Friday, May 20, 2022
Home क्रीडा आंद्रे रसेलच्या वादळासमोर हैदराबाद भुईसपाट! आधी बॅटींग नंतर बॉलिंगमध्ये चमत्कार

आंद्रे रसेलच्या वादळासमोर हैदराबाद भुईसपाट! आधी बॅटींग नंतर बॉलिंगमध्ये चमत्कार


पुणे, 14 मे : आंद्रे रसेलने अष्टपैलू कामगिरी करत कोलकाता नाईट रायडर्सच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. IPL 2022 च्या 61 व्या सामन्यात KKR ने सनरायझर्स हैदराबादचा 54 धावांनी पराभव केला. हैदराबादचा हा सलग पाचवा पराभव आहे. केकेआरचा 13 सामन्यांमधला हा सहावा विजय आहे. दुसरीकडे, हैदराबादचा 12 सामन्यांमध्ये 7वा पराभव झाला. या सामन्यात (KKR vs SRH) KKR ने प्रथम खेळताना 6 गडी गमावून 177 धावा केल्या. रसेलने नाबाद 49 धावांची आक्रमक खेळी खेळली. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 8 बाद 123 धावाच करू शकला. अशा प्रकारे, प्लेऑफमध्ये पोहोचणारे 3 संघ अद्याप निश्चित झालेले नाहीत. गुजरात टायटन्सचाच संघ आतापर्यंत बाद फेरीपर्यंत पोहोचू शकला आहे. 7 संघ शर्यतीत आहेत, तर मुंबई आणि CSK बाहेर आहेत.

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार केन विल्यमसनची खराब कामगिरी कायम राहिली. 17 चेंडूत 9 धावा करून तो आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर मैदानात उतरलेल्या राहुल त्रिपाठीलाही मोठी खेळी करता आली नाही. तो 12 चेंडूत 9 धावा काढून टीम साऊथीचा बळी ठरला. सौदीने त्याचा अप्रतिम झेल त्याच्याच चेंडूवर टिपला. दरम्यान, युवा डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने निश्चितच काही चांगले फटके खेळले.

तत्पूर्वी, हैदराबादविरुद्ध संघाची सुरुवात चांगली होऊ शकली नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को यानसेनने दुसऱ्याच षटकात संघाला मोठे यश मिळवून दिले. गेल्या सामन्यात चांगली खेळी खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यरला त्याने 7 धावांवर बाद केले. यानंतर नितीश राणा आणि अजिंक्य रहाणे यांनी 48 धावांची भागीदारी करत संघाची धुरा सांभाळली.

KKR vs SRH: शशांक सिंगचा सर्वोत्तम झेल, कोणालाही बसला नाही विश्वास, शेवटी थर्ड अंपायरकडे दिला निर्णय, VIDEO

उमरानचे पहिल्याच षटकात 2 बळी
उमरान मलिकने पहिल्याच षटकात केकेआरला दोन मोठे धक्के दिले. 8व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर 16 चेंडूत 26 धावा करून राणा बाद झाला. त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर उमराने रहाणेलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शशांक सिंगने त्याचा अप्रतिम झेल सीमारेषेवर टिपला. त्याने 26 चेंडूत 28 धावा केल्या. यात 3 षटकार मारले. कर्णधार श्रेयस अय्यर अपयशी ठरला. तो 9 चेंडूत 15 धावा करून उमरान मलिकचा तिसरा बळी ठरला. रिंकू सिंग 5 धावा करून टी नटराजनचा बळी पडला. 15 षटकांनंतर संघाची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 119 धावा होती.

94 धावांत 5 गडी बाद झाल्यानंतर आंद्रे रसेल आणि सॅम बिलिंग्सने संघाची धुरा सांभाळली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. दरम्यान, रसेलच्या आयपीएलमध्ये 2 हजार धावा पूर्ण झाल्या. बिलिंग्स 34 धावा करुन भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर बाद झाला. त्याने 29 चेंडूंचा सामना केला. यात 3 चौकार आणि 1 षटकार मारला. रसेल 28 चेंडूत 49 धावा करून नाबाद राहिला. त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले. ऑफस्पिनर सुंदरच्या शेवटच्या षटकात त्याने 3 षटकार ठोकले. या षटकात 20 धावा झाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#आदर #रसलचय #वदळसमर #हदरबद #भईसपट #आध #बटग #नतर #बलगमधय #चमतकर

RELATED ARTICLES

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी; देशात सापडला ओमिक्रॉनच्या BA.4 व्हेरियंटचा पहिला रुग्ण

हैदराबादः भारतात करोना संसर्ग आता आटोक्यात येत आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतात...

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Most Popular

Todays Headline 20th May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं...

बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, आता साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करतोय ज्युनियर एनटीआर!

Jr. NTR Birthday : साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार ज्युनियर एनटी रामाराव अर्थात ज्युनियर एनटीआर (Jr. NTR ) आज (20...

अजय-अतुलमुळे झाला होता ‘पुष्पा’फेम गायकाचा बॉलिवूड डेब्यू

मुंबई 19 मे- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा गायक सिड श्रीराम (Sid Sriram) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.  अत्यंत गोड आणि...

…. तेरा बाप आया! विराटच्या खेळीनं फॅन्स खूश, सोशल मीडियावर जोरदार सेलिब्रेशन

मुंबई, 20 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) साठी 'करो वा मरो' असलेल्या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) फॉर्म गवसला आहे....

Oppo Smartphones: लवकरच लाँच होणार Oppo Reno 8 Series चे तीन स्मार्टफोन्स, ५० MP कॅमेरासह मिळतील हे फीचर्स

नवी दिल्ली : Upcoming Oppo Smartphones: Oppo आपली आगामी Reno 8 स्मार्टफोन सीरीज २३ मे रोजी चीनमध्ये लाँच करणार असून रिपोर्ट्सनुसार, आगामी फ्लॅगशिप...

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखतची सोनेरी मोहोर | World Boxing Championship Nikhat Golden Bloom Indian boxer Gold medal World Boxing Championships ysh 95

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने (५२ किलो) इस्तंबुल येथे झालेल्या १२व्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक...