आईसलँड (Iceland) देशातील Breizafijorzur Bay परिसरात आढळून येणाऱ्या ‘एडर पोलार डक’ (Eider Polar Duck) या बदकांच्या पिसांसाठी कित्येक शिकारी दिवस-दिवस बसून राहतात. या बदकांची पिसं ही जगातील सर्वात महागडी पिसं (World’s most expensive feathers) समजली जातात. याला कारण म्हणजे, हे जगातील सर्वात उबदार असं नैसर्गिक फायबर (Most warm natural fibre) मानलं जातं. मोठमोठे ब्रँड्स आपली महागडी उत्पादनं बनवण्यासाठी याचा वापर करतात. वजनाला अतिशय हलकं असूनही, शरीराला मोठ्या प्रमाणात उब देणारी ही पिसं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या किंमतीला विकली जातात.
बाळाचं पोट भरेल इतकं दूध येण्यासाठी; ‘या’ पद्धतीने करा ‘Breast Feeding’
हजारो डॉलर्सला विकलं जातं हे दुर्मिळ फायबर
एडर पोलार डक पक्षाच्या शरीरावर गळ्याच्या खालच्या भागात हे फायबर आढळते. या बदकांची मादी जेव्हा आपली अंडी उबवते, त्या काळात ही खास पिसं तयार होतात. तिच्या ब्रेस्टच्या (Breasts) भागात तयार होणारं हे फायबर जो मिळवतो, त्याची जणू लॉटरीच लागते. कारण याची किंमत हजारो डॉलर्सच्या घरात जाते. केवळ 800 ग्रॅम एडरडाऊनची (Eiderdown) किंमत ही तब्बल 5 हजार डॉलर्स पर्यंत जाते.
अंड रोज खावं खरं पण ऑम्लेट नव्हे, असं खा; या वेळी खाल्लंत तर आहे फायदा
बदकांचा जीव जाऊ नये यासाठी स्थानिक प्रयत्नशील
आईसलँडच्या या भागात राहणाऱ्या लोकांसाठी एडर पोलार डक हे रोजगाराचे साधन आहेत. स्थानिक सांगतात, की एक किलो एडरडाऊन (One KG eiderdown price) गोळा करण्यासाठी त्यांना या बदकांची जवळपास साठ घरटी पहावी लागतात. जेव्हा घरट्यांमध्ये केवळ अंडी असतात, तेव्हा तिथे पडलेली ही पिसे घेऊन ते पुढे जातात. पण काही वेळा घरट्यांमध्ये बदकही असते. अशा वेळी काही शिकारी बदकांना मारुन ही पिसे मिळवतात. मात्र, एडर डक हे स्थानिकांसाठी सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीप्रमाणे आहेत म्हणजेच त्या पिसांपासून खूप पैसे मिळू शकतात. ही बदकंच नष्ट झाली, तर पुन्हा एडरडाऊन मिळणार नाही हे स्थानिकांना माहिती आहे. त्यामुळे बदकांना कोणतीही इजा न पोहोचवता, त्यांच्या अनुपस्थितीत केवळ पडलेली पिसे गोळा करण्याकडेच स्थानिकांचा कल असतो. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांनाही हे जाणून दिलासा मिळतो.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#आईसलडमधय #दरमळ #बदकचय #एक #पसच #कमत #हजरचय #घरत #शकर #दवसदवस #असतत #परतकषत