Saturday, July 2, 2022
Home भारत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटल्या, देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटल्या, देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?


Petrol Diesel Price in Mumbai Today 23 June 2022 : सरकारी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आजही पेट्रोल (Petrol Price) -डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ, अथवा घट करण्यात आलेली नाही. साधारणतः एका महिन्यापूर्वी म्हणजेच, 21 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये बदल करण्यात आला होता. यानंतर पेट्रोलच्या कमाल दरांत 9 रुपयांनी तर डिझेलच्या दरांत (Diesel Price) 7 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तेव्हापासून तेलाचे दर स्थिर आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत आज सकाळी प्रति बॅरल 109.7 डॉलर इतकी आहे. तर यूएस क्रूड WTI प्रति बॅरल सुमारे 104 डॉलरच्या आसपास आहे. सरकारी तेल कंपन्यांनी कच्च्या तेलावर सरकारी तेल कंपन्यांना कच्च्या तेलावर दिलासा मिळाला असताना आजही त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. 6 एप्रिलपासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. क्रूडने गेल्या आठवड्याच्या उच्चांकापेक्षा सुमारे 10 टक्के घसरण केली आहे.

मुंबई, दिल्लीत पेट्रोलचे दर काय? 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देखील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. 

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय? 

महाराष्ट्रातील मुंबई शहरात गुरुवारी पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, बृहन्मुंबईमध्ये, पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.53 रुपये आणि डिझेलचा दर 97.45 रुपये प्रति लिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.93 रुपये तर डिझेलचा दर 96.38 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर 95.73 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर 95.92 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर 95.54 रुपये प्रति लिटर आहे.

देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलचा दर काय? 

कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#आतररषटरय #बजरत #कचचय #तलचय #कमत #घटलय #दशत #पटरलडझल #सवसत #हणर

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

जुलै महिन्यात शुभ मुहूर्त आहेत कमी; येथे महिन्यातील सगळे मुहूर्त पाहा

मुंबई, 01 जुलै : जुलै महिना सुरू होत आहे. या महिन्यात लग्न, खरेदी, मुंडण इत्यादी अनेक शुभ मुहूर्त आहेत. जर तुम्हाला तुमच्या घराच्या...

मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

क्वालालंपूर : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय या भारतीय खेळाडूंनी गुरुवारी मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला व पुरुष...

1st July 2022 Important Events : 1 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

1st July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Todays Headline 1st July : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

ठाकरे सरकारने उचलबांगडी केलेल्या अश्विनी भिडे पुन्हा मोठ्या जबाबदारीवर परतणार?

मुंबई, 1 जुलै : महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळताच सत्तेत आलेल्या नव्या शिंदे-फडणवीस सरकारने शिवसेनेला (Shiv Sena) झटका देण्यासाठी रणनीती...

महिलांच्या ‘या’ सवयींमुळे प्रत्येक पुरूषाची होतो चिडचिड, त्या लगेच सुधारा

बरेच पुरुष हे संयमी नसतात. त्यांना बऱ्याच गोष्टीची घाई लागलेली असते. त्यामुळे त्यांना महिलांच्या अनेक सवयी आवडत नाही आणि त्यांना राग येतो. अस्वीकरण: ही...