Saturday, August 13, 2022
Home भारत अमित शाह-शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय झालं?

अमित शाह-शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय झालं?
नवी दिल्ली : दिल्लीत सध्या भेटीगाठींचा सिलसिला चांगलाच सुरु आहे. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट झाली तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही भेटींची पार्श्वभूमी वेगवेगळी असली तरी त्यातून निघणारे अर्थ मात्र गडद आहेत.

17 जुलैला दिल्लीत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. 2 ऑगस्टला पुन्हा शरद पवार आणि अमित शाहांची भेट झाली. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत शरद पवार आज अमित शाह यांना भेटले. संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या कार्यालयात दोघांची भेट झाली. विषय सहकाराचाच होता असं सांगितलं जातंय. याच मुद्द्यावर त्यांनी पंतप्रधानांचीही भेट घेतली होती.

भेट सहकाराच्याच मुद्द्यावर..
केंद्रीय सहकार मंत्री म्हणून अमित शाह यांनी या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. शरद पवारांसोबत या भेटीवेळी राष्ट्रीय साखर महासंघाचे प्रकाश नाईकनवरे, जयप्रकाश दांडेगावकर हे दोन पदाधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे भेट सहकाराच्याच मुद्द्यावर झाली हे उघड आहे.

महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प असावा
महाराष्ट्रातल्या महापुरानंतर एनडीआरएफचा एक बेस कॅम्प महाडमध्ये असावा ही मागणी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केलीय. त्याबद्दलचं निवेदनही या भेटीत त्यांना दिलं गेल्याचं कळतंय.

सहकाराबद्दल का चिंतित आहेत पवार. हा प्रश्न साहजिकच या भेटीगाठीमधून उपस्थित होतो. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत पवारांनी नागरी सहकारी बँकांबद्दल आरबीआयने बदललेल्या नियमांवर काही सुधारणा सुचवल्या होत्या. आजच्या बैठकीमध्ये साखरेचा एमएसपी वाढवण्याबाबत आणि इथेनॉल निर्मिती बाबत प्रोत्साहनासाठी काही सूचना केल्या गेल्या.

दिल्लीत पवार आणि पंतप्रधान मोदी भेटी अनेकदा झाल्या आहेत. पण, पवार आणि अमित शाह ही भेट तशी दुर्मिळच. पवारांची जशी केमिस्ट्री मोदींसोबत आहे. तितकी शाहांसोबत नाहीय. पण केंद्रात सहकार खातं तयार केल्यानंतर ते दिलं गेलंय अमित शाहांकडेच. या माध्यमातून शुगर लॉबीचं राजकारण करणाऱ्यांसाठीही  इशारा मानला जातोय. त्या पार्श्वभूमीवर सहकारावरचे पवारांचे प्रश्न अमित शाह कसे हाताळतायत हे पाहावं लागेल.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अमत #शहशरद #पवरचय #भटत #नमक #कय #झल

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

Ukraine Russia War : युक्रेनमधील पॉवर प्लांटजवळ रशियाचा हल्ला, भारताचं संयम राखण्याचं आवाहन

Ukraine Russia Conflict : युक्रेनमधील झापोरिझ्झ्या अणू ऊर्जा प्रकल्पाजवळ रशियाकडून हल्ले सुरु आहेत. झापोरिझ्झ्या अणू ऊर्जा प्रकल्प (...

Safety Tips: स्मार्टफोनमध्ये Apps डाउनलोड करताना घ्या काळजी, अन्यथा अकाउंट कधी रिकामे झाले कळणारही नाही

नवी दिल्ली: Smartphone Apps: आजकाल काही धोकादायक Apps मुळे स्मार्टफोन युजर्सची सुरक्षा धोक्यात आली आहे. म्हणूनच, iPhone किंवा Android Users ना अॅप्स डाउनलोड...

Sudden Weight Loss: काही न करता वजन कमी होतंय? तपासून घ्या नाहीतर…

असे अनेक लोक आहेत जे भरपूर खाऊनही वजन वाढवू शकत नाहीत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Madhu Limaye : बिहारच्या सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा मराठी माणूस, मधू लिमयेंचा दबदबा

Madhu Limaye : बिहारमध्ये राजकीय भूकंप करत मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी राजीनामा दिला. भाजपला धक्का देत...

स्मार्टफोन सारख्या फीचर्ससह लाँच झाली Maxima ची शानदार स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : ग्राहकांची मागणी पाहता आता अनेक कंपन्या कमी किंमतीत येणाऱ्या शानदार स्मार्टवॉच भारतीय बाजारात लाँच करत आहेत. यातच आता Maxima ने...

न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहला मुंबई पोलिसांची नोटीस, लवकरच चौकशीला हजर राहावे लागणार

Ranveer Singh Nude PhotoShoot : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) मागील बऱ्याच दिवसांपासून न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. रणवीर...