मंगळवारी दुपारी विरार परिसरातील अर्नाळा येथील नवापूर समुद्रकिनाऱ्यावर एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला आहे. संबंधित तरुणी 25 ते 30 वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत तरुणीच्या हाताच्या मनगटाला एक जखम आढळून आली आहे. त्यामुळे संबंधित तरुणीनं आत्महत्या केली कि तिची हत्या करून मृतदेह समुद्रात टाकला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. संबंधित तरुणीचा 18 ते 24 तासांपूर्वीच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास अर्नाळा पोलीस आणि गुन्हे शाखा करत आहेत.
हेही वाचा-17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात मुंबईतील TikTok स्टारवर गुन्हा
खरंतर मागील आठवड्यात सोमवारी वसईजवळील भुईगाव समुद्र किनारी एका सुटकेसमध्ये शिर नसलेल्या तरुणीचा मृतदेह आढळला होता. संबंधित तरुणी नेमकी कोण? आणि तिची हत्या कोणी केली? याचा अद्याप उलगडा झाली नाही. तोपर्यंत वसई परिसरात आणखी एक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही तरुणींच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा करण्याचा आव्हान पोलिसांसमोर आहे. पण याबाबत अद्याप कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही.
हेही वाचा-इमारतीवरून नवजात बालिकेला फेकलं; विरारमधील क्रूरतेचा कळस गाठणारी घटना
विशेष म्हणजे, जुलै महिन्यात वसई परिसरातील वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्या पाच वेगवेगळे मृतदेह आढळले आहेत. यानंतर ऑगस्ट महिन्यात देखील या मृत्यू सत्र कायम आहे. नवापूर येथील समुद्रकिनाऱ्यावर आणखी एका तरुणीचा मृतदेह आढळल्यानं या यादीत आणखी एक भर पडली आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#आठवडभरत #घटनच #पनरवतत #वसईत #समदरकनर #आढळल #आणख #एक #तरणच #मतदह