Saturday, July 2, 2022
Home विश्व अमेरिका हल्ला करणार?; जोरदार प्रत्युत्तर देणार, उत्तर कोरियाने ठणकावले

अमेरिका हल्ला करणार?; जोरदार प्रत्युत्तर देणार, उत्तर कोरियाने ठणकावले


प्योंगयांग: अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांचा संयुक्त युद्ध सराव सुरू आहे. या युद्ध सरावावर उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग यांची बहीण किम यो जोंग यांनी टीका केली आहे. हा युद्ध सराव अणुयुद्धाची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले. उत्तर कोरियाही आपली प्रतिकार क्षमता अधिक मजबूत करणार असल्याचे किम यो जोंगने म्हटले.

किम यो जोंग यांनी अमेरिकेवरही टीका केली. अमेरिका सातत्याने युद्ध सराव करत आहे. उत्तर कोरियासोबत चर्चा करणार असल्याचा बायडन प्रशासन देखावा करत असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे किम यो जोंग यांनी म्हटले. अमेरिका जोपर्यंत दक्षिण कोरियातून आपले सैन्य आणि शस्त्र माघारी घेत नाही. तोपर्यंत कोरियन भागांमध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. कोणत्याही लष्करी कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी उत्तर कोरिया आपल्या लष्करी सामर्थ्यांत वाढ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दक्षिण कोरियात चाललंय काय?; अनेक महिलांनी कापले केस
दक्षिण कोरियात अमेरिकेचे २६ हजार सैन्य तैनात आहेत. अमेरिकेने या महिन्यात आपल्या युद्ध सरावाची घोषणा केली होती. उत्तर कोरियाकडून अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त युद्ध सरावाला सातत्याने विरोध केला जातो.

North Korea US शांतता हवी असेल तर तसं वागा उगाच डिवचू नका; उत्तर कोरियाचा अमेरिकेला इशारा
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन सत्तेवर आल्यानंतर आशियातील अमेरिकेचा प्रभाव वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, चीन आणि उत्तर कोरियाकडून असणारा धोका अमेरिकेसमोरील चिंतेचे सर्वांत मोठे कारण आहे.

टोकियो ऑलिम्पिक: भारताच्या कामगिरीवर चीनने साधला निशाणा
दरम्यान काही महिन्यापूर्वी किम यो जोंग यांनी अमेरिकेवर टीका करत इशारा दिला होता. अमेरिकेला आगामी चार वर्ष शांतेत हवी असतील तर त्यांनी आमच्या भागात तणाव वाढवणाऱ्या धोरणांपासून दूर राहावे. कोरियन भागात दारूगोळ्याची दुर्गंधी फैलावण्याची त्यांची इच्छा असली तरी त्यांनी त्यापासून दूर रहावे असाही इशारा किम यो यांनी दिला होता.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अमरक #हलल #करणर #जरदर #परतयततर #दणर #उततर #करयन #ठणकवल

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

CM शिंदेंना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश, सरकार जाताच पवारांना धक्का TOP बातम्या

मुंबई, 30 जून : राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्याला आता पूर्ण विराम मिळाला आहे. पण, या नाट्यात शेवटपर्यंत धक्क्यावर धक्के पाहायला मिळाले. अखेर एकनाथ...

Marathwada: मराठवाड्यात आतापर्यंत 137 मिलिमीटर पाऊस; गेल्यावर्षीच्या तुलनेत कमीच

Marathwada Rain Update: मुंबईत आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदर हजेरी लावली असून, मागील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी...

जुलै महिन्यात शुभ मुहूर्त आहेत कमी; येथे महिन्यातील सगळे मुहूर्त पाहा

मुंबई, 01 जुलै : जुलै महिना सुरू होत आहे. या महिन्यात लग्न, खरेदी, मुंडण इत्यादी अनेक शुभ मुहूर्त आहेत. जर तुम्हाला तुमच्या घराच्या...

तुमचं मुलं तुमच्याशी खोटं बोलतं? या सवयीमागची ही ४ कारणं धक्कादायक, उपाय म्हणून कराल एक गोष्ट

प्रत्येक पालक आपल्या मुलांना चांगलेच संस्कार देत असतात. मुलांनी चांगल वागावं, ही एवढीच यामागे त्यांची अपेक्षा असते. पण अनेकदा मुलांना खोटं बोलण्याची सवय...

19 वर्षांपर्यंत मुलीला 5 वेळा विकलं, महाराष्ट्रासह येथील मुलींवर लागते बोली

सात वय वर्षाची एक मुलगी जिच्या वयाच्या मुली, खेळायच्या, मज्जा-मस्ती करायच्या, आपलं लहानपण भरभरुन जगायच्या. मात्र, आपलं आनंदी आयुष्य जगत असताना, ती दिल्लीला...

टेस्ट मे बेस्ट! धोनी नाही तर ‘या’ कर्णधाराने जिंकवून दिले सर्वांधिक सामने

टीम इंडियाचा इंग्लंडविरूद्ध सामन्याचा कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली सध्या कसोटी सामना खेळतेय.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...