त्यामुळे कुठेही आणि केव्हाही उतरायला हरकत नाही. पण...

Most Popular

‘मराठा म्हणून एकनाथ शिंदे..’; ज्योतिरादित्य शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत

नवी दिल्ली 02 जुलै : राज्यातील राजकारणात मागील जवळपास १० दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत होत्या. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेना आणि अपक्ष...

Cashback Offers: ‘या’ स्मार्टफोन्सच्या खरेदीवर Airtel कंपनी देतेय ६ हजार रुपयांचा कॅशबॅक, पाहा लिस्ट

नवी दिल्ली:Airtel Offers: स्मार्टफोन खरेदी करतांना सूट व्यतिरिक्त ६ हजार रुपयांचा बंपर कॅशबॅक मिळाला तर नक्कीच तुम्हाला आनंद होईल. महत्वाचे म्हणजे सध्या अशीच...

फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले हा सर्वात धक्कादायक क्लायमॅक्स; शिवसेनेची टोलेबाजी

Shiv Sena Saamana On Maharashtra Government  : गुरूवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) काल शपथ घेतली....

Pune Crime News: धक्कादायक! शाळेतून घरी येताना 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Pune Crime News: पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात गुरुवारी शाळेतून घरी जात असताना एका व्यक्तीने 11 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा...

Eye Care Tips : पावसाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी

Eye Care Tips : पावसाळ्याचा आनंद घ्यायला बहुतेकांना आवडते, पण पावसासोबत काही संसर्गही येतात. त्यामुळे या ऋतूत स्वत:ला...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...