गेली कित्येक महिने कोरोनाच्या हाहाकाराने सर्वच जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वच मालिका आणि चित्रपटांच्या शुटींगवर बंदी आली होती. आत्ता काहीशा अटींसह शुटींगला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये रखडलेल्या प्रोजेक्ट्सचं तसचं नवीन काही प्रोजेक्ट्सचंदेखील शुटींग सुरु झालं आहे. याप्रमाणेच मराठीतील ‘जयंती’ या चित्रपटाच्या राहिलेल्या भागाचंदेखील शुटींग केलं जात आहे. यादरम्यानचं अभिनेता मिलिंद शिंदेसोबत सेटवर एक भयानक किस्सा घडला आहे.
(हे वाचा: नवाजुद्दीन सिद्दीकी सोडणार भारत? पत्नी आलिया म्हणाली, ‘आम्ही…’)
चित्रपटाच्या स्क्रिप्टनुसार सेटवर मोठ-मोठ्या लाईटस, विविध अवजड यंत्रणा, जिमी जीब क्रेन असंख्य कॅमेरे लावण्यात आले आहेत. दरम्यान अभिनेता मिलिंद शिंदे नेहमीप्रमाणे आपल्या सीनसाठी अगदी मग्न होऊन सराव करत होते. त्यांचं आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर अजिबात लक्ष नव्हतं. आणि याचंवेळी जिमी जीब क्रेनचासुद्धा पुढील सीनसाठी सराव सुरु होता. एका सीनसाठी जिमी जीब क्रेनला अतिशय वेगाने खाली येण्याचा शॉटचा सराव सुरु होता. ही क्रेन खाली येत असताना त्याच्याबरोबर खाली मिलिंद शिंदे थांबलेले होते. क्रेन ऑपरेटरला मिलिंद दिसताच त्याने प्रसंगावधान राखत, त्या क्रेनला अतिशय चपळाईने दुसऱ्या दिशेने वळवलं आणि त्याचंवेळी पटकन मिलिंदसुद्धा खाली वाकले आणि हा भयानक प्रसंग टळला. अन्यथा यामध्ये मिलिंद यांना मोठी दुखापत होण्याची शक्यता होती. मात्र दैव बलवत्तर म्हणून सर्वकाही व्यवस्थित झालं.
(हे वाचा:HBD: सलमानमुळे चमकलं होतं मनीष पॉलचं नशीब;अभिनेत्याने अशी केली होती मदत )
याबद्दल बोलताना मिलिंद शिंदे सांगतात, ‘”एखादं चांगलं काम आपल्या हातून घडत असेल तर तेव्हा संकटाची सावलीदेखील आपल्यावर पडत नाही. अगदी त्याचप्रमाणे मी जरी माझ्या भूमिकेच्या तयारीत रमून गेलो होतो. रात्रीच्या वेळी माझ्या आजूबाजूला चालत असलेल्या गोष्टीदेखील मला त्या क्षणासाठी दिसल्या नाहीत. मग ती मोठी जिमी जीब का असेना. मी त्यावेळी जर झुकलो नसतो तर त्या लोखंडी जिमी जीबच्या माराने कदाचित मला गंभीर दुखापत झाली असती. पण सेटवरच्या सकारात्मक ऊर्जेमुळे मला खरचटलंदेखील नाही. सेटवर लोकांनी वेळीचं दाखवलेल्या प्रसंगावधामुळे माझा जीव वाचला. मी जरी माझ्या कामात रमलो असलो तरी सेट वरील प्रत्येकाने मला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत काम केलं याचं मला कौतुक वाटतं.”
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#आण #परण #वचल #शटगदरमयन #भयनक #अपघततन #थडकयत #बचवल #मलद #शद