Saturday, May 21, 2022
Home लाईफस्टाईल आंबा खाल्ल्यानं वजन कमी होतं का? एका दिवसात नेमके किती आंबे खाणे...

आंबा खाल्ल्यानं वजन कमी होतं का? एका दिवसात नेमके किती आंबे खाणे आहे योग्य


मुंबई, 15 मे : उन्हाळ्यात फळांचा राजा आंब्याची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. आंबा केवळ गोड आणि चवदारच नाही तर आरोग्यदायीही आहे. आंब्याचे अनेक प्रकार आहेत आणि त्या सर्वांची चव वेगवेगळी आहे. रसाळ फळ आंबा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. यामध्ये असलेले बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आंब्याचे नियमित सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. यासोबतच हृदय, पचन, डोळे, मेंदू इत्यादीही निरोगी ठेवते. आंबा कॅन्सरसारख्या घातक आजारापासून संरक्षण करतो. एवढेच नाही तर आंबा वजनही कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतो. जाणून घेऊया आंबा खाल्ल्याने वजन कमी होते की नाही, दिवसातून किती आंबे खाणे आरोग्यासाठी चांगले असतात.

आंब्यामध्ये पोषक तत्व –

कॅलरी, कार्बोहायड्रेट्स, फॅट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, साखर, प्रथिने, ऊर्जा, फोलेट, तांबे, जीवनसत्त्वे ए, बी-6, बी-12, सी, ई, व्हिटॅमिन यांसारखी अनेक प्रकारची पोषक तत्त्वे आंब्यात असतात. के, व्हिटॅमिन डी, झिंक, फॉस्फरस, पोटॅशियम, फायबर, नियासिन, थायमिन इ.

आंबा खाल्ल्याने वजन कमी होते का?

TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, आंबा वजन कमी करतो की नाही यावर तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. काहीजण म्हणतात की आंब्यामध्ये असे अनेक पोषक आणि गुणधर्म आहेत, जे वजन कमी करण्यास मदत करतात, परंतु काहीजण याशी सहमत नाहीत आणि काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आंब्याचे सेवन वजन कमी करण्यासाठी चांगले नाही. हे फळ इतर ऋतूंमध्ये मिळत नसल्याने लोक उन्हाळ्यात याचे मोठ्या प्रमाणात सेवन करू लागतात, जे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.

एका अभ्यासानुसार, 27 सहभागींनी 12 आठवडे 100 kcal असलेले ताजे आंबे खाल्ले. याने रक्तातील ग्लुकोज, सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन आणि एकूण अँटिऑक्सिडंट क्षमतेत लक्षणीय वाढ झाली. एवढेच नाही तर आंबा खाल्ल्यानंतर शरीराचे वजन, चरबीची टक्केवारी, इन्सुलिन किंवा लिपिड प्रोफाइल, रक्तदाब यामध्ये विशेष बदल झाला नाही. अभ्यासात, आंबा खाल्ल्यानंतर जास्त वजन आणि लठ्ठ प्रौढांमध्ये कार्डिओमेटाबॉलिक जोखीम घटक निश्चितपणे दिसून आले. आंबा खाल्ल्याने वजन कमी होत नाही, तर वाढते, असेही काही तज्ज्ञ सांगतात. वास्तविक, आंब्यामध्ये कॅलरी आणि कार्ब जास्त असते, ज्यामुळे वजन वाढते.

हे वाचा – जास्त आलं खाल्ल्यानं Low होऊ शकतं ब्लड प्रेशर, त्याचे हे साईड इफेक्ट जाणून घ्या

मधुमेहींनी आंबा खावा का?

मधुमेही रुग्णही आंबा खाऊ शकतात, पण जास्त प्रमाणात नाही, मर्यादित प्रमाणात, अन्यथा साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असल्यामुळे मधुमेहामध्ये आंबा कमी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 51 आहे, जो कमी आहे, परंतु मधुमेह नसलेल्या पदार्थांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. आरोग्य तज्ज्ञ मधुमेहींना हे सल्ला देतात की, ग्लायसेमिक इंडेक्स 55 पेक्षा जास्त असलेले पदार्थ खाऊ नयेत.

हे वाचा – लाल आणि गोड कलिंगड सहज ओळखू शकाल; खरेदी करताना होणार नाही फसगत

दिवसात किती आंबे खाऊ शकतो?

काही लोकांना आंबे इतके आवडतात की ते एका दिवसात 5-6 आंबे खातात, परंतु असे करणे योग्य नाही. विशेषत: मधुमेह, लठ्ठ रुग्णांनी आंबा खाण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तज्ञांच्या मते, दररोज 2 कप किंवा 350 ग्रॅमपेक्षा कमी आंबा खावा. 100 ग्रॅममध्ये सुमारे 60 कॅलरीज असतात आणि संपूर्ण आंब्यामध्ये सुमारे 202 कॅलरीज असतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही, हे उपाय करण्यापूर्वी तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#आब #खललयन #वजन #कम #हत #क #एक #दवसत #नमक #कत #आब #खण #आह #यगय

RELATED ARTICLES

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

Most Popular

Infinix Smartphones: Note 12 लाँच करण्याच्या तयारीत Infinix , पाहा Flipkart वर कधी सुरु होणार सेल

नवी दिल्ली:Infinix Note 12 : Infinix कंपनीच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या Note 12 स्मार्टफोनच्या रिलीजच्या तारखेवरून अखेर पडदा उठला असून कंपनीने Note 12 आणि...

Amazon Tablet: अवघ्या ५ हजार रुपये सुरुवाती किंमतीत Amazon चे शानदार टॅबलेट्स लाँच, जाणून घ्या फीचर्स

नवी दिल्ली : Amazon Fire 7 Tablet Launched: Amazon ने आपल्या नवीन टॅबलेटला लाँच केले आहे. कंपनीला कमी किंमतीत दमदार टॅबलेट्ससाठी ओळखले जाते....

दोन ट्रक-कारचा अपघात, जबरदस्त धडकेनंतर भीषण आग; Live Video

गुजरात, 21 मे: गुजरातच्या (Gujarat) अरवली जिल्ह्यात (Aravali District) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन ट्रक आणि कारची एकमेकांना धडक बसली. ही...

मूळव्याधाने त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा..

Home Remedies For Piles: मूळव्याध (Piles) अर्थात पाईल्स ही एक सामान्य समस्या आहे. हल्लीच्या काळात अनेक लोक या...

BMC Election 2022 : आपनं कंबर कसली; दिल्ली, पंजाबनंतर आता मुंबई जिंकण्यासाठी सज्ज

Mumbai Mahapalika Election 2022 : संपुर्ण देशाचं लक्ष लागलेलं शहर म्हणजे मुंबई (Mumbai) शहर. या मुंबई शहरात आगामी...