मराठीतील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका खुपचं लोकप्रिय झाली आहे. आपल्या मुलांच्या आणि पतीच्या चुका पोटात घेऊन एक आई कशी जगते. तिचं मन किती मोठं असतं. आणि ती आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी काय-काय करत असते. मात्र तरीसुद्धा तिला स्वतःचं अस्तित्व नसत. किंवा तिच्या कष्टाची दखल घ्यायला कोणाला वेळचं नसते. हे सर्व या मालिकेतून दाखविण्यात आलं आह.
या मुख्य व्यक्त्रीरेखा अरुंधती म्हणजेच मालिकेतील आई, सतत आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे. अरुंधतीने आपला पूर्णवेळ आपला पती आणि मुलांच्या सेवेतचं घालवला आहे. त्यामुळे तिला तिचा असं काहीच करता आलेलं नाहीय. अशातच पती अनिरुद्ध एका परस्त्रीच्या प्रेमात पडतो. आणि अरुंधतीच्या आयुष्यात संजना नावाचं एक मोठं वादळ येतं.
(हे वाचा: अभिज्ञा-अंकिताची धम्माल; पाहा ‘पवित्र रिश्ता 2’ च्या सेटवरील VIRAL व्हिडीओ)
अनिरुद्धची प्रेयसी संजना त्याच्या आयुष्यात आल्यानंतर अरुंधतीचं घरातील अस्तित्व संपुष्टात आलं आहे. ती आपल्या मुलांना आणि आपल्या जवळच्या सर्व माणसांना सोडून निघून जाते. आणि संजना घरात येते. मात्र काही दिवसांनंतर अरुंधती घरीसुद्धा परतली होती. मात्र आत्ता मालिकेत आणखी एक नवा ट्वीस्ट आला आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अरुंधती पुन्हा आपल्या घराचा उंबरा ओलांडताना दिसत आहे. आणि सोबतचं हेदेखील म्हणत आहे, की तिचं हे जाणं कधीही न परतण्यासाठी आहे.
(हे वाचा:धक्कादायक! महाराष्ट्रात बाल पोर्नोग्राफीच्या प्रकरणात प्रचंड वाढ; 105 जणांना अटक )
मालिकेत आलेल्या या नव्या ट्वीस्टमुळे चाहते खुपचं अस्वस्थ आहेत. सोबतच अरुंधती आपल्या अस्तित्वासाठी आत्ता नेमकं काय करणार हे पाहण्यासाठी उत्सुकदेखील आहेत.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#आई #कठ #कय #करत #मलकत #मठ #टवसट #अरधत #पनह #सडणर #आपल #घर