हायलाइट्स:
- सुनीलला लहान असल्यापासून होती अभिनयाची आवड
- नशीब आजमावयाला म्हणून आला मुंबईत
- स्ट्रगलच्या काळात महिन्याची कमाई होती अवघी ५०० रुपये!
सुनीलचा जन्म तीन ऑगस्ट १९७७ रोजी हरियाणामधील एका छोट्याशा गावात झाला. लहानपणापासून त्याला सिनेमांची खूप आवड होती. सुरुवातीला अमिताभ बच्चन आणि त्यानंतर शाहरुख खानचे सिनेमे पाहून आपणही त्यांच्यासारखे मोठे अभिनेते बनावे, असे त्याचे स्वप्न होते. सुनील जेव्हा नववीत होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला तबला शिकायला पाठवले. मोठे झाल्यावर सुनीलला सिनेमा, थिएटरमध्ये काम करायचे होते.

सुनील ग्रोवरने त्याच्या आयुष्याशी संबंधित असलेला एक किस्सा सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केला. त्याने लिहिले होते, ‘ मला नेहमीच अभिनय करून लोकांचे मनोरंजन करायला आवडायचे. मला आजही आठवते मी तेव्हा बारावीत होते. तेव्हा मी नाटकाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेला जे प्रमुख पाहुणे आले होते, त्यांनी माझे काम पाहिले आणि मला येऊन सांगितले की या स्पर्धेमध्ये मी सहभागी झालो तर इतरांवर अन्याय करने. त्यानंतर मी नाटकाचे प्रशिक्षण घेतले आणि मुंबईला आलो. परंतु काही महिने मी केवळ लहान मोठ्या भूमिकाच करत होतो. त्यावेळी मी महिन्याला केवळ ५०० रुपये कमवायचो. परंतु एक एक पैसा जमा करत करत मी पॉश भागात घर भाड्याने घेतले. अविश्वसनीय गोष्ट होती पण मी ती विश्वसनीय करून दाखवली. कारण मी यशस्वी होणार याची खात्री होती…’

सुनीलने त्याच्या या पोस्टमध्ये पुढे लिहिले, ‘ मी असा एकटा नाही, माझ्यासारखे अनेकजण आहेत की ते त्यांच्या शहरांमध्ये सुपरस्टार आहेत. परंतु मुंबईत ते फक्त स्ट्रगरलर्स आहेत. हळूहळू माझी मिळत बंद होऊ लागली. तेव्हा मला वडिलांची तीव्रतेने आठवण आली. माझी स्वप्न अशी हवेत विरून देणे मला मान्य नव्हते. वडिलांना आठवणीत मी पुन्हा जोमाने काम शोधायला लागलो. मला टीव्हीवर काम करण्याची संधी मिळाली. परंतु मी तिथे वेळेवर पोहोचू शकलो नाही त्यामुळे माझी भूमिका दुस-या कलाकाराला दिली. त्यानंतर मी व्हॉईस ओव्हरच्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. एका रेडिओवर काम करण्याची संधी मला मिळाली. हा कार्यक्रम दिल्लीहून प्रसारित व्हायचा परंतु तो संपूर्ण देशामध्ये लोकप्रिय होता. मी रेडिओ आणि टीव्हीशी संबंधित अशी अनेक कामे केली. त्यानंतर मग मला गुत्थी ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या भूमिकेमुळे मी घराघरात लोकप्रिय झालो. मला आजही आठवते मी एका लाईव्ह कार्यक्रमात सहभागी झालो होतो. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षक ओरडू लागले, हूटिंग करू लागले… मला वाटले ही दुस-या कुणासाठी तरी आहे. परंतु हे माझ्यासाठी आहे हे जेव्हा इतरांनी सांगितले तेव्हा मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला…’

सुनील ग्रोवहरने कपिल शर्मासोबत ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या कार्यक्रमात गुत्थी आणि ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये डॉक्टर मशहूर गुलाटी या भूमिका साकारल्या होत्या. या दोन्ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. सुनील आणि कपिलची जोडी खूपच हिट ठरली होती. परंतु २०१७ मध्ये या दोघांमध्ये दुरावा आला आणि ते दोघे वेगवेगळे कार्यक्रम करू लागले.

सुनीलने त्याच्या करीअरची सुरुवात १९९८मध्ये ‘प्यार तो होना ही था’ सिनेमातून केली. त्यानंतर सुनील ग्रोवर द लीजेंड ऑफ भगत सिंह, मैं हू ना, गजनी, जिला गजियाबाद, गब्बर इज बॅक, बागी आणि भारत या सिनेमांत त्याने काम केले. इतकेच नाही तर त्याने तांडव आणि सनफ्लॉवर या वेबसीरिजमध्येही काम केले आहे.
आज कोट्यवधींचा मालक
रेंटवर घर घेऊन राहणारा सुनीलने २.५ कोटींचे घर मुंबईत खरेदी केले आहे. केवळ मुंबईत नाही तर देशात अनेक ठिकाणी त्याने घरे घेतली आहेत. त्याचप्रमाणे सुनीलकडे रेंज रोवर, बीएमडब्ल्यू, ऑडी यांसारख्या आलिशान गाड्या देखील आहेत.

आज एका शोसाठी घेतो काही लाख रुपये
सुनील ग्रोवर आज सुमारे १८ कोटी रुपयांचा मालक आहे. गेल्या पाच वर्षांत त्याच्या संपत्तीमध्ये २२० टक्के वाढ झाली आहे. सुनील एका ब्रँडच्या प्रमोशनसाठी ५० ते ६० लाख रुपये मानधन घेतो…
अर्थात हे यश, संपत्ती मिळवण्यासाठी सुनीलने जी मेहनत घेतली आहे. त्यामुळेच आजचे हे यश दिसत आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#आज #एक #एपसडसठ #लख #रपय #घत #सनल #गरवर #सरवतच #कमई #हत #फकत