Sunday, January 16, 2022
Home मुख्य बातम्या अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून 'त्या' फोटोचा पर्दाफाश

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून ‘त्या’ फोटोचा पर्दाफाश


मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पण, शहा आणि फडणवीस यांच्या भेटीच्या फोटो मार्फ करून शरद पवार सुद्धा बैठकीला हजर असल्याचा फोटो व्हायरल करण्यात आला. राष्ट्रवादीने यावर आक्षेप हा फोटो बनावट असून फोटोशॉप केला असल्याचं उघड केलं आहे.

आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा फोटो समोर आला. पण, अचानक एक फोटो व्हायरल झाला. यामध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शरद पवार सुद्धा या बैठकीला उपस्थितीत होते, असं या फोटोतून दाखवण्यात आलं.

पण, राष्ट्रवादीने या फोटोचा पर्दाफाश केला आहे. ‘अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या ‘गजाल्या’ सुरू झाल्यात. त्यासाठी ‘असले’ मार्फ केलेले बचकांडे हातखंडे आहे, असं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

संप अखेर मिटला? कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याचे ST कृती समितीचं आवाहन

‘आता मॉर्फला माफी नाही. फसव्या फोटोशॉप जल्पकांचा (ट्रोल्स) शोध घेणं अवघड नाही. महाराष्ट्र सायबर पोलीस असले छुपे छद्मउद्योग करणाऱ्यांना शोधून काढावे’ अशी विनंती सुद्धा राष्ट्रवादीने सायबर पोलिसांकडे केली आहे.

संघटनात्मक बदल होणार नाही – फडणवीस

दरम्यान, आज दुपारी देवेंद्र फडणवीस  यांनी अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अंतर्गत बऱ्यात घडामोडी घडल्यात. त्यामुळे या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

‘अमित शहा हे आमचे नेते आहे. त्यामुळे दिल्लीत आल्यावर आम्ही त्यांची भेट घेतच असतो. त्यामुळे कुठलाही संघटनेमध्ये बदल नाही, मी आणि चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी इथं आलो होतो. संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी ही बैठक झाली, असं फडणवीस यांनी सांगितलं.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अमत #शहफडणवसचय #बठकत #शरद #पवर #रषटरवदकडन #तय #फटच #परदफश

RELATED ARTICLES

WhatsApp वर असा मेसेज आला तर सावध व्हा, हॅकर्सकडून होऊ शकते मोठी फसवणूक

नवी दिल्ली, 16 जानेवारी : तुम्हीही WhatsApp चा वापर करत असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. हॅकर्स WhatsApp द्वारे कोणत्याही युजरची फसवणूक करू...

TOP 25 : टॉप 25 न्यूज बुलेटिन : 16 जानेवारी 2022 : ABP Majha

<p>देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा, राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स टॉप 25 न्यूज बुलेटीनमध्ये...</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Most Popular

‘फटे स्कॅम’प्रमाणंच मराठवाड्यात ‘तीस-तीस स्कॅम’ची चर्चा! 400 कोटींपेक्षा मोठा घोटाळा

<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद :</strong> सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात (Solapur Barshi) सध्या 'फटे'ची चर्चा आहे. हे प्रकरण विशाल फटे नावाच्या व्यक्तिशी संबंधित आहे. विशाल...

Ear: उगीचच कानात काड्या घालू नका, वारंवार कान स्वच्छ करणे यासाठी आहे घातक

नवी दिल्ली, 16 जानेवारी : कानात मळ जमा होणे सामान्य बाब आहे. तसे पाहिल्यास आपल्या कानांच्या संरक्षणासाठी मळ उपयोगी असतो. त्यामुळे बाहेरील धुळीचे...

न्यूझीलंडजवळच्या टोंगा समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक; जपानला त्सुनामीचा तडाखा

Tonga Tsunami : न्यूझीलंडजवळ पॅसिफिक महासागरच्या किनारपट्टीवर असलेल्या टोंगामध्ये समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. टोंगामध्ये गेल्या 30 वर्षातील...

बायको किंवा गर्लफ्रेंडला खुश करायचंय? Fossil Women Watchवर मिळतेय 60 टक्के डिस्काऊंटची बंपर ऑफर

Amazon Offer On Women Fossil Watch : अमेझॉन तुमच्यासाठी एक बंपर ऑफर घेऊन आला आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला...

महाराष्ट्रात Tesla Plant च्या उभारणीसाठी या मंत्र्याचं Elon Musk यांना आमंत्रण

मुंबई, 16 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी थेट अमेरिकी खासगी स्पेस कंपनी स्पेसएक्सचे (SpaceX) संस्थापक, सीईओ...

Goa Election Raj Thackery : गोव्याच्या राजकारणात नव्या पक्षाची एन्ट्री कोण आहेत गोव्याचे राज ठाकरे?

By : abp majha web team | Updated : 16 Jan 2022 11:40 AM (IST) स्थानिक भूमिपुत्र, त्यांचे हक्क आणि त्यासाठी भांडणारा नेता...