Saturday, May 21, 2022
Home करमणूक अ‍ॅपल वॉच, आयफोन आणि हिऱ्याची अंगठी लंपास, नेहा कक्करच्या पतीचं समान हॉटेलमधून...

अ‍ॅपल वॉच, आयफोन आणि हिऱ्याची अंगठी लंपास, नेहा कक्करच्या पतीचं समान हॉटेलमधून चोरीला!


Neha Kakkar, Rohanpreet Singh : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलाशी लग्न केल्याने नेहा चर्चेत होती. यावेळी तिचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा चर्चेत आले आहे. तिचा पती-पंजाबी गायक रोहनप्रीत (Rohanpreet Singh) एका चोरीचा शिकार ठरला आहे. वास्तविक ही संपूर्ण घटना हिमाचलमध्ये घडली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील एका हॉटेलमधून नेहाचा पती रोहनप्रीत सिंहच्या सामानाची चोरी झाली आहे. या सामानामध्ये अनेक मौल्यवान गोष्टी होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, चोरी झालेल्या वस्तूंमध्ये अॅपल वॉच, आयफोन आणि डायमंड रिंगचा समावेश आहे.

या चोरीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनीही चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबी गायक रोहनप्रीत शुक्रवारी रात्री हॉटेलमध्ये थांबला होता, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याचे डोळे उघडले, तेव्हा त्याला टेबलवर ठेवलेले त्याचे सामान दिसले नाही. त्याने इतरत्र शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र सामान जागेवर सापडले नाही. हरवलेल्या वस्तूंमध्ये त्याचे अ‍ॅपल वॉच, आयफोन आणि हिऱ्याची अंगठी होती. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले असून, हॉटेलच्या खोलीबाहेर लावण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.

पोलिसांचा तपास सुरु

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलबाहेर सापडलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचीही या संदर्भात चौकशी करण्यात येत आहे. सध्या मंडीच्या एसपी शालिनी अग्निहोत्री या प्रकरणाच्या तपासात गुंतल्या आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलवाल्यांकडेही चौकशी सुरू आहे. रोहनप्रीत आणि नेहा कक्कर यांच्या जोडीबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. हे गायक जोडपे सोशल मीडियावरही खूप सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.

नुकताच रोहनप्रीत सिंहने नेहा कक्करसोबतचा एक व्हिडीओ शेअर केल्याने दोघेही चर्चेत आले होते. या व्हिडीओमध्ये दोघेही बेडरुममध्ये चहा घेताना दिसले. त्यांना पाहून तो कुठल्यातरी हॉटेलच्या खोलीत असल्याचेच वाटत होते.

हेही वाचा :अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#अपल #वच #आयफन #आण #हऱयच #अगठ #लपस #नह #कककरचय #पतच #समन #हटलमधन #चरल

RELATED ARTICLES

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Best 5G Phone: नवीन फोन खरेदी करताय? त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाच

Best 5G Phone 2022: गेल्या काही वर्षात भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक कंपन्या दरआठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत...

Most Popular

पुण्यात CNG दरवाढ, सदाभाऊंची पुन्हा केतकीच्या पोस्टवर टिप्पणी TOP News

मुंबई, 21 मे : राज्यसभेसाठी शिवसेना नेते संजय राऊत यांना चौथ्यांदा संधी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या जागेसाठी संजय राऊत यांनी आपली भूमिका...

गावस्करांकडून ‘गलती से मिस्टेक’, कॉमेंट्री करताना हे काय बोलून गेले सुनील गावस्कर

खेळाडूवर पत्नीबद्दल अयोग्य कमेंट केल्याबद्दल गावसकर यांच्यावर टीका करण्यात येतेय. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

iPhone Offers: आतापर्यंतची बेस्ट डील ! १,००० रुपयांत घरी न्या iPhone SE, सोबत, 12 Mini, 13 Mini वर सुद्धा जबरदस्त डिस्काउंट

नवी दिल्ली: Best iPhone Deal: तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन प्रेमी असाल, आणि जर Apple iPhones तुम्हाला विशेष आवडत असतील तर, ते खरेदी करण्याची एक...

अभिनंदन नीता भाभी…; नीता अंबानींविषयी केलेलं विजय मल्ल्याचं ते ट्विट व्हायरल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं भवितव्य आता मुंबई इंडियन्सच्या हातात आहे. अशातच विजय मल्लाचं ट्विट व्हायरल झालं आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Parenting Tips | तुमच्या ‘या’ गोष्टींमुळे मुलांच्या मनावर येतं मोठं दडपण; लगेचच थांबवा

मुंबई : Parenting Tips : आपण सर्वजण आपल्या मुलांना इतर मुलांपेक्षा चांगले बनवण्यासाठी स्पर्धा करीत असतो. कधी डान्सिंग क्लासमध्ये, कधी गाण्याच्या क्लासमध्ये, कधी...

Vastu Tips घरामध्ये ‘अशा’ प्रकारे वापरा कापूर! सकारात्मकता येईल आणि धनातही वाढ होईल, जाणून घ्या

Vastu Tips : तुमच्या घरात जर आनंदाचे वातावरण असावे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरातील...