ठाकरेंना पुन्हा एक धक्का! मध्यावधी निवडणुका लागणार, पवारांचं भाकित, संजय पांडेंना ईडीचे समन्स TOP बातम्या
फ्लोअर टेस्टपूर्वी भाजप-शिंदे गटाच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड केली आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाली आहे. त्यांनीही शिंदे यांना विधीमंडळ गटनेते म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे अजय चौधरी यांचे गटनेतेपद रद्द झालं. शिंदे यांच्या गटनेतेपदाला मान्यता दिली असल्यामुळे भरत गोगावले हेच मुख्य प्रतोद असल्याचं मान्य करण्यात आलं आणि शिवसेनेचे सुनील प्रभू यांना दिलेलं मुख्य प्रतोदपद रद्द करण्यात आलं.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी शिवसेना-भाजप युती सरकारची फ्लोर टेस्ट होणार आहे, असं एका आमदाराने मुंबईच्या हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीबाबत सांगितलं. फ्लोर टेस्टसाठी सरकारची रणनीती काय असेल यावर सर्व आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, फ्लोअर टेस्टपूर्वी भाजप-शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची सभापतीपदी निवड झाल्यानंतर सरकारला मॅजिक फिगर मिळविण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचं दिसत आहे.
एकनाथ शिंदे पुन्हा जिंकले; ठाकरेंना जबर धक्का; शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाबाबत मोठा निर्णय
बहुमत चाचणीत सरकार नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. विधानसभेत आज पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीमध्ये देखील सरकार नक्की यशस्वी ठरेल अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#आज #शद #सरकरच #खर #परकष #बहमत #चचणसठ #ठरल #रणनत #मजक #फगर #गठणर #क