Saturday, November 27, 2021
Home विश्व अल्पकालावधीत तालिबानने 'या' कारणांनी मिळवला विजय!

अल्पकालावधीत तालिबानने ‘या’ कारणांनी मिळवला विजय!अमेरिकेने सैन्य माघारीची घोषणा केल्यानंतर काही महिन्यातच तालिबानने अफगाणिस्तानचे सरकार उलथवून टाकले. अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरोधात अफगाण सैन्य झुंज देईल असे अनेकांना वाटले होते. मात्र, अफगाण सैन्याने अपवाद वगळता सपशेल मान टाकली. केवळ संघर्ष करूनच नव्हे; तर अफगाण सैनिकांना शरण येण्याचे आवाहन, दहशतीच्या धमक्या आणि मानसिक दबावतंत्राचा वापर केल्याने तालिबानची वेगवान आगेकूच झाली. या संमिश्र नीतीचा वापर करून तालिबानने शहरामागून शहरे, प्रांतामागून प्रांत ताब्यात घेतले आणि शेवटी राजधानी काबूलवर तालिबानी मोहोर उमटविली.

अमेरिकेचा अफगाण फौजांवर विश्वास!

अमेरिकेने मे महिन्यापासून सैन्यमाघारीला सुरुवात केल्यानंतर अफगाण सैनिक तालिबानला पुरून उरतील, अशी अमेरिकेला खात्री होती. तीन लाखांहून अधिक अफगाण सैनिक, अब्जावधी डॉलरची शस्त्रे अफगाण सैनिकांकडे होती. तालिबानपेक्षा अफगाणिस्तानच्या सैनिकांची कुमक आणि शस्त्रसज्जता किमान कागदावर तालिबानपेक्षा अधिक होती. मात्र, भ्रष्टाचार, अनुभवहीन नेतृत्व, प्रशिक्षणाचा अभाव आणि दीर्घ काळापासून सुरू असलेल्या संघर्षामुळे ढासळलेले नीतीधैर्य या अफगाण सैनिकांच्या कमकुवत बाजू होत्या. अफगाणिस्तानचे सुरक्षा दल पुरेसे नसल्याचा इशारा अमेरिकी सरकारच्या निरीक्षकांनी अमेरिकेला वारंवार दिला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले.

अफगाण सैन्याची काही ठिकाणी झुंज

अफगाणिस्तानच्या सैनिकांनी सुरुवातीला दक्षिणेकडील लष्कर गाहसारख्या ठिकाणी तालिबानशी लढा देण्याचा नेटाने प्रयत्न केला. मात्र, या वेळी त्यांना अमेरिकेच्या हवाई हल्ल्याचे आणि लष्कराचे साह्य नव्हते. संख्येने लहान असले, तरी अधिक संघटित आणि मूलतत्त्ववादी भावनेने प्रेरित असलेल्या तालिबानशी दीर्घ काळ लढा देणे अफगाण सैनिकांना जमले नाही. अफगाण लष्कराने तालिबानसमोर अक्षरश: शस्त्रांसह शरणागती पत्करली. काही ठिकाणी लष्कराची पूर्ण युनिटही तालिबानला शरण गेली.

सैन्यमाघारीच्या घोषणेत संघर्षाची बीजे

गेल्या वर्षी अमेरिकेने तालिबानबरोबर करार करून अमेरिकी सैन्यमाघारीची घोषणा केली होती. त्या वेळीच या संघर्षाची बीजे रोवली गेली. तालिबानसाठी हा दोन दशकांच्या संघर्षानंतर मिळालेला विजय ठरला. तालिबान्यांनी ‘अजेय तालिबान’च्या घोषणा दिल्या. अफगाण सुरक्षा दलांवर प्रचारतंत्राद्वारे मानसिक दबाव आणला. स्थानिक आणि लष्करातील जवानांना एकामागोमाग अनेक संदेश मिळू लागले. ‘परिस्थिती चिघळू द्यायची नसेल, तर शरण या, सहकार्य करा,’ असे आवाहन करण्यात आले. शरण आलेल्यांना सुरक्षेची हमी दिली. अफगाणिस्तानमधील युद्धखोर टोळ्यांनीही तालिबानला सुरुवातीला निर्वाणीचा इशारा दिला. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

संघर्षाविना पडली शहरे

कुठल्याही संघर्षाविना शहरे पडत गेली. टोळीप्रमुख इस्माईल खानला तालिबान्यांनी पकडले. अत्ता महंमद नूर हा टोळीप्रमुख उझबेकिस्तानला पळून गेला. मुख्य संघर्ष सुरू होण्याच्याही आधी शरण येण्यासाठीचा करार आणि इतर बाबी तालिबान्यांच्या तयार होत्या. वैयक्तिक सैनिक, कनिष्ठ पातळीवरील सरकारी अधिकाऱ्यांपासून प्रांताच्या गव्हर्नरपर्यंत करार करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे त्यांच्याशी संघर्ष करावा लागला नाही. काबूलही कुठल्याही संघर्षाविना तालिबानच्या ताब्यात पडले.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अलपकलवधत #तलबनन #य #करणन #मळवल #वजय

RELATED ARTICLES

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 27 नोव्हेंबर 2021 : शनिवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा...

Most Popular

Box Office Report: बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीचा धमाका; ‘बंटी और बबली 2’ ची निराशा

Box Office Report :   चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर सर्व सिनेमा प्रेमींनी थिएटर्सकडे धाव घेतली. अभिनेता अक्षय कुमारचा  (Akshay Kumar)...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

IND vs NZ 1st Test Day 3 Live: कानपूर कसोटी, भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या दिवसाचे Live अपडेट

कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने विकेट न गमावता १२९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड...

Bigg Boss 15: राखीच्या नवऱ्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री? नेटकऱ्यांची भन्नाट रिअॅक्शन

Bigg Boss 15 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस सध्या चर्चेत आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता...

… तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला

कानपूर, 27 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. टीम साऊदीनं (Tim Southee) 5...

रणवीर सिंहला टक्कर देणार कतरिना कैफ; ‘सर्कस’ ,’फोन भूत’ एकाच दिवशी होणार रिलीज

'सर्कस' आणि 'फोन भूत' या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 'सर्कस'मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर कतरिना कैफ 'फोन...