Saturday, August 13, 2022
Home विश्व अमेरिकेने दिले २४ रशियन राजनयिकांना देश सोडण्याचे आदेश

अमेरिकेने दिले २४ रशियन राजनयिकांना देश सोडण्याचे आदेश


वॉशिंग्टन: अमेरिका आणि रशियातील तणाव कमी होण्यासाठी काही महिन्यांपूर्वी दोन्ही देशांच्या प्रमुखांची बैठक झाली होती. मात्र, त्यानंतरही दोन्ही देशांकडून कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेने २४ रशियन राजनयिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तीन सप्टेंबरपर्यंत त्यांना अमेरिकेतून माघारी परतावे लागणार आहे. या राजनियकांच्या व्हिसाची मुदत संपल्याने अमेरिकेने हे आदेश दिले असल्याची माहिती रशियन राजदूतांनी दिली आहे. अमेरिकेने व्हिसा प्रक्रिया कठोर केली आहे.

रशियन दूतावासात अमेरिकेतून जाणाऱ्या रशियन राजनयिकांच्या ऐवजी इतर रशियन राजनयिकांचीही नियुक्ती होणार नाही. अमेरिकेकडून त्यांना अद्यापही व्हिसा देण्यात आला नाही. डिसेंबर २०२० मध्ये अमेरिका आणि रशियामध्ये झालेल्या करारानुसार, रशियाचे राजनयिक अमेरिकेत तीन वर्ष राहू शकतात. व्हिसाची मुदत संपल्यानंतर त्यांना देश सोडणे अथवा व्हिसा मुदत वाढीसाठी अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. एका अमेरिकन माध्यमांशी बोलताना रशियन राजदूतांनी सांगितले की, आमच्या माहितीप्रमाणे हा नियम इतर देशांना लागू होत नाही.

याआधी एप्रिल महिन्यात बायडन प्रशासनाने राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हस्तक्षेप आणि सायबर हल्ल्यासाठी रशियाला जबाबदार ठरवले होते. त्यानंतर १० रशियन राजनयिकांना बरखास्त केले होते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अमरकन #दल #२४ #रशयन #रजनयकन #दश #सडणयच #आदश

RELATED ARTICLES

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

Most Popular

Hing Water Benefits : हिंगाचं पाणी पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय, आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे....

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे...

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेटली भेट अन्..

बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....