Saturday, November 27, 2021
Home विश्व अमेरिकी कायद्यानुसार तालिबान दहशतवादीच! Facebook कडून तालिबानी कंटेंटवर बंदी

अमेरिकी कायद्यानुसार तालिबान दहशतवादीच! Facebook कडून तालिबानी कंटेंटवर बंदी


न्यूयॉर्क, 17 ऑगस्ट : अमेरिकेच्या कायद्यातील (American law) तरतुदींनुसार तालिबान (Taliban) ही एक दहशतवादी संघटना (Terror Organization) असल्याचं सिद्ध होत असून या संघटनेच्या कुठल्याही कंटेंटला (Talibani Content) आपल्या प्लॅटफॉर्मवर स्थान नसल्याचं फेसबुकनं (Facebook) जाहीर केलं आहे. त्यामुळे तालिबानी नेत्यांची फेसबुक असणारी अकाऊंट्स ब्लॉक होणार असून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या कुठल्याही विचारांना थारा मिळणार नसल्याचं फेसबुकनं म्हटलं आहे.

काय आहे अमेरिकेचा कायदा?

अमेरिकेनं जाहीर केलेल्या दहशतवादी संघटनांच्या यादीत तालिबानचा समावेश नाही. अल् कायदा, आयसीस यासारख्या संघटनांच्या यादीत अमेरिकेनं तालिबानचा समावेश केलेला नाही. मात्र दहशतवादी संघटना कुणाला म्हणायचं, याची तरतूद अमेरिकेच्या कायद्यात करण्यात आली आहे. त्यात व्यक्तीने किंवा गटाने केलेले गुन्हेगारी किंवा हिंसक कृत्य असा उल्लेख आहे. त्यानुसार तालिबान ही संघटना दहशतवादी ठरत असल्याचा दावा फेसबुकनं केला आहे.

अशी उचलली पावलं

दहशतवादाचं समर्थन करणारे कुठलेही तपशील फेसबुकवरून प्रसारित करण्यात येऊ नयेत, यासाठी फेसबुकनं खबरदारी घेतली आहे. त्याचप्रमाणं दारी आणि पश्तो भाषा अवगत असणारे अफगाणिस्तानमधील काही तज्ज्ञही फेसबुकनं नियुक्त केले आहेत. या भाषांमध्ये जर काही तपशील फेसबुकवर टाकण्यात आले, तर ते ओळखून तातडीने काढून टाकण्यात येणार आहेत. इंग्रजी व्यतिरिक्त इतर कुठल्याही स्थानिक भाषेतून दहशतवादी विचार पसरवण्याचं काम केलं जाऊ शकतं. त्यासाठी तालिबानशी संबंधित सर्व स्थानिक भाषांमधील तज्ज्ञ नियुक्त केले जाणार आहेत.

हे वाचा – Explainer: अफगाणिस्तानातील ‘तालिबान राज’नंतर भारतातही दहशतवाद फोफावणार, काय होणार नेमका परिणाम?

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य

अमेरिकेनं सैन्य माघारीचा निर्णय घेतल्यानंतर तालिबान आक्रमक झालं असून अफगाणिस्तानमधील बहुतांश भूभाग त्यांनी काबीज केला होता. गेल्या काही दिवसांत तालिबाननं आपला मोर्चा काबूलकडे वळवला आणि राजधानीदेखील त्यांनी काबीज केली आहे. त्यामुळे तालिबानमध्ये हिंसाचार वाढला असून विविध देशातील नागरिक देश सोडून जाण्यासाठी विमानात गर्दी करत असल्याचं चित्र आहे. तालिबाननं मात्र आता शांततेची भाषा सुरु केली असून परदेशी नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अमरक #कयदयनसर #तलबन #दहशतवदच #Facebook #कडन #तलबन #कटटवर #बद

RELATED ARTICLES

वाईट! दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून केली दगडफेक, 12 जण जखमी

राजस्थान, 27 नोव्हेंबर: राजस्थानची (Rajasthan)राजधानी जयपूर (Jaipur) ग्रामीणमधील पावटा भागात गुरुवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. दलित व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली...

Parambir Singh : परमबीर सिंहांची आता सीआयडी चौकशी! मुंबईत दाखल होताच चौकशीचा ससेमिरा

Parambir Singh : मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह (Parambir Singh)यांना आता सीआयडी...

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Most Popular

वाईट! दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून केली दगडफेक, 12 जण जखमी

राजस्थान, 27 नोव्हेंबर: राजस्थानची (Rajasthan)राजधानी जयपूर (Jaipur) ग्रामीणमधील पावटा भागात गुरुवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. दलित व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली...

रणवीर सिंहला टक्कर देणार कतरिना कैफ; ‘सर्कस’ ,’फोन भूत’ एकाच दिवशी होणार रिलीज

'सर्कस' आणि 'फोन भूत' या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 'सर्कस'मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर कतरिना कैफ 'फोन...

Airtel चा बंपर धमाका, या ४ प्लान्स सोबत रोज मिळणार फ्री डेटा, जाणून घ्या सर्वकाही

हायलाइट्स:एअरटेल यूजर्संसाठी एक गुड न्यूज चार प्लानमध्ये मिळणार ५०० एमबी डेटा फ्री प्लानची किंमत आणि बेनिफिट्स पाहा नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या नेहमी यूजर्संना...

स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही लोकांना विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी असण्याची मोठी समस्या असते. त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. मात्र, शारीरिक समस्या किंवा...

कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात समोर येणारांचा विषय तिथं बघू : परब

ST Strike : कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात जे आमच्या समोर आले आहेत त्यांचा...

श्रेयस अय्यरनं शतक झळकात पूर्ण केली अट, आता घरी जेवायला येणार खास पाहुणा

कानपूर, 27 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरनं शतक (Shreyas Iyer)...