Friday, May 20, 2022
Home भारत .... अशी जन्माला आली लाखमोलाची Tata Nano; तुमचाही मोलाचा वाटा, सांगतायत खुद्द...

…. अशी जन्माला आली लाखमोलाची Tata Nano; तुमचाही मोलाचा वाटा, सांगतायत खुद्द रतन टाटा


मुंबई : भारतीय उद्योग जगताला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासोबतच ते स्थान सातत्यानं कायम ठेवणाऱ्यांच्या यादीमध्ये रतन टाटा (Ratan Tata) यांचं नाव अग्रस्थानी येतं. व्यवसायासोबत माणुसकी आणि चौकटीबाहेर जाणारी नेतृत्त्वक्षमता सर्वांपुढे आणत टाटा यांनी एक ना अनेक आदर्श प्रस्थापित केले. 

आजमितीस वयाची 84 वर्षे ओलांडली असली तरीही टाटा यांची कार्यक्षमता आणि त्यांचं कामावर असणारं प्रेम कमी झालेलं नाही. आपल्या विविध ब्रँडसाठी काम करणारा प्रत्येक कर्मचारी ज्याप्रमाणे त्यांच्यासाठी अतिशय जवळचा, त्याचप्रमाणं ज्यांच्यासाठी आपण काम करतो ते ग्राहक अर्थात सर्वसामान्य नागरिकही तितकेच महत्त्वाचे. 

म्हणूनच की काय, त्यांनी संपूर्ण देशभरात अतिशय लोकप्रिय ठरलेल्या कारच्या मॉडेलची प्रेरणाही सर्वसामान्य कुटुंबांपासूनच घेतली. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून खुद्द टाटा यांनीच Tata NANO या कारची संकल्पना कशी मिळाली आणि कारचं डिझाईन कसं तयार झालं यामागची एक गोष्ट सांगितली. गोष्ट अगदी छोटी, पण तिचे परिणाम मात्र कायमस्वरुपी मनात घर करतील असेच. 

… आणि नॅनो जन्माला आली 
नॅनो कारची संकल्पना कशी सुचली याबद्दल सांगताना टाटा लिहितात, ‘मी भारतातील बऱ्याच कुटुंबांना स्कूटरवरून फिरताना पाहिलं. आई- वडिलांच्या मध्ये लहान मुल अगदी सँडविच व्हावं असं बसलेलं असायचं. अनेकदा तर घसरण असणाऱ्या रस्त्यांवरूनही ते कसेबसे जात होते….

स्थापत्यशास्त्राचं शिक्षण घेण्याचा एक फायदा मला झाला की, त्यातून मी डूडल बनवायला शिकलो. मोकळ्या वेळेत मी तेच करायचो. सुरुवातीला आम्ही एक सुरक्षित दुचाकी बनवण्याचा प्रयत्न केला. दुचाकीचं डूडल करता करता ते चार चाकी झालं…. खिडक्या आणि दारं नसणारं…. अगदीच Basic. शेवटी मी ठरवलं, ही एक कार असावी… तीच होती Nano… कायमच आमच्या माणसांसाठी बनवलेली Nano’

रतन टाटा यांनी नॅनो तयार होण्यामागची ही गोष्ट सांगितली आणि मग काय, प्रत्येकानंच या दिग्गज उद्योजकाला सलाम करत लहान तोंडी मोठा घास का असेना पण त्यांचं कौतुक केलं. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अश #जनमल #आल #लखमलच #Tata #Nano #तमचह #मलच #वट #सगतयत #खदद #रतन #टट

RELATED ARTICLES

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

Most Popular

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांवर वंचित बहुजन आघाडीने म्हटलं..

मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच वंचित...

‘मन शांती हे सर्वोत्तम..’ मधुराणीच्या पोस्टपेक्षा गालावरच्या खळीची चर्चा जास्त!

मुंबई, 19 मे- आई कुठे काय करते( Aai kuthe kay karte ) मालिका सततच्या टवीस्टमुळे नेहमी चर्चे असते. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित...

Todays Headline 20th May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं...

Live Updates: मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित

ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ  1 जूनला मध्य प्रदेशात जाणार,  पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ मध्य प्रदेशात जाणार;  चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर, प्रवीण घुगेंसह पदाधिकाऱ्यांचा...